Aliança
A aliança é o modo como Deus se relaciona com seu povo. Da aliança com Noé à Nova Aliança em Cristo, Deus se compromete com amor e fidelidade irrevogáveis.
Alianças com Israel
Deus firmou aliança com Abraão, Moisés e Davi. No arco-íris, na lei, nas promessas — Ele é o Deus da aliança.
मग परमेश्वर नोआहला व त्याच्या पुत्रांना म्हणाले: "आता मी तुझ्याशी व तुझ्या वंशजांशी करार स्थापित करतो. तुम्ही तुमच्याबरोबर तारवातून आणलेल्या—पक्षी, गुरे आणि वन्यपशू—अशा सर्वप्रकारच्या सजीव प्राण्यांशी करार करतो. यापुढे सर्व सजिवांचा जलप्रलयाद्वारे मी कधीही नाश करणार नाही; पृथ्वीचा नाश करण्याकरिता मी दुसरा जलप्रलय केव्हाही पाठविणार नाही, असा मी तुझ्याशी करार करतो."
आणि परमेश्वर म्हणाले, "माझ्या आणि तुझ्यामध्ये व तुमच्याबरोबर जे सर्व जिवंत आहेत त्यांच्यामध्ये सर्वकाळाच्या पिढ्यांपर्यंत जो करार मी करतो त्याची खूण हीच आहे: पृथ्वी व माझ्यामध्ये केलेल्या कराराचे चिन्ह म्हणून माझे मेघधनुष्य मी मेघात ठेवले आहे
यापुढे सर्व सजिवांचा जलप्रलयाद्वारे मी कधीही नाश करणार नाही; पृथ्वीचा नाश करण्याकरिता मी दुसरा जलप्रलय केव्हाही पाठविणार नाही, असा मी तुझ्याशी करार करतो."
पृथ्वी व माझ्यामध्ये केलेल्या कराराचे चिन्ह म्हणून माझे मेघधनुष्य मी मेघात ठेवले आहे
त्या दिवशी याहवेहने अब्रामाशी करार केला; त्यांनी म्हटले, "मी तुझ्या वंशजांना इजिप्त देशाच्या नदीपासून फरात नदीपर्यंतचा जो सर्व प्रदेश— केनी, कनिज्जी, कदमोनी, हिथी, परिज्जी, रेफाईम, अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबूसी या लोकांचा देश देत आहे."
अब्रामाने भूमीपर्यंत लवून नमस्कार केला आणि परमेश्वर त्याला म्हणाले, "मी तुझ्याशी हा करार करतो: तू अनेक राष्ट्रांचा पिता होशील. आता येथून पुढे तुझे नाव अब्राम असे राहणार नाही, तर ते अब्राहाम असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे. मी तुला फलद्रूप करेन; मी तुझ्यापासून राष्ट्रे उदयास आणेल आणि तुझ्या संततीमधून राजे उत्पन्न होतील. तुझ्या व तुझ्या येणार्या पिढीबरोबर मी असा शाश्वत करार स्थापित करेन की, तुझा व तुझ्यानंतर तुझ्या संतानांचा मी परमेश्वर होईन. ज्या देशात आज तू परका आहेस, तो संपूर्ण कनान देश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन; आणि मी त्यांचा परमेश्वर होईन."
मग परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, "माझ्याशी केलेल्या कराराचे तू आणि तुझ्या येणार्या वंशजांनी पिढ्यान् पिढ्या पर्यंत पालन करावे. तू आणि तुझ्या वंशजांशी हा माझा करार म्हणजे: तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची तुम्ही सुंता केली पाहिजे. ही सुंता, तुझ्या आणि माझ्यामध्ये केलेल्या कराराचे चिन्ह होईल.
चौदाव्या वर्षी, केदोरलाओमेर व त्याचे मित्रराजे यांनी अष्टरोथ-कर्णईम येथील रेफाईम लोकांचा व हाम येथील जूजीम लोकांच्या टोळीचा व शावेह किर्याथाईम येथे एमी लोकांचा पराभव केला
आता जर तुम्ही पूर्णपणे माझे आज्ञापालन केले आणि माझा करार पाळला, तर सर्व राष्ट्रात तुम्ही माझे मोलवान धन व्हाल. जरी सर्व पृथ्वी माझी आहे,
"तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत व वाळवंटापासून फरात नदीपर्यंत मी तुमची सीमा स्थापित करेन. त्या देशात राहणारे लोक मी तुमच्या हाती देईन आणि तुम्ही त्यांना आपल्या पुढून घालवून टाकाल. त्यांच्याशी किंवा त्यांच्या दैवतांशी करार करू नये.
