10 Milagres de Jesus na Bíblia: Lista com versículos e explicação
Os milagres de Jesus são muito mais do que demonstrações de poder sobrenatural; eles são sinais que confirmam sua divindade e missão. Ao longo dos Evangelhos, vemos Cristo curando enfermos, dominando a natureza e vencendo a morte.
Neste guia, selecionamos 10 milagres de Jesus na Bíblia, organizados com referências e uma breve explicação sobre o impacto espiritual de cada um deles.
Os principais milagres de Jesus nos Evangelhos
1. Transformação da Água em Vinho
Referência: João 2:1-11
Explicação: Ocorreu nas Bodas de Caná. Sendo o seu primeiro milagre público, Jesus demonstrou autoridade sobre a matéria e a natureza, revelando sua glória aos discípulos e abençoando a instituição da família.
येशू पाण्याचा द्राक्षारस करतात
तिसर्या दिवशी गालीलातील काना येथे एक लग्न होते. येशूंची आई तिथे होती, येशू व त्यांच्या शिष्यांना देखील त्या लग्नाचे आमंत्रण होते. ज्यावेळी द्राक्षारस संपला, तेव्हा येशूंची आई त्यांना म्हणाली, "त्यांच्याजवळचा द्राक्षारस संपला आहे."
येशू म्हणाले, "बाई, तू मला यामध्ये भाग घ्यावयास का लावते? माझी घटका अजूनही आलेली नाही."
त्यांच्या आईने नोकरांस सांगितले, "हा जे काही तुम्हाला सांगेल ते करा."
त्या ठिकाणी जवळच पाण्याचे सहा दगडी रांजण होते, ते यहूदीयांच्या शुद्धीकरणासाठी वापरले जात असत आणि त्या प्रत्येकात सुमारे शंभर लीटर पाणी मावत असे.
येशू त्या नोकरांना म्हणाले, "रांजण पाण्याने भरा" त्याप्रमाणे त्यांनी ते पुरेपूर भरले.
नंतर येशू त्यांना म्हणाले, "आता यातील काही काढून भोजन प्रमुखाकडे न्या."
त्यांनी तसे केले, त्या भोजन प्रमुखाने द्राक्षारसात परिवर्तित झालेल्या पाण्याची चव पाहिली. तो द्राक्षारस कुठून आणला हे त्याला माहीत नव्हते, पण ज्या नोकरांनी पाणी काढले होते त्यांना माहीत होते. म्हणून त्याने वराला बाजूला बोलावून म्हटले, "प्रत्येकजण उत्तम द्राक्षारस प्रथम वाढतो आणि पाहुणे पिऊन तृप्त झाले की, मग हलक्या प्रतीचा वाढतो; तुम्ही तर उत्तम द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहे."
येशूंनी गालीलातील काना येथे केलेले हे पहिले चिन्ह होते व त्याद्वारे आपले गौरव प्रकट केले आणि शिष्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.
2. Cura do cego de nascença
Referência: João 9:1-12
Explicação: Jesus usa lodo para curar um homem que nunca havia enxergado. Este milagre prova que Ele é a Luz do Mundo e tem poder para restaurar o que nasceu com defeito.
जन्मांधाला दृष्टीलाभ
येशू जात असताना, त्यांनी एका जन्मांध मनुष्यास पाहिले, तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारले, "गुरुजी, कोणी पाप केले, या मनुष्याने की त्याच्या आईवडिलांनी, ज्यामुळे हा आंधळा जन्मला?"
येशूंनी उत्तर दिले, "त्याने किंवा त्याच्या आईवडिलांनी पाप केले नाही, परंतु हे यासाठी झाले की परमेश्वराची कृत्ये त्याच्यामध्ये प्रकट व्हावी. जोपर्यंत दिवस आहे, तोपर्यंत ज्याने मला पाठविले त्यांची कार्ये आपल्याला केली पाहिजेत. रात्र येत आहे, तेव्हा कोणी काही करू शकत नाही. मी या जगात आहे, तेव्हापर्यंत मी या जगाचा प्रकाश आहे."
असे बोलून, ते जमिनीवर थुंकले व थुंकीने चिखल करून त्याचा लेप त्यांनी त्या माणसाच्या डोळ्यांवर लावला. "जा, ते त्याला म्हणाले, शिलोआम तळ्यात डोळे धू." (शिलोआम म्हणजे पाठविलेला.) तेव्हा तो मनुष्य गेला व त्याने डोळे धुतले आणि डोळस होऊन घरी गेला.
त्याचे शेजारी आणि इतर लोक त्याला एक भिकारी म्हणून ओळखत होते, ते एकमेकांना विचारू लागले "बसून भीक मागणारा तो हाच मनुष्य नाही काय?" काहीजण म्हणाले, "होय, हाच तो."
पण इतर म्हणाले, "नाही, तो फक्त त्याच्यासारखा दिसतो."
तो भिकारी आग्रहपूर्वक म्हणाला, "मी तोच मनुष्य आहे!"
"मग तुझे डोळे कसे उघडले?" त्यांनी त्याला विचारले.
तेव्हा त्याने सांगितले, "येशू नावाच्या एका मनुष्याने चिखल केला आणि माझ्या डोळ्यांवर लावला. मग मला शिलोआमाच्या तळ्यावर जाऊन चिखल धुण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी जाऊन धुतले व मला दृष्टी प्राप्त झाली."
त्यांनी विचारले, "तो मनुष्य कुठे आहे?"
तो म्हणाला, "मला माहीत नाही."
3. Multiplicação dos pães e peixes
Referência: Mateus 14:13-21
Explicação: Com apenas cinco pães e dois peixes, Jesus alimentou mais de 5 mil homens. Este sinal revela Cristo como o Pão da Vida, aquele que supre todas as nossas necessidades.
येशू पाच हजारांना जेवू घालतात
जे घडले ते ऐकल्यानंतर, येशू एका होडीत बसून एकटेच दूर एकांतस्थळी गेले, परंतु हे गर्दीतील लोकांनी ऐकले, तेव्हा शहरातील लोक त्यांच्याकडे पायी चालत आले. जेव्हा येशू होडीतून उतरले, त्यांनी मोठा समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला व त्यांनी आजार्यांना बरे केले.
संध्याकाळ झाल्यावर शिष्य येशूंकडे येऊन म्हणाले, "ही ओसाड जागा आहे शिवाय उशीरही होत आहे. लोकांना आसपासच्या गावात जाऊन काही अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या."
यावर येशूंनी उत्तर दिले, "त्यांना जाण्याची गरज नाही; तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या."
त्यांनी उत्तर दिले, "आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत."
येशू म्हणाले, "ते माझ्याकडे आणा." येशूंनी लोकांना गवतावर बसावयास सांगितले. मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले, स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरी मोडून शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले. ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या उचलल्या. जेवणार्या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती. यात स्त्रिया व मुले यांची संख्या धरलेली नाही.
4. Jesus acalma a tempestade
Referência: Marcos 4:35-41
Explicação: Com uma ordem, o vento e o mar se aquietam. O milagre ensina sobre a paz que excede o entendimento e a autoridade do Messias sobre a criação.
येशू वादळ शांत करतात
त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर, येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, "आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ." तेव्हा लोकांची गर्दी मागे सोडून शिष्य येशूंना ते जसे होडीत होते तसेच त्यांना त्यांच्याबरोबर घेऊन गेले. इतर होड्याही त्यांच्याबरोबर होत्या. थोड्याच वेळात सरोवरात भयंकर वादळ सुटले, लाटा होडीवर आदळू लागल्या आणि होडी बुडू लागली. येशू नावेच्या मागच्या भागास उशी घेऊन झोपी गेले होते. तेव्हा शिष्य त्यांना जागे करून म्हणाले, "गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत, याची तुम्हाला काळजी नाही काय?"
