Alma
A alma é a parte mais íntima do ser humano — sede da vida, dos afetos e do encontro com Deus. A Bíblia convida a cuidar da alma com zelo e a aquietá-la diante do Senhor.
A alma diante de Deus
Bendize ao Senhor, ó minha alma! A alma suspira por Deus como a corça suspira pelas águas — com sede de eternidade.
माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर;
माझ्या संपूर्ण अंतरात्म्या, त्यांच्या पवित्र नामाचे स्तवन कर.
हे परमेश्वरा, तुम्ही माझे परमेश्वर आहात,
मी तुमचा कळकळीने शोध करतो;
या कोरड्या आणि वैराण भूमीत
माझा जीव तुमच्यासाठी तहानलेला झाला आहे;
माझे सर्वस्व तुमच्यासाठी किती
उत्कंठित झाले आहे.
हे माझ्या जिवा, तू खिन्न का झालास?
आतल्याआत का तळमळत आहेस?
परमेश्वरावर आपली आशा ठेव,
मी पुनः माझा तारणारा आणि
माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.
परमेश्वरामध्ये निश्चितच माझ्या जिवास विश्रांती आहे;
माझे तारण त्यांच्याकडून येते.
मोठ्या अपेक्षेने माझा जीव याहवेहची वाट पाहतो,
आणि मी माझी आशा त्यांच्या वचनावर टाकली आहे.
हर्षभराने माझे ओठ तुमचा जयजयकार करतील
आणि तुम्ही माझा उद्धार केला
म्हणून मी तुमची स्तुतिस्तोत्रे उच्चस्वराने गाईन.
याहवेहचे नियम उत्कृष्ट आहेत;
ते आत्म्याला ताजेतवाने करतात.
याहवेहचे नियम विश्वसनीय आहेत,
ते भोळ्यांना सुज्ञ करतात.
माझ्या शरीरातील अंतरंगाची घडण तुम्हीच केली आहे;
माझ्या मातेच्या उदरात माझी देहरचना केली.
मी तुमची स्तुती करतो,
कारण तुम्ही मला भयपूर्ण व अद्भुत रीतीने निर्माण केले आहे;
तुमचे हे कार्य किती अद्भुत आहे,
हे मी पूर्णपणे जाणतो.
हे याहवेह,
असत्य बोलणार्या ओठांपासून
व कपटी जिव्हेपासून माझा बचाव करा.
Cuidar da alma
Que aproveita ao homem ganhar o mundo inteiro e perder a sua alma? Buscar a Deus de toda alma é o caminho da vida.
कोणी सर्व जग मिळविले आणि आपला आत्मा गमविला तर त्यातून काय चांगले निष्पन्न होणार? आपल्या आत्म्याच्या मोबदल्यात मनुष्याला दुसरे काही देता येईल का?
येशूंनी उत्तर दिले, " ‘प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती करा.’
जे तुमच्या शरीराचा वध करू शकतात, परंतु आत्म्याचा नाश करू शकत नाहीत, अशांना भिऊ नका. तर तुमचा आत्मा आणि शरीर या दोहोंचा नरकामध्ये जे नाश करू शकतात, त्या परमेश्वराचे मात्र भय धरा.
परंतु तिथे असताना जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचा शोध घ्याल आणि संपूर्ण मनाने व जिवाने त्यांना शोधाल, तर ते तुम्हाला सापडतील.
परंतु याहवेहचा सेवक मोशेने तुम्हाला दिलेल्या आज्ञा आणि नियमांचे काळजीपूर्वक पालन करा: याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करा, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागा आणि त्यांच्या नियमानुसार चला, याहवेहला धरून राहा व तुमच्या सर्व अंतःकरणाने आणि तुमच्या संपूर्ण जिवाने त्यांची सेवा करा."
"आता मी लवकरच सर्व जग जाते त्या वाटेने जाणार आहे. तुम्हाला तुमच्या सर्व हृदयाने व जिवाने माहीत आहे की, याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या अभिवचनातील एकही निष्फळ झाले नाही. प्रत्येक अभिवचन पूर्ण झाले आहे; एकही निष्फळ झाले नाही.
तुम्ही माझा शोध कराल, मनापासून माझा शोध कराल, तेव्हा मी तुम्हाला सापडेन."
याहवेह असे म्हणतात:
"चौरस्त्यावर उभे राहा व पाहा;
पुरातन मार्गाची विचारणा करा,
तो चांगला मार्ग कुठे आहे ते विचारा आणि त्या मार्गाने जा,
तसे केल्यास तुमच्या आत्म्याला शांती लाभेल.
परंतु तुम्ही म्हटले, ‘आम्ही त्या मार्गाने चालणार नाही.’
मधुर शब्द मधाच्या पोळासारखे असतात;
ते आत्म्याला गोड वाटतात आणि हाडांना आरोग्य देतात.
प्रिय मित्रा, मी प्रार्थना करतो की, तुला चांगले आरोग्य लाभो आणि तुझ्याबरोबर सर्वकाही चांगले होत जावो, जशी तुझ्या आत्म्याचीसुद्धा उन्नती होत आहे.