तेव्हा याहवेहने उत्तर दिले: "मी तुझ्याशी एक करार करीत आहे. तुझ्या लोकांसमोर मी असे चमत्कार करेन की जे संपूर्ण पृथ्वीवर कोणत्याही राष्ट्रात करण्यात आले नाहीत. ज्या लोकांमध्ये तू राहतो ते पाहतील की मी, याहवेहने तुझ्यासाठी केलेली कृत्ये किती भयावह आहेत.
मोशे त्या ठिकाणी भाकरी न खाता किंवा पाणी न पिता चाळीस दिवस व चाळीस रात्र याहवेहबरोबर राहिला आणि त्याने पाट्यांवर कराराचे शब्द, म्हणजेच दहा आज्ञा लिहिल्या.
मोशे त्या ठिकाणी भाकरी न खाता किंवा पाणी न पिता चाळीस दिवस व चाळीस रात्र याहवेहबरोबर राहिला आणि त्याने पाट्यांवर कराराचे शब्द, म्हणजेच दहा आज्ञा लिहिल्या.
त्यांनी आपला करार तुम्हाला घोषित केला, दहा आज्ञा, ज्या पालन करण्याची त्यांनी आज्ञा दिली आणि त्यांनी त्या दोन दगडी पाट्यांवर लिहिल्या.
म्हणून हे जाणून घ्या की, याहवेहच तुमचे परमेश्वर आहेत; ते विश्वासू परमेश्वर आहेत, जे त्यांच्यावर प्रीती करतात आणि त्यांच्या आज्ञा पाळतात, अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत ते आपल्या प्रीतीचा करार पाळतात.
Alianças renovadas
O povo renovava a aliança diante do Senhor. A fidelidade de Deus permanece mesmo quando o povo falha.
जेव्हा यार्देन नदी पार करण्यासाठी लोकांनी आपली छावणी उठविली, तेव्हा कराराचा कोश वाहून नेणारे याजक त्यांच्या पुढे निघाले. तो हंगामाचा काळ होता व त्या संपूर्ण काळात यार्देन नदीला पूर आलेला असतो. तरीही कोश वाहणारे याजक यार्देनपर्यंत पोहोचताच व त्यांचे पाय पाण्याला स्पर्श करताच, वरून वाहत येणारे पाण्याचे प्रवाह थांबले. सारेथान जवळील आदाम नावाच्या गावात खूप अंतरावर पाण्याची एक रास झाली, तर अराबाच्या समुद्राकडे (म्हणजे मृत समुद्रात) वाहणारे पाणी पूर्णपणे कापले गेले. तेव्हा लोक यरीहो समोर नदीपलीकडे गेले. सर्व इस्राएली लोकांच्या संपूर्ण राष्ट्राने कोरड्या जमिनीवरून पलीकडे जाईपर्यंत, याहवेहचा कराराचा कोश वाहून नेणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी थांबले आणि कोरड्या जमिनीवर उभे राहिले.
मग यहोयादाने याहवेह आणि राजा आणि प्रजा यांच्यात एक करार केला की ते याहवेहची प्रजा असणार. त्याने राजा आणि प्रजा यांच्यामध्येही एक करारही केला.
राजा त्या स्तंभाजवळ उभा राहिला आणि त्याने याहवेहसमोर याहवेहचे अनुसरण करणे आणि त्यांच्या आज्ञा, कायदा आणि नियमांचे पालन करणे आणि या ग्रंथात लिहिलेल्या शब्दांचे त्याच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि संपूर्ण आत्म्याने पालन करण्याच्या कराराची पुष्टी केली. नंतर सर्व लोकांनी आपणास त्या कराराशी वचनबद्ध केले.
तेव्हा यहोराम राजा शोमरोनातून बाहेर निघाला आणि सर्व इस्राएली लोकांना एकत्र केले. यहूदीयाचा राजा यहोशाफाटला हा निरोप पाठविला: "मोआबाच्या राजाने माझ्याविरुद्ध बंड पुकारले आहे. तेव्हा त्याच्याविरुद्ध लढण्यास माझ्यासोबत येशील काय?"