मग ते उठले आणि त्यांनी वार्याला धमकाविले व लाटांना, "शांत हो" असे म्हटले! तेव्हा ताबडतोब वादळ शमले आणि सर्व शांत झाले.
त्यांनी शिष्यांना विचारले, "तुम्ही इतके का घाबरला? तुम्हाला अद्यापही विश्वास नाही का?"
शिष्य घाबरून गेले आणि एकमेकास म्हणू लागले, "हे आहेत तरी कोण? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात?"
5. Cura da mulher com fluxo de sangue
Referência: Marcos 5:25-34
Explicação: Uma cura que aconteceu pelo toque da fé. Jesus mostra que está atento ao sofrimento individual e que a fé é o canal para receber o milagre.
आणि तिथे एक स्त्री होती, जी बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी होती. याकाळात तिने अनेक वैद्यांच्या उपचारांमुळे पुष्कळ दुःख सहन केले होते व ती कंगाल झाली होती आणि एवढे करूनही बरी न होता उलट तिचा आजार अधिकच बळावला होता. जेव्हा तिने येशूंबद्दल ऐकले, तेव्हा तिने मोठ्या गर्दीतून त्यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला. "मी त्यांच्या वस्त्राला नुसता स्पर्श जरी केला तरी बरी होईन," असे तिला वाटत होते. तत्काळ तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण आजारातून मुक्त झालो आहोत याची तिला शरीरात जाणीव झाली.
तत्क्षणी येशूंनी आपल्यामधून शक्ती बाहेर पडली असे जाणले आणि समुदायाकडे मागे वळून त्यांनी विचारले, "माझ्या वस्त्राला कोणी स्पर्श केला?"
"यावर त्यांचे शिष्य म्हणाले, एवढी मोठी गर्दी तुमच्याभोवती असताना तुम्ही विचारता, ‘मला कोणी स्पर्श केला?’ "
तरी आपल्याला कोणी स्पर्श केला, हे पाहण्यासाठी ते आजूबाजूला शोधू लागले. तेव्हा भयभीत झालेली ती स्त्री आपल्या बाबतीत काय घडले हे लक्षात घेऊन थरथर कापत आली आणि त्यांच्या पाया पडून तिने त्यांना सर्व खरे सांगितले. येशू तिला म्हणाले, "मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आता शांतीने जा आणि आपल्या पीडेपासून मुक्त राहा."
6. Libertação do endemoninhado Gadareno
Referência: Marcos 5:1-20
Explicação: Jesus liberta um homem dominado por uma legião de espíritos. É a prova clara de sua autoridade absoluta sobre o reino das trevas.
येशू भूतग्रस्त मनुष्यास बरे करतात
ते सरोवराच्या पलीकडे गरसेकरांच्या प्रांतात आले. येशू होडीतून उतरले, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कबरस्तानातून धावत बाहेर आला. हा मनुष्य स्मशानभूमीत राहत होता आणि त्याला बांधून ठेवणे अशक्य होते, साखळदंडाने बांधणेही शक्य नव्हते. बरेचदा त्याचे हात व पाय साखळदंडाने बांधले असतानाही त्याने साखळदंड तोडून टाकले व पायातील लोखंडाच्या बेड्यांचे तुकडे केले. त्याला ताब्यात ठेवण्याची ताकद कोणातही नव्हती. दिवस आणि रात्र तो स्वतःला दगडांनी ठेचून घेई व थडग्यामध्ये आणि डोंगरामधून मोठमोठ्याने ओरडत असे.
येशूंना त्याने दूर अंतरावरून पाहिले व तो धावत आला आणि त्यांच्यासमोर गुडघे टेकून पाया पडला, तो मोठ्याने ओरडून म्हणाला, "हे येशू, परात्पर परमेश्वराच्या पुत्रा, तुला माझ्याशी काय काम? परमेश्वराची शपथ मला छळू नकोस." कारण येशूंनी त्याला म्हटले होते, "अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून बाहेर ये."
