Agradecimento pela família
Agradecer pela família é reconhecer a bênção mais preciosa que Deus nos concede. Os filhos são herança do Senhor — cada membro da família é presente divino a ser celebrado.
मुले, ही याहवेहकडून मिळालेला वारसा आहे,
प्रसवशील कूस, हे याहवेहकडून लाभणारे प्रतिफळ आहे.
तरुणपणी झालेली मुले,
शूरवीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत.
ज्या पुरुषाचा भाता
अशा बाणांनी भरलेला आहे, तो धन्य!
असे पुरुष वेशीत आपल्या शत्रूशी न्यायालयात वाटाघाटी करतील,
तेव्हा ते लज्जित होणार नाहीत.
माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर;
माझ्या संपूर्ण अंतरात्म्या, त्यांच्या पवित्र नामाचे स्तवन कर.
हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर;
त्यांनी केलेले उपकार कधीही विसरू नको.
आम्ही त्या त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही,
आम्ही भावी पिढीच्या लोकांपुढे,
याहवेहचे गौरव करू आणि
त्यांच्या सामर्थ्याचे आणि चमत्कारांचे वर्णन करू.
वयस्क माणसांची नातवंडे त्यांचे गौरवी भूषण आहेत;
आणि मुलांचे भूषण त्यांचे मातापिता आहेत.
या बाळासाठी मी प्रार्थना केली, आणि याहवेहकडे मी जे मागितले त्यांनी ते मला दिले आहे.
उपकारस्तुती व प्रार्थना
जेव्हा मला तुमची आठवण होते त्या प्रत्येक वेळी मी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.
परमेश्वराच्या समक्षतेत जो सर्व आनंद आम्हाला तुमच्यामुळे झाला आहे त्याबद्दल आम्ही तुमच्याबद्दल परमेश्वराचे पुरेसे आभार कसे मानावयाचे?
अहो राष्ट्रातील सर्व कुळांनो याहवेहला गौरव द्या,
याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या.
प्रत्येक उत्तम व परिपूर्ण दान वरून आहे, ते स्वर्गातील प्रकाशाचे पिता जे छायेसारखे बदलत नाहीत, त्यांच्यापासून येते.
त्यांच्या पूर्णतेतून आम्हा सर्वांना कृपेवर कृपा भरून मिळाली आहे.
तेव्हा स्त्रिया नाओमीला म्हणाल्या: "याहवेहची स्तुती असो, ज्यांनी या दिवशी तुझी जबाबदारी घेऊन सोडविणाऱ्याशिवाय तुला सोडले नाही. तो संपूर्ण इस्राएलमध्ये प्रसिद्ध होवो! तो तुला नवजीवन देऊन तुझ्या वृद्धापकाळात तुला आधार देईल. कारण तुझी सून, जी तुझ्यावर प्रीती करते आणि जी सात मुलांपेक्षा अधिक उत्तम आहे, तिनेच त्याला जन्म दिला आहे."
जिवंत, जे जिवंत आहेत—ते तुमची स्तुती करतात,
जसे मी आज करीत आहे;
पालक त्यांच्या मुलांना
तुमच्या विश्वासूपणाबद्दल सांगतात.