Admiração
O temor do Senhor é o princípio da sabedoria. A admiração reverente por Deus é a postura que produz conhecimento, obediência e bênção na vida do crente.
याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय,
परंतु मूर्ख माणसे सुज्ञान आणि शिक्षण तुच्छ लेखतात.
याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय,
आणि पवित्र परमेश्वराचे ज्ञान असणे हा सुज्ञपणा होय.
याहवेहचे भय धरणे हेच सुज्ञतेचे शिक्षण होय,
आणि सन्मान मिळण्याआधी विनम्रता येते.
अपार समृद्धी व त्यासोबत येणारी संकटे असणे,
यापेक्षा याहवेहचे भय बाळगून मिळविलेले थोडेसे धन बरे.
याहवेहचे भय धरणे म्हणजे वाईटाचा द्वेष करणे होय.
गर्विष्ठपणा आणि उद्धटपणा,
वाईट आचरण आणि विकृत भाषण यांचा मी तिरस्कार करते.
याहवेहचे भय ही नम्रता आहे;
त्याचे वेतन संपत्ती, सन्मान व दीर्घायुष्य आहे.
स्वतःच्या नजरेत शहाणा होऊ नकोस;
परंतु याहवेहचे भय बाळग आणि वाईटापासून दूर राहा.
हे तुझ्या देहाला आरोग्य देईल
आणि तुझ्या हाडांना पोषकसत्व असे होईल.
मोहकपणा फसवा असू शकतो आणि सौंदर्य टिकाऊ नसते,
परंतु याहवेहचे भय बाळगून त्यांचा आदर करणारी स्त्री प्रशंसनीय असते.
आता सर्व ऐकून झाले;
सर्व गोष्टींचा निष्कर्ष हाच की:
परमेश्वराचे भय बाळग आणि त्यांच्या आज्ञा पाळ,
कारण सर्व मानवजातीचे हेच कर्तव्य आहे.
याहवेहचे भय सुज्ञानाचा प्रारंभ होय;
त्यांच्या नियमाचे पालन करणार्यांना उत्तम आकलन शक्ती प्राप्त होते.
याहवेहची सदासर्वकाळ स्तुती होवो.
याहवेहचे स्तवन करा.
याहवेहचे भय बाळगणारे,
आणि त्यांच्या आज्ञापालनामध्ये आनंद मानणारे आशीर्वादित आहेत.
जे याहवेहचे भय बाळगतात,
आणि त्यांच्या आज्ञा पाळतात, ते धन्य!
परंतु जे त्यांचे भय धरतात,
ज्यांची आशा त्यांच्या अक्षय प्रीतीवर आहे, त्यांच्यावर याहवेहची दृष्टी असते.
ते त्यांना मृत्यूपासून सोडवून,
दुष्काळात त्यांच्या प्राणाचे रक्षण करतात.
परमेश्वर आम्हाला अजूनही आशीर्वाद देवोत,
जेणेकरून पृथ्वीवरील सर्व सीमा त्यांचे भय धरतील.
परंतु तुम्ही जे माझे नाव सन्माननीय मानता, त्या तुम्हासाठी नीतिमत्वाचा सूर्य उगवेल आणि त्याच्या किरणात आरोग्य असेल. मग तुम्ही बाहेर जाल व धष्टपुष्ट वासरांप्रमाणे बागडाल.
आता हे इस्राएली लोकहो, याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याजवळ मागतात ते एवढेच की तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय धरावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्या, त्यांच्यावर प्रीती करावी आणि पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने याहवेह तुमच्या परमेश्वराची सेवा करावी, आणि याहवेहच्या ज्या आज्ञा व नियम आज मी तुम्हाला देत आहे, त्या तुमच्या भल्यासाठीच आहेत, त्या तुम्ही पाळाव्या.
याहवेह तुमच्या परमेश्वराचेच तुम्ही अनुसरण करावे व त्यांचेच भय बाळगावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्यात, त्यांची वाणी ऐकावी; त्यांची सेवा करावी व त्यांनाच बिलगून राहावे.
या सुइणींनी परमेश्वराचे भय धरल्यामुळे परमेश्वराने त्यांची कुटुंबे स्थापित केली.
यास्तव, आपल्याला अशी अभिवचने मिळाली आहेत, म्हणून प्रिय मित्रांनो देहाला व आत्म्याला अशुद्ध करणार्या सर्व गोष्टींपासून आपण स्वतःला शुद्ध करू या आणि परमेश्वराविषयी आदरयुक्त भय बाळगून आपल्या पवित्रतेला सिद्ध करू या.
प्रत्येकाला त्याचे जे काही देणे असेल, ते द्या: जर कर द्यायचे तिथे कर द्या, महसूल असेल तर महसूल द्या. आणि जिथे सन्मान तिथे सन्मान, जिथे आदर तिथे आदर द्या.
"जो कोणी मित्रावर दया करण्यापासून स्वतःस आवरतो
त्याने सर्वसमर्थाचे भय सोडून दिले आहे.