A palavra
A Palavra de Deus é viva, eficaz e mais cortante que espada de dois gumes. Ela é lâmpada, alimento e purificação — tudo o que o cristão precisa para viver e crescer em fé.
कारण परमेश्वराचे वचन जिवंत व सक्रिय आहे. ते कोणत्याही दुधारी तलवारीहून अधिक तीक्ष्ण असून जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा यांना खोलवर भेदून जाणारे व अंतःकरणातील विचार आणि वृत्ती यांचा न्याय करणारे आहे.
मी तुमची वचने माझ्या हृदयात जपून ठेवली आहेत,
जेणेकरून मी तुमच्याविरुद्ध पाप करू नये.
तुमचे वचन उलगडल्याने प्रकाश मिळतो;
ते साध्याभोळ्यांना शहाणपण देते.
प्रारंभी शब्द होता आणि शब्द परमेश्वरा समवेत होता आणि शब्द परमेश्वर होता.
शब्दाने मानवी शरीर धारण केले व आमच्यामध्ये त्यांनी वास्तव्य केले. आम्ही त्यांचे गौरव पाहिले, ते गौरव एकमेव पुत्राचे, जो पित्यापासून आला व अनुग्रह व सत्याने परिपूर्ण होता त्यांचे होते.
फक्त आत्माच सार्वकालिक जीवन देतो; देहाचे काही महत्त्व नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत, ती आत्मा व जीवन यांनी पूर्ण आहेत.
जे वचन मी तुम्हाला सांगितले आहे त्यामुळे तुम्ही आधी शुद्ध झालाच आहात.
तेव्हा येशूंनी उत्तर दिले, " ‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्या प्रत्येक वचनाने जगेल’ असे लिहिले आहे."
आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
तू सत्यवचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कोणतेही कारण नसलेला, परमेश्वराच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा तू स्वतःस परमेश्वराला सादर करण्याचा प्रयत्न कर.
नवीन जन्मलेल्या बालकांसारखे शुद्ध, आध्यात्मिक दुधाची इच्छा धरा म्हणजे तुम्ही तुमच्या तारणाच्या अनुभवामध्ये वाढत जाल.