Agradecimento
O agradecimento é a linguagem natural do cristão. Em tudo dai graças! A gratidão a Deus transforma a perspectiva, fortalece a fé e produz alegria em todos os tempos.
Dar graças sempre
Em tudo dai graças, porque esta é a vontade de Deus em Cristo Jesus para convosco. A gratidão é atitude fundamental.
सर्व परिस्थितीत उपकारस्मरण करा, कारण ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्यासाठी परमेश्वराची इच्छा हीच आहे.
आपले प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आपले परमेश्वर आणि पिता यांचे प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी उपकार माना.
ख्रिस्ताची शांती, तुमच्या अंतःकरणात राज्य करो; कारण एकाच शरीराचे अवयव म्हणून तुम्हीही या शांतीसाठी बोलावलेले आहात. तुम्ही कृतज्ञ राहा. स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते, यांच्याद्वारे कृतज्ञ अंतःकरणातून परमेश्वराला गाणी गाऊन एकमेकांना पूर्ण सज्ञानाने शिकविताना आणि बोध देताना ख्रिस्ताचा संदेश तुम्हामध्ये विपुलतेने राहो. आणि जी काही कृती तुम्ही कराल व जे बोलाल, ते सर्व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आणि त्यांच्याद्वारे परमेश्वर जो पिता त्यांची उपकारस्तुती करा.
ख्रिस्ताची शांती, तुमच्या अंतःकरणात राज्य करो; कारण एकाच शरीराचे अवयव म्हणून तुम्हीही या शांतीसाठी बोलावलेले आहात. तुम्ही कृतज्ञ राहा.
स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते, यांच्याद्वारे कृतज्ञ अंतःकरणातून परमेश्वराला गाणी गाऊन एकमेकांना पूर्ण सज्ञानाने शिकविताना आणि बोध देताना ख्रिस्ताचा संदेश तुम्हामध्ये विपुलतेने राहो. आणि जी काही कृती तुम्ही कराल व जे बोलाल, ते सर्व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आणि त्यांच्याद्वारे परमेश्वर जो पिता त्यांची उपकारस्तुती करा.
जागृत राहून आणि उपकारस्तुतीसह प्रार्थनेत तत्पर राहा.
कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतीसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा.
Louvor e gratidão
Entrai pelas portas com ação de graças. Rendei graças ao Senhor porque Ele é bom e a sua bondade dura para sempre.
उपकारस्तुती करीत त्यांच्या द्वारातून आत जा;
स्तुती करीत त्यांच्या अंगणात प्रवेश करा;
त्यांचे उपकार माना, त्यांच्या नावाला महिमा द्या.
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत,
त्यांची करुणा सनातन आहे.
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत;
त्यांची दया सनातन आहे.
कृतज्ञ अंतःकरणांनी त्यांच्यापुढे येऊ;
आणि वाद्यसंगीतासह स्तुतिस्तोत्रे गाऊन स्तवन करू.
कारण याहवेह हे महान परमेश्वर आहेत;
समस्त दैवतांवर ते सर्वोच्च राजा आहेत.
याहवेहची स्तुती गाणे,
आणि हे परात्परा, तुमच्या नावाची गीते गाणे उत्तम आहे.
प्रातःकाळी तुमच्या करुणामय प्रीतीची,
आणि सायंकाळी तुमच्या विश्वसनीयतेची घोषणा,
जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ करतो तो माझे गौरव करतो आणि
जो कोणी आपले आचरण यथायोग्य ठेवतो, त्याला मी परमेश्वराचे तारण दाखवेन."
तुम्हीच माझे परमेश्वर आहात आणि मी तुमचे स्तवन करेन;
तुम्हीच माझे परमेश्वर आहात, मी तुमचे स्तुतिगान करेन.
याहवेहचे उपकारस्मरण करा,
कारण ते फार चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.
आता, हे आमच्या परमेश्वरा, आम्ही तुमचे उपकार मानतो,
आणि तुमच्या वैभवी नावाची स्तुती करतो.
Expressões de gratidão
Graças a Deus pelo seu dom inefável! A gratidão se expressa em oração, louvor e generosidade para com os outros.
परमेश्वराच्या अवर्णनीय देणगीबद्दल त्यांची स्तुती असो.
होय, तुम्ही सर्व दृष्टीने संपन्न व्हावे यासाठी की प्रत्येक प्रसंगी तुम्ही उदारपणे द्यावे व आमच्याद्वारे तुमच्या उदारतेबद्दल परमेश्वराचे आभारप्रदर्शन व्हावे.
परंतु आपण परमेश्वराचे आभार मानू, कारण तेच आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतात.
