Agradecimento
O agradecimento é a linguagem natural do cristão. Em tudo dai graças! A gratidão a Deus transforma a perspectiva, fortalece a fé e produz alegria em todos os tempos.
Dar graças sempre
Em tudo dai graças, porque esta é a vontade de Deus em Cristo Jesus para convosco. A gratidão é atitude fundamental.
प्रत्येक गोष्टींत उपकार माना कारण तुमच्यासंबधी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे सर्व गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना.
ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता एक शरीर असे पाचारण्यांत आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा. आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याचे उपकारस्तुती करा.
ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता एक शरीर असे पाचारण्यांत आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा.
ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा. आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याचे उपकारस्तुती करा.
प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यांत उपकारस्तुती करीत जागृत रहा.
कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा;
Louvor e gratidão
Entrai pelas portas com ação de graças. Rendei graças ao Senhor porque Ele é bom e a sua bondade dura para sempre.
त्याची उपकारस्तुती करत त्याच्या द्वारात,
आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा.
त्याचे उपकारस्मरण करा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
परमेश्वराची उपकारस्तुती करा; कारण तो चांगला आहे,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
परमेश्वरास धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे.
आणि त्याची कराराची विश्वसनियता सर्वकाळ टिकणारी आहे.
उपकारस्तुती करीत त्याच्या सान्निध्यात प्रवेश करू;
स्तुतीचे स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.
कराण परमेश्वर महान देव आहे
आणि सर्व देवांहून तो श्रेष्ठ महान राजा आहे.
परमेश्वराची उपकारस्तुती करणे
आणि हे परात्परा, तुझ्या नावाला स्तुती गाणे ही चांगली गोष्ट आहे.
सकाळी तुझे वात्सल्य,
आणि प्रत्येकरात्री तुझ्या सत्यतेबद्दल निवेदन करणे.
जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो,
आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो,
त्यास मी देवाचे तारण दाखवेन.
तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देईन.
तू माझा देव आहेस; मी तुला उंचावीन.
अहो, तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या; कारण तो चांगला आहे;
कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
देवा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करतो.
Expressões de gratidão
Graças a Deus pelo seu dom inefável! A gratidão se expressa em oração, louvor e generosidade para com os outros.
देवाचे अवर्णनीय दान जे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याबद्दल त्याची स्तुती असो!
म्हणजे तुम्ही सर्व उदारतेसाठी प्रत्येक गोष्टीत संपन्न व्हाल व ती उदारता आमच्याद्वारे देवाचे उपकारस्मरण अधिक होण्यास कारणीभूत होईल.
पण देवाला धन्यवाद असो, जो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हास विजय देतो!
ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या कृपेबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या देवाचे उपकार मानतो.
मी तुमच्यातल्या सर्वांसाठी प्रथम येशू ख्रिस्ताच्या द्वारे माझ्या देवाचे उपकार मानतो कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे.
कारण त्यांनी देवाला ओळखले असता त्यांनी त्याचे देव म्हणून गौरव केले नाही किंवा उपकार मानले नाहीत. पण ते स्वतःच्या कल्पनांत विचारहीन झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकारमय झाले.
कारण सर्व गोष्टी त्याच्याकडून, त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी आहेत; त्यास युगानुयुग गौरव असो. आमेन.
परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो.
परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो, तुझ्याकडे पाहो व तुजवर दया करो.
परमेश्वर आपल्या प्रसन्नमुखासह तुजकडे पाहो व तुला शांती देवो.
परंतु मी आभार मानण्याच्या वाणीने तुझ्याकडे यज्ञ अर्पण करीन;
जो नवस मी केला आहे तो मी पूर्ण करीन,
तारण परमेश्वराकडूनच आहे."
बंधूनो, आम्ही सर्वदा तुम्हाविषयी देवाची उपकारस्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकांची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे;
माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुद्ध विवेकभावाने सेवा करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो.
मीही तुमच्यासाठी देवाला धन्यवाद देण्याचे आणि माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करण्याचे थांबवले नाही.
म्हणून, आम्हास अढळ असे राज्य कृपेने देण्यात येत असताना आपण त्याविषयी कृतज्ञता बाळगू या आणि आदराने व भयभीत होऊन देवाला मान्य होईल अशी त्याची सेवा करू;
म्हणून त्यांचे आम्ही पूर्ण कृतज्ञतेने, सर्व प्रकारे व सर्वत्र स्वागत करतो.
जेव्हा येशूने कुष्ठरोग्यांना पाहिले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, "जा आणि स्वतःला याजकांना दाखवा." ते याजकाकडे जात असतांनाच शुद्ध झाले, जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की आपण बरे झालो आहोत तेव्हा तो परत आला व तो मोठ्याने ओरडून देवाचे गौरव करू लागला. तो येशूच्या पायाजवळ खाली पडला व त्याने त्यास नमन केले. तसेच त्याने त्याचे उपकार मानले. तो एक शोमरोनी होता. येशू त्यास म्हणाला, "दहाजण शुद्ध झाले नाहीत काय? बाकीचे नऊजण कोठे आहेत? या विदेशी मनुष्याशिवाय कोणीही देवाचे गौरव करण्यासाठी परत आला नाही काय?" तो त्यास म्हणाला, "ऊठ आणि जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे."
तो कोणाएका खेड्यात जात असताना तेथे त्यास कुष्ठरोगाने ग्रस्त दहा पुरूष भेटले आणि ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले "येशू, स्वामी, आमच्यावर दया करा," असे बोलून त्यांनी त्याच्याकडे आरोळी केली. जेव्हा येशूने कुष्ठरोग्यांना पाहिले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, "जा आणि स्वतःला याजकांना दाखवा." ते याजकाकडे जात असतांनाच शुद्ध झाले, जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की आपण बरे झालो आहोत तेव्हा तो परत आला व तो मोठ्याने ओरडून देवाचे गौरव करू लागला. तो येशूच्या पायाजवळ खाली पडला व त्याने त्यास नमन केले. तसेच त्याने त्याचे उपकार मानले. तो एक शोमरोनी होता. येशू त्यास म्हणाला, "दहाजण शुद्ध झाले नाहीत काय? बाकीचे नऊजण कोठे आहेत? या विदेशी मनुष्याशिवाय कोणीही देवाचे गौरव करण्यासाठी परत आला नाही काय?" तो त्यास म्हणाला, "ऊठ आणि जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे."
मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो.