Ajuda ao próximo
Ajudar o próximo é mandamento de Deus e expressão prática da fé. A Bíblia ensina que a fé sem obras é morta — e que servir ao menor dos irmãos é servir a Cristo.
कारण माले भूक लागेल व्हती तवय तुम्हीन माले खावाले दिधं, तिश लागेल व्हती तवय पाणी पेवाले दिधं; अनोळखी व्हतु तवय माले घरमा लिधं, उघडा व्हतु तवय माले कपडा दिधात; आजारी व्हतु तवय माले दखाले वनात, बंदिगृहमा व्हतु तवय माले भेटाले वनात. त्या येळले धार्मीक लोक त्याले उत्तर देतीन की, प्रभुजी, आम्हीन तुमले कवय भूक लागेल दखीन खावाले दिधं? कवय तिश लागेल दखीन पाणी पेवाले दिधं? तुमले कवय अनोळखी समजीसन घरमा लिधं? उघडा दखीसन कवय तुमले कपडा दिधात? अनी तुम्हीन आजारी शेतस किंवा बंदिगृहमा शेतस हाई दखीन कवय आम्हीन तुमले दखाले वनु? तवय राजा त्यासले उत्तर दि, मी तुमले सत्य सांगस की, जवय तुम्हीन मनामांगे येणारासपैकी एकसाठे बी हाई करतस म्हणजे ते मनासाठेच करेल शे!
जो तुनाकडे काही मांगस त्याले दे, अनी जो तुनाकडे उसनं मांगाले दखस त्यानापाईन पाठ फिरावु नको.
तसच तुमना प्रकाश लोकससमोर असा पडू द्या की, त्यासनी तुमना सत्कर्म दखीसन तुमना स्वर्गमधला बापनं गौरव कराले पाहिजे.
द्या म्हणजे परमेश्वर तुमले बी दि; चांगलं माप दाबीन, हालाईन वरपावत भरीन तुमना पदरमा टाकतीन; कारण ज्या मापघाई तुम्हीन मोजीन देतस त्याच मापघाई देवपाईन तुमले मोजीन भेटी."
तवय लोकसनी गर्दीनी त्याले ईचारं, "तर आम्हीन काय कराले पाहिजे?"
त्यानी त्यासले उत्तर दिधं, "ज्यानाजोडे दोन सदरा शेतस त्यानी ज्याले नही शे त्याले एक देवानं, अनी ज्यानाजोडे अन्न शे त्यानी बी तसच करानं."
जे तुमनं शे ते ईकीन गरिबसले दान करा, नही फाटनाऱ्या थैल्या, तसच आपलाकरता स्वर्गमाधलं विपुल धन करी ठेवा, तठे चोर येतस नही अनं धनले किडा लागत नही अनी गंज बी लागस नही. जठे तुमनं धन शे, तठे तुमनं मन बी लागी राही."
जशी मी तुमनावर प्रिती करी तशी तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी अशी मनी आज्ञा शे.
आपला मित्रकरता आपला जीव देवाना यानापेक्षा कोणी प्रिती मोठी नही.
सर्व गोष्टीसमा मी तुमले कित्ता घालीन दखाडी देयल शे की, तशीच मेहनत करीसन तुम्हीन अशक्त लोकसले मदत करानी, अनी ‘लेवापेक्षा देवामा धन्यता शे, अस जे प्रभु येशु स्वतः बोलना, त्या वचननी आठवण ठेवानी.’"
अस बोलानंतर पौलनी गुडघा टेकीन त्या सर्वाससंगे प्रार्थना करी. तवय त्या सर्व भलताच रडनात अनी त्यासनी पौलना गळामा गळा घालीन त्याना मुका लिधात अनी निरोप लिधा. मनं तोंड परत तुमले यानापुढे दिसाव नही, अस जे त्यानी सांगेल व्हतं त्यावरतीन त्यासले विशेष दुःख वाटनं, मंग त्यासनी त्याले जहाजपावत पोहचाडं.
पवित्र जणसना गरजा पुर्ण करा; आतिथ्य करामा तत्पर रावानं.
दुसरासले संतुष्ट करानं
आपण ज्या सशक्त शेतस, त्या सगळा आपण आपला लाभकरता न दखता, ज्या अशक्त शेतस त्यासना अशक्तपनानं भार वाहवाले पाहिजे.
एकमेकसना वझं वाहा, म्हणजे तुम्हीन ख्रिस्तना नियम पुर्ण करशात.
चोरी करनारासनी परत चोरी कराले नको; तर गरजवंतसले देवाले आपलाजवळ काही पाहिजे म्हणीसन जे उत्तम तेच आपला हातसघाई काम करत राव्हाले पाहिजे.
तुमनामा कोणी आपलाच हित दखाना नही तर दुसरासना बी दखाना.
ईश्वास अनं कर्म
मना भाऊ अनी बहिणीसवन, माले ईश्वास शे अस कोणी म्हणत व्हई अनी तो तसा वागत नही व्हई तर त्यापाईन काय लाभ? तो ईश्वास त्यानं तारण कराले शक्तीमान शे का? भाऊ किंवा बहिणीसकडे खराब कपडा व्हतीन; त्यासले रोजना जेवणनी वनवन शे. अनी तुमनामाधील कोणी त्यासले म्हणस शांततामा जा, तुमले पुरेसा कपडा मिळोत, अनी खाई पीसन तृप्त व्हा. पण त्याना शरिरले पाहिजे ते त्याले तुम्हीन देतस नही तर त्यापाईन काय लाभ? यानामायक ईश्वाससंगे जर कामे नहीत तर तो जात्या निर्जीव शे.
मंग जोडे संसारनी वस्तु ऱ्हाईसन अनं आपला बंधुले यानी गरज शे अस दखीसन बी जो स्वतःले त्यानी दया येऊ देस नही त्यानामा देवनी प्रिती कशी ऱ्हाई?