A última palavra vem do Senhor
A última palavra pertence ao Senhor. Os planos do homem estão sujeitos à soberania de Deus. Ele rege toda a história e nenhum de seus propósitos pode ser frustrado.
अंतःकरणाच्या योजना मानव करतो,
परंतु जिभेचे योग्य उत्तर याहवेहपासून येते.
याहवेह सर्व कार्ये योग्य रीतीने सिद्धीस नेतात.
दुष्टांच्या विनाशासाठी देखील त्यांनी एक दिवस नेमला आहे.
परमेश्वर मनुष्य नाहीत की त्यांनी लबाडी करावी,
ते मानव नाहीत, की त्यांनी आपले मन बदलावे.
याहवेह बोलणार आणि त्यानुसार करणार नाहीत काय?
त्यांनी अभिवचन दिले आणि ते पूर्ण करणार नाहीत काय?
याहवेहने मोशेला उत्तर दिले, "याहवेहचा हात इतका आखूड आहे काय? माझे शब्द घडून येतात की नाही हे तू आता पाहशील."
त्याप्रमाणे माझे वचन, जे माझ्या मुखातून बाहेर पडते:
ते कार्य केल्याशिवाय माझ्याकडे परत येत नाही,
पण ते माझ्या इच्छेप्रमाणे सर्व परिपूर्ण करते
व ज्या कार्यासाठी पाठविण्यात आले, तो माझा हेतू साध्य करते.
"मी, याहवेह, अखिल मानवजातीचा परमेश्वर आहे. मला कोणतीही गोष्ट करणे अवघड आहे का?
"तुम्हाला सर्वगोष्टी शक्य आहेत हे मला माहीत आहे;
तुमचा कोणताही उद्देश निष्फळ होत नाही.
याहवेह, स्वर्गात तसेच पृथ्वीवर,
सागरांमध्ये आणि त्याच्या अत्यंत खोलात देखील,
त्यांना जे योग्य वाटते, तेच ते करतात.
ते सर्व गोष्टींच्या पूर्वी आहेत आणि त्यांच्यामध्ये सर्वगोष्टी स्थिर राहतात,
आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
हे येत आहे! हे खचितच घडेल, हा तोच दिवस आहे ज्याबद्दल मी बोललो होतो, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
तुम्हाला उद्या काय आणि कसे होणार हे माहीत नाही. तुमचे जीवन ते काय आहे? तुम्ही त्या धुक्यासारखे आहात, जे थोड्या वेळासाठी दिसते आणि नाहीसे होते. याऐवजी, तुम्ही असे म्हणावयास हवे, "जर प्रभूची इच्छा असेल, तर आम्ही जगू व हे किंवा ते करू."