"तुझे नाव काय?" येशूंनी विचारले,
त्याने उत्तर दिले, "माझे नाव लेगियोन आहे, कारण आम्ही पुष्कळजण आहोत. आम्हाला या प्रांतातून घालवून देऊ नकोस," अशी त्यांनी येशूंना पुन्हा विनंती केली.
त्याचवेळी डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. "आम्हाला त्या डुकरांमध्ये जाण्याची परवानगी दे." अशी भुतांनी येशूंना विनंती केली. येशूंनी त्यांना तशी परवानगी दिली, लगेच अशुद्ध आत्मे त्या मनुष्यातून बाहेर निघाले आणि डुकरांमध्ये शिरले व त्या दोन हजार डुकरांचा कळप डोंगराच्या उतरंडी वरून धावत सुटला आणि सरोवराच्या पाण्यात पडला व बुडाला.
डुकरांचे कळप राखणारे जवळच्या नगरात आणि ग्रामीण भागात जाऊन ही घटना सांगितली, काय घडले हे पाहावे म्हणून लोक बाहेर आले. जेव्हा ते येशूंकडे आले, तेव्हा त्यांनी त्या मनुष्याला पाहिले जो भुताच्या सैन्याने पछाडलेला होता तो बसलेला, कपडे घातलेला आणि भानावर आलेला आहे; हे पाहून ते अतिशय भयभीत झाले. प्रत्यक्ष पाहणार्यांनी भूतग्रस्त मनुष्याचे काय झाले आणि डुकरांच्या बाबतीत काय झाले, ते सर्वांना सांगितले. तेव्हा येशूंनी आमच्या भागातून निघून जावे अशी लोकांनी त्यांना विनंती केली.
येशू पुन्हा होडीत चढत असताना, जो मनुष्य पूर्वी भूतग्रस्त होता, त्याने आपल्यालाही बरोबर न्यावे, अशी येशूंना विनंती केली. पण येशूंनी ती मान्य केली नाही, परंतु ते त्याला म्हणाले, "आपल्या प्रियजनांकडे घरी जा आणि प्रभूने तुझ्यासाठी जे काही केले आणि तुझ्यावर किती मोठी दया केली हे त्यांना सांग." त्याप्रमाणे तो मनुष्य गेला आणि त्या भागात असलेल्या दकापलीस येथे येशूंनी त्याच्यासाठी किती मोठ्या गोष्टी केल्या हे सांगू लागला आणि प्रत्येकजण विस्मयाने थक्क झाला.
7. Ressurreição da filha de Jairo
Referência: Marcos 5:21-43
Explicação: Jesus demonstra que a morte para Ele é como o sono. Ele restaura a vida de uma criança, trazendo esperança para uma família desesperada.
येशू मृत बालिकेला जिवंत करतात व आजारी स्त्रीस बरे करतात
जेव्हा येशू होडीत बसून पलीकडच्या तीरावर गेले, तेव्हा त्यांच्याभोवती खूप मोठा समुदाय गोळा झाला, त्यावेळी ते सरोवराच्या किनार्याजवळ होते. त्यावेळी याईर नावाचा सभागृहाचा एक पुढारी आला, येशूंना पाहून त्यांच्या पाया पडला. त्यांना आग्रहाने विनंती करू लागला, "माझी लहान मुलगी मरणाच्या पंथाला लागली आहे, कृपा करून या व आपला हात तिच्यावर ठेवा म्हणजे ती बरी होईल व वाचेल." म्हणून येशू त्यांच्याबरोबर निघाले.
सभोवतालचा जमावही त्यांच्याबरोबर निघाला व गर्दी करू लागला. आणि तिथे एक स्त्री होती, जी बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी होती. याकाळात तिने अनेक वैद्यांच्या उपचारांमुळे पुष्कळ दुःख सहन केले होते व ती कंगाल झाली होती आणि एवढे करूनही बरी न होता उलट तिचा आजार अधिकच बळावला होता. जेव्हा तिने येशूंबद्दल ऐकले, तेव्हा तिने मोठ्या गर्दीतून त्यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला. "मी त्यांच्या वस्त्राला नुसता स्पर्श जरी केला तरी बरी होईन," असे तिला वाटत होते. तत्काळ तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण आजारातून मुक्त झालो आहोत याची तिला शरीरात जाणीव झाली.
