Agradecimento a Deus
Agradecer a Deus é louvor, adoração e reconhecimento da sua soberania. Dai graças ao Senhor porque Ele é bom — a sua misericórdia dura para sempre!
कृतज्ञ अंतःकरणांनी त्यांच्यापुढे येऊ;
आणि वाद्यसंगीतासह स्तुतिस्तोत्रे गाऊन स्तवन करू.
उपकारस्तुती करीत त्यांच्या द्वारातून आत जा;
स्तुती करीत त्यांच्या अंगणात प्रवेश करा;
त्यांचे उपकार माना, त्यांच्या नावाला महिमा द्या.
याहवेहची स्तुती असो!
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत;
त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.
तुम्हीच माझे परमेश्वर आहात आणि मी तुमचे स्तवन करेन;
तुम्हीच माझे परमेश्वर आहात, मी तुमचे स्तुतिगान करेन.
याहवेहच्या उपकारस्तुतीची गीते गा;
वीणेच्या साथीवर आमच्या परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा.
मी परमेश्वराची स्तुती गीत गाऊन करेन
आणि उपकारस्तुती करून त्यांचे गौरव करेन.
याहवेह माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहेत;
माझे हृदय त्यांच्यावर भरवसा ठेवते, तेच माझे साहाय्य करतात.
माझे अंतःकरण आनंदाने उड्या मारत आहे,
माझ्या गीताद्वारे मी त्यांचे स्तवन करेन.
आता, हे आमच्या परमेश्वरा, आम्ही तुमचे उपकार मानतो,
आणि तुमच्या वैभवी नावाची स्तुती करतो.
कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतीसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा.
उपकारस्तुती व प्रार्थना
जेव्हा मला तुमची आठवण होते त्या प्रत्येक वेळी मी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.
आणि जी काही कृती तुम्ही कराल व जे बोलाल, ते सर्व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आणि त्यांच्याद्वारे परमेश्वर जो पिता त्यांची उपकारस्तुती करा.
थेस्सलनीका मंडळीच्या विश्वासाबद्दल उपकारस्तुती
आमच्या प्रार्थनांमध्ये तुम्हाला निरंतर स्मरण करीत, तुमच्या सर्वांबद्दल सतत परमेश्वराचे आभार मानतो. आपले पिता परमेश्वरापुढे तुमचे विश्वासाचे कार्य व प्रीतीने केलेले श्रम आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील आशेचा धीर यांची आम्ही निरंतर आठवण करतो.
उपकारस्मरण
ख्रिस्त येशूंमध्ये जी कृपा तुम्हाला दिली, त्याबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.
परंतु आपण परमेश्वराचे आभार मानू, कारण तेच आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतात.
परंतु परमेश्वराची स्तुती असो! कारण ते आम्हाला ख्रिस्ताच्या विजयोत्सवात आमचे नेत्रृत्व करण्यास आमच्यापुढे चालतात व आम्ही त्यांचे दास असून त्यांच्यामागे चालतो आणि प्रभूंच्या ज्ञानाविषयीचा सुगंध सर्वत्र पसरविण्यासाठी ते आमचा उपयोग करून घेतात.
कारण तो पेरणार्यांसाठी बी पुरवितो आणि खाण्यासाठी भाकर पुरवितो तोच तुम्हालाही पेरण्यासाठी बियांचा भांडार वाढवेल व पुरवठा करेल आणि तुमच्या नीतिमत्वाच्या हंगामाची वाढ करेल. होय, तुम्ही सर्व दृष्टीने संपन्न व्हावे यासाठी की प्रत्येक प्रसंगी तुम्ही उदारपणे द्यावे व आमच्याद्वारे तुमच्या उदारतेबद्दल परमेश्वराचे आभारप्रदर्शन व्हावे.
आत्म्याने प्रेरित स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते गाऊन एकमेकांशी बोला. भजने गाऊन व संगीताद्वारे तुमच्या मनापासून प्रभूची स्तुती करा. आपले प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आपले परमेश्वर आणि पिता यांचे प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी उपकार माना.
ख्रिस्ती कुटुंबांसाठी सूचना
ख्रिस्ताबद्दल असलेल्या आदरामुळे एकमेकांच्या अधीन राहा.
मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले आणि स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरीचे तुकडे करून ते शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले आणि दोन मासळ्यांचेही असेच वाटप केले. ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले, आणि शिष्यांनी उरलेले भाकरीचे तुकडे व मासे गोळा केले त्यावेळी बारा टोपल्या उचलल्या.
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.