यहोशाफाटने उत्तर दिले, "मी तुझ्यासोबत येईन. जसा तू तसा मी, जे माझे लोक ते तुझे लोक, जे माझे घोडे ते तुझे घोडे."
तेव्हा योनाथानने दावीदाच्या घराण्याबरोबर एक करार केला, तो म्हणाला, "आता याहवेह दावीदाच्या शत्रूंची झडती घेवो." आणि योनाथानने दावीदाकडून त्याच्या आपल्या प्रीतिकरिता त्याच्या शपथेची पुष्टी केली, कारण आपल्या जिवासारखीच त्याने त्याच्यावर प्रीती केली.
मग याहवेह मोशेला म्हणाले, "अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारचा पुत्र फिनहासने इस्राएलवरील माझा क्रोध शांत केला आहे. कारण लोकांमधील माझ्या सन्मानाविषयी मी जितका ईर्ष्यावान आहे तितकाच तो सुद्धा होता म्हणून मी माझ्या ईर्षेने त्यांचा नाश केला नाही. म्हणून त्याला सांग मी त्याच्याशी शांतीचा करार करीत आहे. तो व त्याच्या वंशजासाठी हा सर्वकाळच्या याजकपणाचा करार असणार, कारण तो त्याच्या परमेश्वराच्या सन्मानासंबंधी ईर्ष्यावान होता आणि इस्राएली लोकांसाठी त्याने प्रायश्चित केले."
जेव्हा मोशे याहवेहशी बोलण्यासाठी सभामंडपात गेला, तेव्हा कराराच्या नियमाच्या कोशावर असलेल्या प्रायश्चिताच्या झाकणावरून, दोन करुबांमधून त्याच्याशी बोलत असलेली वाणी त्याने ऐकली. अशाप्रकारे याहवेह त्याच्याशी बोलले.
अहरोनाची काठी फुलते
याहवेह मोशेला म्हणाले, "इस्राएली लोकांशी बोल व त्यांच्याकडून त्यांच्या पूर्वजांच्या गोत्रांप्रमाणे प्रत्येक पुढार्याकडून एक काठी अशा बारा काठ्या घे. प्रत्येक पुरुषाचे नाव त्याच्या काठीवर लिही. लेवी वंशाच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही, कारण प्रत्येक पूर्वजांच्या गोत्राच्या पुढार्याची एक काठी असावी. सभामंडपात जिथे मी तुझी भेट घेत असतो, तिथे कराराच्या नियमाच्या कोशापुढे त्या काठ्या ठेवाव्या. ज्या पुरुषाची मी निवड करेन त्याच्या काठीला अंकुर फुटेल आणि इस्राएली लोक तुमच्याविरुद्ध सातत्याने जी कुरकुर करतात त्यापासून मी स्वतःची सुटका करेन."
म्हणून मोशे इस्राएली लोकांशी बोलला आणि त्यांच्या पुढार्यांनी त्याला बारा काठ्या दिल्या, त्यांच्या पूर्वजांच्या गोत्रांप्रमाणे प्रत्येक पुढार्याकडून एक काठी आणि त्यांच्यामध्ये एक अहरोनाची काठी होती. मोशेने त्या काठ्या कराराच्या नियमाच्या मंडपात याहवेहसमोर ठेवल्या.
दुसर्या दिवशी मोशे मंडपात गेला आणि अहरोनाची काठी जी लेवी वंशाच्या वतीने ठेवली होती, ती केवळ अंकुरितच नव्हे तर त्याला कळी आली असून तिच्यावर बदाम पिकलेले दिसले. मग मोशेने त्या सर्व काठ्या याहवेहच्या समक्षतेतून इस्राएली लोकांकडे आणल्या. त्यांनी त्या पाहिल्या आणि प्रत्येक पुढार्याने आपआपली काठी घेतली.
तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, "अहरोनाची काठी कराराच्या नियमाच्या कोशापुढे परत ठेव, बंड करणार्यांना चिन्ह म्हणून ती तिथे ठेवावी. अशाने माझ्याविरुद्ध करीत असलेल्या त्यांच्या कुरकुरीचा शेवट होईल, म्हणजे ते मरणार नाहीत." याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणेच मोशेने केले.
एहूद
एकदा पुन्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले आणि म्हणून याहवेहने मोआबाचा राजा एग्लोनला इस्राएलावर वर्चस्व करण्यास दिले. एग्लोन अम्मोनी व अमालेकींना सोबत घेऊन आला आणि त्याने इस्राएली लोकांवर हल्ला केला आणि त्यांनी खजुरीच्या झाडांचे शहर ताब्यात घेतले.