तत्क्षणी येशूंनी आपल्यामधून शक्ती बाहेर पडली असे जाणले आणि समुदायाकडे मागे वळून त्यांनी विचारले, "माझ्या वस्त्राला कोणी स्पर्श केला?"
"यावर त्यांचे शिष्य म्हणाले, एवढी मोठी गर्दी तुमच्याभोवती असताना तुम्ही विचारता, ‘मला कोणी स्पर्श केला?’ "
तरी आपल्याला कोणी स्पर्श केला, हे पाहण्यासाठी ते आजूबाजूला शोधू लागले. तेव्हा भयभीत झालेली ती स्त्री आपल्या बाबतीत काय घडले हे लक्षात घेऊन थरथर कापत आली आणि त्यांच्या पाया पडून तिने त्यांना सर्व खरे सांगितले. येशू तिला म्हणाले, "मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आता शांतीने जा आणि आपल्या पीडेपासून मुक्त राहा."
येशू अजून बोलतच होते, तोच सभागृहाचा अधिकारी याईराच्या घरून काही लोक आले. ते म्हणाले, "तुमची कन्या मरण पावली आहे, आता गुरुजींना त्रास देण्यात अर्थ नाही."
त्यांचे बोलणे ऐकून येशू सभागृहाच्या अधिकार्याला म्हणाले, "भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव."
येशूंनी पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांच्याशिवाय कोणासही बरोबर येऊ दिले नाही. ते सभागृहाच्या अधिकार्याच्या घरी आले, तेव्हा गडबड व उच्च स्वरात लोकांची रडारड, आक्रोश त्यांना दिसून आला. ते आत गेले आणि लोकांना म्हणाले, "हा गोंधळ आणि आक्रोश कशासाठी? ही मुलगी मरण पावली नाही, पण झोपली आहे." परंतु ते त्याला हसू लागले.
त्या सर्वांना बाहेर घालविल्यावर, तिचे आईवडील आणि आपले शिष्य यांना घेऊन त्या बालिकेला ज्या खोलीत ठेवले होते तिथे गेले. तिच्या हाताला धरून येशू तिला म्हणाले, "तलीथा कूम!" (म्हणजे "छोट्या मुली, मी तुला सांगतो, ऊठ!") ते ऐकताच ती उठून उभी राहिली आणि चालू फिरू लागली. तिचे वय बारा वर्षाचे होते. यावरून त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. येशूंनी त्यांना कडक आदेश दिला की, याविषयी कोणाला सांगू नका व मुलीला काहीतरी खावयास द्यावे असे सांगितले.
8. Jesus anda sobre as águas
Referência: Mateus 14:22-33
Explicação: Ao caminhar sobre o Mar da Galileia, Jesus mostra que não está sujeito às leis da física. O episódio também serve para tratar a fé e a dúvida no coração de Pedro.
येशू पाण्यावरून चालतात
लगेच येशूंनी आपल्या शिष्यांना होडीत बसून पुढे सरोवराच्या पैलतीराला जाण्यास सांगितले आणि ते स्वतः लोकांना निरोप देण्यासाठी मागे राहिले. त्यांना निरोप दिल्यावर, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले. रात्र झाली तरी तिथे ते एकांती होते. तेव्हा होडी किनार्यापासून बरीच दूर गेली होती आणि वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत असल्यामुळे लाटांनी हेलकावे खात होती.
पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले. शिष्यांनी येशूंना सरोवरावरून चालताना पाहिले, तेव्हा ते फार घाबरले आणि ओरडून म्हणाले, "हे भूत आहे."
