A última palavra vem do Senhor
A última palavra pertence ao Senhor. Os planos do homem estão sujeitos à soberania de Deus. Ele rege toda a história e nenhum de seus propósitos pode ser frustrado.
जीवन आणि वर्तणूक ह्यांसंबधीची सूत्रे
मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे,
पण त्याच्या जिव्हेचे उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे.
परमेश्वराने सर्वकाही त्याच्या उद्देशासाठी बनवलेले आहे,
दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे.
देव मनुष्य नाही, की त्याने खोटे बोलावे,
किंवा तो काही मनुष्यप्राणी नाही की, त्याने मन बदलावे.
जर त्याने काही वचन दिले तर तो ते केल्याशिवाय राहील काय?
तो बोलला आहे मी हे करील तर ते तो पुरे केल्याशिवाय राहील काय?
परमेश्वर मोशेला म्हणाला, "माझा हात तोकडा आहे काय? आता माझे शब्द खरे आहेत की नाही हे तू पाहशील."
तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द निरर्थक होऊन परत माझ्याकडे येणार नाही,
परंतु जे मी इच्छिले ते पूर्ण करील आणि ज्यासाठी पाठवले ते यशस्वी होईल.
"पाहा! मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे. माझ्यासाठी काही अवघड आहे काय?"
"परमेश्वरा सर्वकाही तूच करु शकतोस ते मला माहीत आहे,
तू योजना आखतोस त्या प्रत्यक्षात कोणीही थांबवू शकत नाही.
परमेश्वराची जी इच्छा आहे तसे तो
आकाशात, पृथ्वीवर, समुद्रात आणि खोल महासागरात करतो.
तो सर्वांच्या आधीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्वकाही अस्तित्वात आहे.
आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.
पाहा! असा दिवस येत आहे! ते घडेलच!" प्रभू परमेश्वर असे म्हणतो, ज्या दिवसाबद्दल मी बोललो तो हाच आहे.
पण उद्या काय होईल हे तुम्हास माहीत नसते. तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही केवळ वाफ आहा; ती थोडा वेळ दिसते आणि नंतर, दिसेनाशी होते. त्याबद्दल तुम्ही असे म्हणा की, "परमेश्वराची इच्छा असल्यास आपण जिवंत असू आणि हे करू किंवा ते करू."