Alegria e felicidade
A alegria é fruto do Espírito e marca do cristão. Alegrai-vos sempre no Senhor! A Bíblia ensina que a alegria de Deus é nossa fortaleza — não depende de circunstâncias, mas da presença de Deus.
Alegrai-vos no Senhor
Alegrai-vos sempre no Senhor! Outra vez digo: alegrai-vos! Na presença de Deus há plenitude de alegria eterna.
प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा सांगतो, आनंद करा.
प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा सांगतो, आनंद करा.
तू मला जीवनाचा मार्ग शिकवला, तुझ्या उपस्थितीत विपुल हर्ष आहे, तुझ्या उजव्या हातात सुख सर्वकाळ आहेत.
तू मला जीवनाचा मार्ग शिकवला, तुझ्या उपस्थितीत विपुल हर्ष आहे, तुझ्या उजव्या हातात सुख सर्वकाळ आहेत.
मी परमेश्वरास नेहमी माझ्यासमोर ठेवतो म्हणून मी त्याच्या उजव्या हातातून कधीही ढळणार नाही.
त्यामुळे माझे हृदय आनंदी आहे; माझे मन त्यास उंच करते. खचित माझा देह सुद्धा सुरक्षित राहतो.
परंतु जे सर्व तुझ्यामध्ये आश्रय घेतात ते हर्ष करोत.
ते कायमचे हर्षोनाद करो, कारण तू त्यांचे रक्षण करतोस.
ज्यांना तुझे नाव प्रिय आहे, ते तुझ्यामध्ये आनंद करोत.
तू माझे लपण्याचे ठिकाण आहेस. तू मला संकटांपासून वाचवशील,
विजयाच्या गीताने तू मला वेढशील. (सेला)
अहो सर्व लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा.
विजयोत्सवाने देवाचा जयजयकार करा.
कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे;
तो दीनांना तारणाने गौरवितो.
Fruto do Espírito
O fruto do Espírito é amor, alegria, paz. A alegria do Senhor é nossa fortaleza — não depende do mundo.
पवित्र आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे; अशांविरूद्ध नियमशास्त्र नाही.
नहेम्या म्हणाला, "आता जा आणि सुग्रास अन्न खा, गोड पेये प्या. ज्यांना असे खाणेपिणे करता आलेले नाही त्यांना आपल्यातले काही खाद्य-पेय पाठवा. परमेश्वराचा हा पवित्र दिवस आहे. दु:खी राहू नका, कारण परमेश्वराचा आनंदच तुमचे सामर्थ्य आहे."
नहेम्या म्हणाला, "आता जा आणि सुग्रास अन्न खा, गोड पेये प्या. ज्यांना असे खाणेपिणे करता आलेले नाही त्यांना आपल्यातले काही खाद्य-पेय पाठवा. परमेश्वराचा हा पवित्र दिवस आहे. दु:खी राहू नका, कारण परमेश्वराचा आनंदच तुमचे सामर्थ्य आहे."
परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे;
ह्यात आपण आनंद व उल्लास करू.
तुझ्या आज्ञेच्या कराराचा मार्ग हीच माझी सर्व धनसंपत्ती
असे मानून मी त्यामध्ये अत्यानंद करतो.
तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे,
कारण त्याच्या योगे माझ्या मनाला आनंद होतो.
जो प्रत्येकजन परमेश्वराचा आदर करतो,
जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्यवादित आहे.
तू आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील, तू आनंदित होशील;
तू आशीर्वादित होऊन तुझी भरभराट होईल.
Alegria nas tribulações
Os que semeiam em lágrimas ceifarão com alegria. Tende por motivo de grande gozo quando caídes em diversas tentações.
जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतील ते हर्षाने आरोळी मारून कापणी करतील.
कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे.
रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच.
कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे.
रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच.
माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे सहनशीलता निर्माण होते.
जरी अंजिराच्या झाडांनी फळ दिले नाही आणि द्राक्षवेलींना काही उपज आले नाही,
जैतूनाच्या झाडाच्या उपजाने जरी निराशा झाली आणि शेतांतून अन्न उगवले नाही,
कळप वाड्यातून नाहीसे झाले असले, गोठ्यात गाई-गुरे उरली नसली,
तरी मी परमेश्वराठायी आनंद करीन, माझ्या तारणाऱ्या देवाजवळ उल्लास करीन.
आणि म्हणून ख्रिस्तासाठी आजारात, अपमानात, आपत्तीत, पाठलागात आणि दुःखात मी संतुष्ट असतो कारण मी जेव्हा अशक्त असतो तेव्हाच सशक्त आहे.
तुम्ही त्यास बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्यास पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसीत होता. कारण, तुमच्या विश्वासाचे प्रतिफळ, म्हणजे तुमच्या आत्म्याचे तारण तुम्ही मिळवत आहात.
तुम्ही त्यास बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्यास पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसीत होता. कारण, तुमच्या विश्वासाचे प्रतिफळ, म्हणजे तुमच्या आत्म्याचे तारण तुम्ही मिळवत आहात.