Nova Aliança
Eis que dias vêm em que farei nova aliança. Jesus é mediador de uma aliança superior, fundamentada em melhores promessas.
"असे दिवस येतील जेव्हा,
इस्राएलच्या लोकांशी व यहूदीयाच्या लोकांशी
मी एक नवीन करार करेन,"
याहवेह म्हणतात.
"मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून
त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले,
तेव्हा मी त्यांच्याशी केलेल्या
कराराप्रमाणे हा करार नसेल.
मी जरी त्यांचा पती होतो,
तरी त्यांनी माझा करार मोडला."
असे याहवेह जाहीर करतात.
"परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार करेन तो असा"
याहवेह जाहीर करतात, "त्या वेळेनंतर
मी माझा नियम त्यांच्या मनात ठेवेन,
आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन,
मी त्यांचा परमेश्वर होईन,
आणि ते माझे लोक होतील.
कोणीही आपल्या शेजाऱ्याला बोध करणार नाही,
किंवा ‘याहवेहला ओळखा’ असे कोणी कोणाला बोलणार नाही,
कारण लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण
मला ओळखतील,"
असे याहवेह जाहीर करतात.
"मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन
व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही."
"याहवेह असे म्हणतात, ‘मी दिवसाशी केलेला करार व रात्रीशी केलेला करार तुम्ही मोडू शकला, तर दिवस व रात्र योग्य समयी येणार नाहीत, मग माझा सेवक दावीद याच्या बरोबरचा माझा करार—त्याचप्रमाणे माझ्या समक्षतेत उभे राहून सेवा करणारे लेवीय याजक यांच्या बरोबरचा माझा करार—भंग पावू शकेल आणि दावीदाच्या सिंहासनावर बसून राज्य करण्यास त्याचा कोणीही वंशज असणार नाही.
याकारणास्तव ख्रिस्त हे नव्या कराराचे मध्यस्थ आहेत, ज्यांना पाचारण झाले आहे, त्यांनी जुन्या करारानुसार जी पापे केली, त्यांच्या शिक्षेपासून मुक्ती मिळावी म्हणून ख्रिस्ताने स्वतःच्या मृत्यूद्वारे खंडणी भरून त्यांना सोडवावे व त्यांना सार्वकालिक जीवनाच्या वारसाचे अभिवचन मिळावे.
याकारणास्तव ख्रिस्त हे नव्या कराराचे मध्यस्थ आहेत, ज्यांना पाचारण झाले आहे, त्यांनी जुन्या करारानुसार जी पापे केली, त्यांच्या शिक्षेपासून मुक्ती मिळावी म्हणून ख्रिस्ताने स्वतःच्या मृत्यूद्वारे खंडणी भरून त्यांना सोडवावे व त्यांना सार्वकालिक जीवनाच्या वारसाचे अभिवचन मिळावे.
परंतु येशूंना मिळालेले सेवाकार्य त्यांच्यापेक्षा जेवढे श्रेष्ठ आहे तेवढेच ते जुन्या करारापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण अधिक चांगल्या अभिवचनांवर आधारित असलेल्या नवीन कराराचे ते मध्यस्थ आहेत.
आशीर्वाद आणि अंतिम शुभेच्छा
आता ज्या शांतीच्या परमेश्वराने, सार्वकालिक कराराच्या रक्ताने, आपले प्रभू येशू, जे मेंढरांचे महान मेंढपाळ आहेत, यांना मेलेल्यातून माघारी आणले, ते परमेश्वर त्यांच्या दृष्टीने जे योग्य ते आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताद्वारे करोत व प्रत्येक कामात त्यांना संतोषविण्यास तुम्हाला सिद्ध करो. त्यांना सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
नव्या कराराची सेवा करणारे म्हणून त्यांनी आम्हाला योग्य केले आहे. हा करार लेखी नव्हे तर आत्म्यापासून आहे; लेख मृत करतो, परंतु पवित्र आत्मा जीवन देतो.
