Agradecimento a Deus
Agradecer a Deus é louvor, adoração e reconhecimento da sua soberania. Dai graças ao Senhor porque Ele é bom — a sua misericórdia dura para sempre!
कसानी बी काळजी करानी नही तर सर्व गोष्टीसबद्दल प्रार्थना अनी ईनंती करीसन आभार प्रदर्शनासंगे आपली मागणी देवले सांगा.
त्याना वाचणारासकरता पौलनी प्रार्थना
माले तुमनी जी एकंदर आठवण शे तिनावरतीन मी आपला देवना आभार मानस.
अनी बोलणं किंवा करनं जे काही तुम्हीन करशात, ते सर्व प्रभु येशुनं नावमा करा; यामुये तुम्हीन त्यानाद्वारा देवपितानं आभार मानतस.
थेस्सलनीकरसनं जिवन अनी ईश्वास
आम्हीन आमनी प्रार्थनामा तुमले याद करीसन कायम तुमना सर्वासकरता देवना उपकार मानतस. आपला देवबापसमोर तुमनं ईश्वासतीन करेल काम, प्रितीतीन करेल कष्ट, अनं आपला प्रभु येशु ख्रिस्तना आशामुये धरेल धीर यानं आम्हीन कायम स्मरण करतस.
येशुमा एकत्र व्हवामुये आशिर्वाद
ख्रिस्त येशुमा तुमनावर व्हयेल देवना अनुग्रहमूये मी कायम तुमनाबद्दल आपला देवनं उपकारस्मरण करस.
तरी जो देव आपला प्रभु येशु ख्रिस्त कडतीन आपलाले जिंकाडस त्यानी स्तुती असो.
ख्रिस्त कडतीन जयोत्सव
जो देव आमले कायम ख्रिस्तमा जयोत्सवतीन लई जास, अनी सर्व ठिकाणे आमनाकडतीन ख्रिस्तबद्दलना ज्ञानना सुंगध प्रकट करस. त्यानी स्तुती असो.
जो पेरणाराले बी पुरावस, अनी, खावाकरता अन्न पुरावस तो तुमले बी दी अनी ते भरपुर करी, अनी तुमनं उदारतानं फळ वाढाई. म्हणजे तुम्हीन सर्व प्रकारणा उदारपणकरता सर्व गोष्टीसघाई श्रीमंत व्हशात; त्या सर्व लोके तुमना दानकरता देवले धन्यवाद देतीन जे तुमले आमनाकडतीन भेटनं.
स्तोत्र, गीत, अनं अध्यात्मिक प्रबंध हाई एकमेकसले म्हणी दखाडा; आपला अंतःकरणमा प्रभुले गायनवादन करा; आपला प्रभु येशु ख्रिस्त ह्याना नावमा सर्व गोष्टीसबद्ल सर्वदा देवबापनी उपकारस्तुती करत जा.
बायको अनी नवरा
ख्रिस्तना भय धरीन एकमेकसना अधीन रावानं.
तवय येशुनी त्या पाच भाकरी अनी दोन मासा लिसन त्यावर स्वर्गकडे दखीसन आशिर्वाद मांगा, अनी भाकरी मोडीसन शिष्यना जोडे त्यासले वाढाले दिध्यात अनी त्यानी त्या दोन मासा बी सर्वासले वाढाले दिधात. मंग सर्व लोकसनी पोटभर जेवण करं. अनी शिष्यसनी उरेल मासान्या अनं भाकरीसना बारा डालक्या भरीन उचल्यात.