पण येशू त्यांना तत्काळ म्हणाले, "धीर धरा, मीच आहे. भिऊ नका."
मग पेत्र म्हणाला, "प्रभूजी, जर आपण असाल, तर पाण्यावरून चालत आपल्याकडे येण्यास मला सांगा."
ते म्हणाले "ये."
तेव्हा पेत्र होडीतून उतरला आणि पाण्यावरून येशूंकडे चालत जाऊ लागला. परंतु उंच लाटांकडे त्याचे लक्ष गेले, तेव्हा तो घाबरला आणि लागला, "प्रभूजी, मला वाचवा!" त्याने आरोळी मारली.
तत्क्षणी येशूंनी हात पुढे करून त्याला धरले. येशू म्हणाले, "अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?"
मग जेव्हा ते होडीत चढले तेव्हा वादळ शांत झाले. होडीत असलेले दुसरे शिष्य त्यांच्या पाया पडून म्हणाले, "खरोखर तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात."
9. Cura do paralítico
Referência: Marcos 2:1-12
Explicação: Jesus cura o corpo, mas primeiro perdoa os pecados. Este milagre estabelece que sua missão principal é a reconciliação espiritual do homem com Deus.
येशू पक्षघाती मनुष्याला बरे करून क्षमा करतात
काही दिवसानंतर, जेव्हा येशू कफर्णहूम या ठिकाणी पुन्हा आले, तेव्हा लोकांनी ऐकले की ते घरी आले आहेत. ते इतक्या मोठ्या संख्येने जमले की जागा उरली नाही, दाराबाहेरही जागा उरली नाही आणि येशूंनी वचनातून लोकांना उपदेश केला. तेवढ्यात काही लोक एका पक्षघाती मनुष्याला त्यांच्याकडे घेऊन आले, त्याला चार जणांनी उचलून आणले. आणि तिथे मोठी गर्दी असल्यामुळे ते त्या मनुष्याला येशूंजवळ घेऊन जाऊ शकले नाहीत, तेव्हा त्यांनी येशू जिथे बसले होते त्या ठिकाणचे छप्पर उघडले आणि तिथून त्या मनुष्याला त्याच्या अंथरुणासहित खाली सोडले जेव्हा येशूंनी त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा ते त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाले, "मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे."
हे ऐकून तिथे बसलेले काही नियमशास्त्र शिक्षक आपसात विचार करू लागले, "हा मनुष्य अशाप्रकारे का बोलतो? तो दुर्भाषण करतो! परमेश्वराशिवाय पापांची क्षमा कोण करू शकतो?"
ते काय विचार करीत आहेत, हे येशूंनी लगेच त्यांच्या आत्म्यामध्ये ओळखले आणि ते त्यांना म्हणाले, "तुम्ही या गोष्टींचा असा विचार का करता? या पक्षघाती मनुष्याला ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपले अंथरूण उचलून घे व चालू लाग’? यातून काय म्हणणे सोपे आहे. तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे." ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, "ऊठ, आपले अंथरूण उचल आणि घरी जा." तो मनुष्य उठला आणि लगेच अंथरूण उचलून त्या सर्वांसमोर चालत गेला. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले व सर्वांनी परमेश्वराची स्तुती केली. ते म्हणाले, "आम्ही असे काही कधीही पाहिले नाही!"
10. Ressurreição de Lázaro
Referência: João 11:1-44
Explicação: O milagre mais impactante antes da crucificação. Ao ressuscitar alguém morto há quatro dias, Jesus declara: "Eu sou a ressurreição e a vida".
लाजराचा मृत्यू
आता लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो मरीया व तिची बहीण मार्थाच्या बेथानी गावाचा होता. ही मरीया, जिचा भाऊ लाजर आजारी होता, तीच ही मरीया जिने प्रभूच्या मस्तकावर बहुमोल सुगंधी तेल ओतले आणि त्यांचे चरण आपल्या केसांनी पुसले होते. तेव्हा या बहिणींनी येशूंना निरोप पाठविला, "प्रभू, ज्यावर तुमची प्रीती आहे तो आजारी आहे."
येशूंनी हा निरोप ऐकला, तेव्हा ते म्हणाले, "या आजाराचा शेवट मृत्यूत होणार नाही. तर परमेश्वराच्या गौरवासाठी होईल आणि त्याद्वारे परमेश्वराच्या पुत्राचेही गौरव होईल." मार्था आणि तिची बहीण मरीया व लाजर यांच्यावर येशूंची प्रीती होती, तरी लाजर आजारी आहे हे ऐकूनही येशू ज्या ठिकाणी राहत होते, तिथेच अधिक दोन दिवस राहिले. यानंतर ते आपल्या शिष्यांना म्हणाले, "चला आपण परत यहूदीयात जाऊ."
परंतु शिष्य म्हणाले, "गुरुजी, थोड्याच दिवसांपूर्वी यहूदी आपल्याला धोंडमार करण्याचा प्रयत्न करीत होते आणि तरी आपण पुन्हा तिथे जाता काय?"
येशूंनी त्यांना उत्तर दिले, "दिवसात बारा तास प्रकाश असतो की नाही? जर कोणी दिवसा चालतो तर अडखळत नाही, कारण या पृथ्वीवरील प्रकाशामुळे त्याला दिसते. जेव्हा एखादी व्यक्ती रात्री चालते तेव्हा ती अडखळते, कारण तिच्याजवळ प्रकाश नसतो."
असे म्हटल्यानंतर, मग येशू त्यांना सांगू लागले, "आपला मित्र लाजर झोपी गेला आहे, परंतु मी जाऊन त्याला झोपेतून जागे करतो."
त्यांचे शिष्य म्हणाले, "प्रभूजी तो झोपला असेल, तर बरा होईल." येशू तर लाजराच्या मरणाविषयी बोलत होते, परंतु शिष्यांना वाटले की ते नैसर्गिक झोपेविषयीच बोलत आहेत.
मग येशूंनी त्यांना स्पष्टपणे सांगितले, "लाजर मरण पावला आहे, तुमच्यासाठी मी तिथे नव्हतो म्हणून मला आनंद होत आहे, यासाठी की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा. चला, आपण त्याच्याकडे जाऊ."
परंतु दिदुम म्हटलेला थोमा इतर शिष्यांना म्हणाला, "चला, आपणही त्यांच्याबरोबर मरू."
येशू मार्था आणि मरीयेचे सांत्वन करतात
ते तिथे पोहोचल्यावर, येशूंना समजले की, लाजराला कबरेत ठेऊन चार दिवस झाले होते. बेथानी हे गाव यरुशलेमपासून दोन मैलापेक्षा कमी अंतरावर होते. आणि अनेक यहूदी लोक मार्था व मरीया यांच्या भावाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. येशू येत आहेत हे ऐकताच, मार्था त्यांना भेटावयास सामोरी गेली, पण मरीया मात्र घरातच राहिली.
"प्रभूजी," मार्था येशूंना म्हणाली, "आपण येथे असता, तर माझा भाऊ मेला नसता. परंतु तरी आता जे काही आपण परमेश्वराजवळ मागाल, ते आपणास ते देतील हे मला ठाऊक आहे."
त्यावर येशूंनी तिला सांगितले, "तुझा भाऊ पुन्हा उठेल."
मार्था म्हणाली, "होय, अंतिम दिवशी, पुनरुत्थानाच्या दिवशी तो जिवंत होईल."
येशू तिला म्हणाले, "पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो कोणी मजवर विश्वास ठेवतो, तो मरण पावला असला, तरी पुन्हा जगेल; जो कोणी मजवर विश्वास ठेवून जगतो तो कधीही मरणार नाही. यावर तुझा विश्वास आहे काय?"
"होय, प्रभूजी," ती म्हणाली, "या जगात येणारा, तो ख्रिस्त (मसिहा), परमेश्वराचे पुत्र आपण आहात यावर माझा विश्वास आहे."