अलंकारिक रूपात या गोष्टी घेतल्या आहेत पाहा: या स्त्रिया दोन करार आहेत. त्यापैकी एक करार आहे सीनाय पर्वतावर केलेला करार ज्यामुळे दास्यत्वाच्या संतानाचा जन्म होतो: ही हागार आहे. आता हागार ही अरबस्थानातील सीनाय पर्वत असा आहे आणि आता अस्तित्वात असलेल्या यरुशलेम शहराचे प्रतीक आहे, कारण ती तिच्या संतानाबरोबर दास्यात आहे. परंतु यरुशलेम जी वर आहे ती स्वतंत्र आहे आणि ती आपली मातृनगरी आहे.
Fidelidade da aliança
A aliança de Deus é eterna. Ele não quebra seu pacto nem altera o que saiu dos seus lábios.
परंतु याहवेहची प्रेममयदया त्यांचे भय धरणार्यांवर
अनादि पासून अनंतकालापर्यंत
तथा त्यांची नीतिमत्ता त्याच्या पुत्र पौत्रांना लाभते.
जे त्यांच्या कराराशी प्रामाणिक राहतात,
आणि त्यांच्या आज्ञा पाळण्याची आठवण ठेवतात.
याहवेह म्हणतात, "माझ्याबाबतीत म्हणाल, तर त्यांच्याशी केलेला हा माझा करार आहे. माझा पवित्र आत्मा जो तुमच्यावर आहे, तो तुमचा त्याग करणार नाही आणि माझे वचन जे मी तुमच्या मुखात घातले आहे, ते सदोदित तुमच्या ओठांवर, तुमच्या संततीच्या ओठांवर आणि त्यांच्या वंशजांच्या ओठांवर; आतापासून आणि सदासर्वकाळ राहील," असे याहवेह म्हणतात.
" ‘मी त्यांच्याशी शांतीचा करार करेन आणि क्रूर श्वापदांपासून देशाची सुटका करेन म्हणजे ते अरण्यात राहू शकतील आणि जंगलात सुरक्षित झोपतील.
याहवेह स्वतः तुझ्यापुढे चालतील आणि तुझ्याबरोबर राहतील; ते तुला कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाहीत. भिऊ नकोस; निरुत्साही होऊ नकोस."
तो एका ‘सप्तका’ साठी अनेकांसोबत कराराची पुष्टी करेल. ‘सप्तका’ मध्ये, यज्ञ करण्यास व अन्नार्पणे वाहण्याचे बंद करेल. आणि मंदिरात अमंगळ वस्तू स्थापित करेल, ज्यामुळे ओसाडी पडेल. नेमलेल्या समाप्तीपर्यंत सर्वनाश करणार्यावर कोपाचा वर्षाव होईल."
"दक्षिणेचा राजा सामर्थ्यशाली होईल, परंतु त्याच्या सेनापतींपैकी एक त्याच्यापेक्षाही बलाढ्य होईल आणि तो स्वतःच्या राज्यावर बलशाली होऊन राज्य करेल. काही वर्षानंतर ते एकमेकांशी सलोखा करतील. दक्षिणेच्या राजाची कन्या उत्तरेच्या राजाकडे तह करण्यासाठी जाईल, परंतु तिच्याकडे सामर्थ्य राहणार नाही आणि तो व त्याची शक्ती टिकणार नाही. त्या दिवसांत, शाही रक्षकांसह आणि तिचे वडील आणि मदतनीस तिच्यासोबत विश्वासघात करतील.
आक्रमण करणारा त्याला वाटेल तसे तो करेल; त्याच्या विरोधात कोणीही उभे राहू शकणार नाही. तो सुंदर देशात स्वतःची स्थापना करेल आणि त्याचा नाश करण्याची शक्ती त्याच्याकडे असेल. तो आपल्या राज्याच्या सर्व सामर्थ्याने येण्याचा निर्धार करेल आणि तो दक्षिणेच्या राजाबरोबर करार करेल. त्याचे राज्य जिंकण्यासाठी तो आपली एक मुलगी विवाहात देईल, परंतु त्याची ही योजना यशस्वी होणार नाही वा त्याला काही मदत मिळणार नाही.
"मी माझ्या डोळ्यांशी करार केला आहे
की कोणा तरुण स्त्रीकडे कुवासनेने पाहणार नाही.
सुज्ञान तुला व्यभिचारी स्त्रीपासूनसुद्धा वाचवेल,
तिच्या लाडिक बोलण्याने तुला मोहात पाडणार्या स्त्रीपासून,
जिने आपला तारुण्यातील सहचारी सोडला आहे,
आणि परमेश्वरासमोर केलेल्या कराराकडे दुर्लक्ष केले आहे.
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.