ख्रिस्त येशूंमध्ये जी कृपा तुम्हाला दिली, त्याबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.
प्रथम, तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे, म्हणून मी तुम्हा प्रत्येकासाठी येशू ख्रिस्ताद्वारे माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.
परमेश्वराचे ज्ञान त्यांना निश्चित होते, पण त्यांनी परमेश्वर म्हणून त्यांचे गौरव केले नाही अथवा त्यांचे आभारही मानले नाहीत. याउलट त्यांचे विचार पोकळ झाले आणि त्यांची मूर्ख मने अंधाराने व्याप्त झाली.
कारण त्यांच्यापासून आणि त्यांच्याद्वारे आणि त्यांच्यासाठी सर्वगोष्टी आहेत.
त्यांना सदासर्वकाळ गौरव असो! आमेन.
" ‘ "याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो
आणि तुमचे संरक्षण करो;
याहवेह आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो
आणि तुमच्यावर कृपा करो;
याहवेह आपले मुख तुमच्याकडे लावो,
आणि तुम्हाला शांती देवो." ’
परंतु मी, उपकारस्तुतीच्या जयघोषाने,
तुमच्यासाठी यज्ञ अर्पण करेन.
मी जो नवस केला होता, तो मी पूर्ण करेन.
मी म्हणेन, ‘तारण याहवेहकडून येते.’ "
बंधू आणि भगिनींनो, आम्ही सतत तुमच्यासाठी परमेश्वराचे आभार मानतो आणि तसे करणे योग्य आहे, कारण तुमचा विश्वास अधिकाधिक वाढत आहे आणि तुम्हा सर्वांचे जे एकमेकांवरील प्रेम आहे ते देखील वाढत आहे.
मी निरंतर प्रार्थनेत तुझी आठवण करताना, ज्या माझ्या पूर्वजांच्या परमेश्वराची मी शुद्ध मनाने सेवा करतो, त्यांचे आभार मानतो.
माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण ठेवून तुम्हासाठी आभार मानण्याचे मी थांबविले नाही.
आपल्याला असे अविचल राज्य प्राप्त होणार आहे, तेव्हा कृतज्ञ अंतःकरणांनी आणि आदरयुक्त भय बाळगून आपण परमेश्वराची उपासना करू या.
यामुळे आम्ही सर्वठिकाणी आणि प्रत्येक प्रकारे कृतज्ञतेने व मनापासून स्वागत करतो आणि श्रेष्ठ फेलिक्स आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत.
त्यांना पाहून येशू म्हणाले, "तुम्ही याजकाकडे जा आणि त्याला दाखवा." आणि ते वाटेत जात असतानाच त्यांचा कुष्ठरोग नाहीसा झाला.
त्यांच्यापैकी एकाने आपण शुद्ध झालो आहोत असे पाहिले, तेव्हा तो उच्चस्वराने परमेश्वराची स्तुती करीत परत आला. तो येशूंच्या पायाजवळ पालथा पडला आणि त्याने त्यांचे आभार मानले—तो एक शोमरोनी होता.
येशूंनी विचारले, "मी दहा लोकांना शुद्ध केले ना? मग बाकीचे नऊ कुठे आहेत? परमेश्वराचे गौरव करण्यासाठी हा एकटाच आणि तोही परकीय मनुष्य आला काय?" मग येशू त्याला म्हणाले, "ऊठ आणि जा; तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे."
ते गावात जात असताना, काही अंतरावर उभे असलेले दहा कुष्ठरोगी त्यांना भेटले. हे कुष्ठरोगी येशूंना मोठ्याने हाक मारून म्हणत होते, "येशू महाराज, आमच्यावर दया करा!"
त्यांना पाहून येशू म्हणाले, "तुम्ही याजकाकडे जा आणि त्याला दाखवा." आणि ते वाटेत जात असतानाच त्यांचा कुष्ठरोग नाहीसा झाला.
त्यांच्यापैकी एकाने आपण शुद्ध झालो आहोत असे पाहिले, तेव्हा तो उच्चस्वराने परमेश्वराची स्तुती करीत परत आला. तो येशूंच्या पायाजवळ पालथा पडला आणि त्याने त्यांचे आभार मानले—तो एक शोमरोनी होता.
येशूंनी विचारले, "मी दहा लोकांना शुद्ध केले ना? मग बाकीचे नऊ कुठे आहेत? परमेश्वराचे गौरव करण्यासाठी हा एकटाच आणि तोही परकीय मनुष्य आला काय?" मग येशू त्याला म्हणाले, "ऊठ आणि जा; तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे."
जेव्हा मला तुमची आठवण होते त्या प्रत्येक वेळी मी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.