ती असे बोलल्यानंतर परत गेली व आपली बहीण मरीयेला बाजूला बोलावून म्हणाली, "गुरुजी आले आहेत आणि ते तुला विचारत आहेत." मरीयेने हे ऐकले तेव्हा ती त्वरेने उठून त्यांच्याकडे गेली. येशूंनी अद्याप गावात प्रवेश केलेला नव्हता, जिथे मार्था त्यांना भेटली त्याच ठिकाणी ते होते. जे यहूदी लोक मरीयेच्याजवळ घरात होते व तिचे सांत्वन करीत होते, त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिले, तेव्हा ती शोक करण्यासाठी कबरेकडेच जात आहे असे त्यांना वाटले आणि म्हणून तेही तिच्या पाठीमागे गेले.
येशू जिथे होते तिथे मरीया पोहोचल्यावर त्यांना पाहून ती त्यांच्या पाया पडली व त्यांना म्हणाली, "प्रभूजी, आपण येथे असता, तर माझा भाऊ मरण पावला नसता."
येशूंनी तिला असे रडताना आणि जे यहूदी तिच्याबरोबर होते त्यांना शोक करताना पाहिले, तेव्हा ते आत्म्यामध्ये व्याकूळ व अस्वस्थ झाले. येशूंनी विचारले, "तुम्ही त्याला कुठे ठेवले आहे?"
ते त्याला म्हणाले, "प्रभूजी, या आणि पाहा."
येशू रडले.
नंतर यहूदी म्हणाले, "पाहा, त्यांचे त्याच्यावर किती प्रेम होते!"
परंतु काहीजण म्हणाले, "ज्याने आंधळ्या मनुष्याचे डोळे उघडले, ते या मनुष्याला मरणापासून वाचवू शकले नाहीत का?"
येशू लाजराला मृतातून उठवितात
येशू पुन्हा व्याकूळ होऊन कबरेजवळ आले. ती एक गुहा होती आणि तिच्या प्रवेशद्वारावर धोंड लोटलेली होती. येशू म्हणाले, "धोंड बाजूला काढा."
मृत माणसाची बहीण मार्था म्हणाली, "परंतु प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी सुटली असेल, कारण त्याला तिथे ठेऊन चार दिवस झाले आहेत."
तेव्हा येशू म्हणाले, "मी तुला सांगितले नव्हते काय, की जर तू विश्वास ठेवशील तर परमेश्वराचे गौरव पाहशील?"
यास्तव त्यांनी ती धोंड बाजूला केली. मग येशूंनी दृष्टी वर करून म्हटले, "हे पित्या, तुम्ही माझे ऐकले म्हणून मी तुमचे आभार मानतो. मला माहीत आहे की तुम्ही नेहमीच माझे ऐकता, परंतु सर्व लोक जे येथे उभे आहेत, त्यांच्या हिताकरिता मी हे बोललो, यासाठी की तुम्ही मला पाठविले आहे यावर त्यांनी विश्वास ठेवावा."
हे बोलल्यावर, येशू मोठ्याने हाक मारून म्हणाले, "लाजरा, बाहेर ये!" लाजर बाहेर आला, त्याचे हातपाय पट्ट्यांनी बांधलेले होते व तोंडाभोवती कापड गुंडाळलेले होते.
येशूंनी लोकांस म्हटले, "त्याची प्रेतवस्त्रे काढा आणि त्याला जाऊ द्या."
Conclusão
Os milagres de Jesus revelam sua autoridade sobre a natureza, as enfermidades, o mundo espiritual e até a morte. Eles não são apenas demonstrações de poder, mas sinais que apontam para sua identidade e missão.
Ao estudar esses milagres, é possível compreender melhor o papel de Jesus e a mensagem central do Evangelho.
Se este conteúdo ajudou você a entender os milagres de Jesus na Bíblia, compartilhe este artigo para que mais pessoas também conheçam esses ensinamentos.