Agradecimento pela vida
Agradecer pela vida é reconhecer que cada respiração é dom de Deus. Toda criatura que tem fôlego louve ao Senhor — porque Ele nos formou e nos sustenta com amor.
प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो.
परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वराच्या न्याय्य कृत्यांबद्दल स्तुती
परमेश्वराची स्तुती करा.
हे माझ्या जिवा, परमेश्वराची स्तुती कर.
मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची स्तुती करीन.
मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाची स्तवने गाईन.
तू माझे अंतर्याम निर्माण केलेस;
तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले.
मी तुला धन्यवाद देतो,
कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत,
हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो.
मी गुप्तस्थळी निर्माण होत असता,
आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे
माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती.
तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस;
माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी
ते सर्व तुझ्या पुस्तकात नमूद करून ठेवले होते.
मी माझ्या आयुष्यभर परमेश्वरास गाणे गाईन.
जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे मी गुणगान करीन.
माझे विचार त्यास गोड वाटो;
परमेश्वराजवळ मला आनंद होईल.
परमेश्वर हाच देव आहे हे जाणून घ्या.
त्यानेच आम्हास निर्माण केले, आणि आम्ही त्याचे आहोत.
आपण त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातील त्याचे मेंढरे आहोत.
त्याची उपकारस्तुती करत त्याच्या द्वारात,
आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा.
त्याचे उपकारस्मरण करा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
देवा! तुझी प्रेमदया किती मौल्यवान आहे.
मानवजात तुझ्या पंखांच्या सावलित आश्रय घेते.
ते तुझ्या घरातल्या समृद्धीमुळे तृप्त होतील.
तू आपल्या बहुमोल नदीतून त्यांना मनसोक्त पिण्यास देशील.
कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे.
तुझ्या प्रकाशात आम्ही प्रकाश पाहू.
मृत्यूपासून झालेल्या बचावाबद्दल उपकारस्तुती
हे परमेश्वरा, मी तुला उंच करीन, कारण तू मला उठून उभे केले आहेस आणि माझ्या शत्रूंना माझ्यावर हर्ष करू दिला नाहीस.
हे परमेश्वरा, मी तुला मदतीस हाक मारली आणि तू मला बरे केले.
हे परमेश्वरा तू माझ्या जीवाला मृतलोकांतून वर काढून आणलेस. मी खाचेत उतरू नये, म्हणून तू मला जिवंत राखले आहे.
देवाच्या न्याय्यत्वाबद्दल उपकारस्तुती
मी माझ्या सर्व हृदयाने परमेश्वरास धन्यवाद देईन;
मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.
तुझ्यामध्ये मी आनंद व हर्ष करीन,
हे परात्परा देवा, मी तुझ्या नावाचा महिमा गाईन.
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे सर्व गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना.
ईशस्तवन
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याला धन्यवाद असो; स्वर्गीय गोष्टीविषयी प्रत्येक आत्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हास ख्रिस्ताकडून आशीर्वादित केले आहे.
देवाचे अवर्णनीय दान जे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याबद्दल त्याची स्तुती असो!
आणि प्रकाशातील पवित्रजनांच्या वतनात तुम्ही भागीदार व्हावे, म्हणून ज्याने तुम्हास पात्र केले, त्या पित्याचे तुम्ही उपकार मानावेत. त्याने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून सोडवून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले आहे, आणि त्याच्याठायी त्याच्या रक्ताच्याद्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे पापांची क्षमा मिळाली आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वरूप व त्याचे कार्य
ख्रिस्त अदृश्य देवाचा प्रतिरूप आहे आणि सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. कारण स्वर्गात व पृथ्वीवर, दृश्य आणि अदृश्य, राजासने किंवा शासने, सत्ता किंवा शक्ती, अशा सर्व गोष्टी त्याच्याद्वारे केल्या गेल्या; सर्व गोष्टी त्याच्याद्वारे व त्याच्यामध्ये केल्या गेल्या. तो सर्वांच्या आधीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्वकाही अस्तित्वात आहे.
तेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हावे आणि असा चांगला प्रदेश दिल्याबद्दल तुमचा देव परमेश्वर ह्याचे गुणगान गावे.
परमेश्वरा, माझ्या जीवनातील वादविवादाकरिता तू मध्यस्थी केलीस, तू खंडणी भरून माझा जीव सोडवलास.
मी पर्वतांच्या तळापर्यंत गेलो;
पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले;
तथापि माझ्या देवा परमेश्वरा, तू माझा जीव खड्डयातून वरती काढला आहे.
जेव्हा माझा जीव माझ्या ठायी व्याकुळ झाला; तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले,
आणि माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात पोहंचली.