Alegria compartilhada
Alegrai-vos com os que se alegram. O Senhor fez coisas grandiosas por nós — alegrai-vos no Senhor e regozijai-vos.
आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे,
आनंद करणार्यांबरोबर आनंद करा आणि रडणार्यांबरोबर रडा.
कारण खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे.
कारण खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे.
आणि आता आशेचा देव तुम्हास तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे.
म्हणजे देवाच्या इच्छेने मी आनंदाने तुमच्याकडे यावे व तुमच्या सहवासात पुन्हा उत्तेजित व्हावे.
प्रत्येक मनुष्याने आपल्या मनात जे ठरवले असेल त्याप्रमाणे त्याने द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ आवडतो.
वास्तविक पाहता संतोषाने देवाची सेवा करीत असताना मिळणारे समाधान हा फार मोठा लाभ आहे.
या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवतो त्यावर आशा ठेवावी.
Jesus e a alegria
A minha alegria esteja em vós e a vossa alegria seja completa. Pedi e recebereis para que a vossa alegria seja plena.
माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी हे तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत.
माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी हे तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत.
आणि म्हणून, आता तुम्हास दुःख झाले आहे; तरी मी तुम्हास पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल आणि तुमच्यापासून तुमचा आनंद कोणीही हिरावून घेणार नाही.
तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही; मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की, तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.
जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.
पण विश्वासाशिवाय त्यास संतोषवणे अशक्य आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे आणि जे त्यास झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे.
Alegria eterna
Alegria eterna terão sobre suas cabeças. O Senhor reinará com alegria sobre o seu povo para todo o sempre.
तू राष्ट्राची वृद्धी केली आहे तू त्यांचा आनंद वाढवला आहे,
हंगामाच्या वेळी जसा आनंद होतो,
लूट वाटून घेतांना जसा आनंद होतो तसा ते तुझ्यासमोर आनंद करीत आहेत.
अगे सीयोन निवासिनी गजर कर आणि आनंदाने आरोळी मार, कारण इस्राएलाचा पवित्र तो तुझ्याठायी थोर आहे."
परमेश्वराने खंडून घेतलेले माघारी येतील आणि ते सियोनात गायन करीत
आणि त्यांच्या मस्तकावर सदासर्वकाळ असणारा आनंद राहील;
आनंदाने व हर्षांने ते भरून जातील; दु:ख आणि शोक दूर पळून जातील.
मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव अतीशय आनंदीत होतो.
कारण जसा पती फेटा घालून आपणाला सुशोभित करतो, आणि नवरी जशी अलंकाराणे स्वतःला भूषित करते,
तशी त्याने मला तारणाचे वस्रे नेसवली आहेत, मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे.
मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव अतीशय आनंदीत होतो.
कारण जसा पती फेटा घालून आपणाला सुशोभित करतो, आणि नवरी जशी अलंकाराणे स्वतःला भूषित करते,
तशी त्याने मला तारणाचे वस्रे नेसवली आहेत, मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे.
परमेश्वर तुझा देव, तुझ्यामध्ये आहे, तो तुला वाचवायला पराक्रमी असा आहे; तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद करील,
तो त्याच्या प्रेमासोबत तुझ्याकडे शांती घेऊन येईल.
तो गायनाने तुझ्याविषयी आनंद करील.
तुझ्या मार्गाने जा, आनंदाने आपली भाकर खा आणि आनंदीत मनाने आपला द्राक्षरस पी, कारण देवाने तुझी चांगली कृत्ये साजरी करण्यास मान्यता दिली आहे.
तू केलेल्या तारणाचा आनंद मला पुन्हा होऊ दे,
आणि उत्सुक आत्म्याने मला सावरून धर.
कारण तू त्यास सर्वकाळचा आशीर्वाद दिला आहे;
तू तुझ्या समक्षतेत त्यास हर्षाने आनंदित करतोस.
जेव्हा माझे मन खूप चिंताग्रस्त होते तेव्हा तुझ्यापसून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाला आनंदित करते.
परमेश्वर माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहे.
माझे हृदय त्याच्यावर विश्वास ठेवते आणि मला मदत करण्यात आली आहे.
यास्तव माझे हृदय मोठा हर्ष करते.
आणि मी त्याची स्तुती गीत गाऊन करीन.
नीतिमानाची आशा त्यांचा आनंद होईल,
पण दुष्टाची वर्षे कमी होतील.
मनुष्यास आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद होतो;
आणि योग्यसमयीचे शब्द किती चांगले आहे!
मनुष्यास आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद होतो;
आणि योग्यसमयीचे शब्द किती चांगले आहे!
नीतिमानाचा पिता फार उल्लासेल,
आणि सुज्ञ मुलास जन्म देणारा त्याच्याविषयी आनंदित होईल.
सदोदित आनंद करा. नित्य प्रार्थना करा. प्रत्येक गोष्टींत उपकार माना कारण तुमच्यासंबधी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.
त्याप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हास सांगतो.
स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या धनासारखे आहे, ती कोणाएका मनुष्यास सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात त्याने जाऊन, आपले सर्वस्व विकले आणि ते शेत विकत घेतले.