Amor de casal
O amor de casal é celebrado na Bíblia como dom sagrado. O Cântico dos Cânticos exalta a beleza do amor conjugal — íntimo, exclusivo e forte como a morte.
तू आपल्या हृदयावर शिक्क्याप्रमाणे,
आपल्या बाहूवर शिक्क्यासारखी मला ठेव.
कारण प्रेम मृत्यूसारखेच शक्तीशाली आहे. प्रेमसंशय मृतलोकासारखा कठोर आहे.
त्याची ज्वाला, अग्नीज्वालेसारखी,
किंबहुना प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे.
असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही.
महापुरांनी तिला बुडवून टाकिता येणार नाही.
जरी मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी,
ती त्यापुढे अगदी तुच्छ होय.
अगे माझ्या बहिणी, माझ्या वधू,
तू माझे हृदय हरण केले आहेस.
तुझ्या नेत्रकटाक्षाने, तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने
तू माझे हृदय चोरले आहेस.
(तरुणी आपल्या प्रियकराशी बोलत आहे) तू माझे मुखचुंबन घे,
कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा उत्तम आहे.
तुझ्या अभिषेकाच्या तेलाचा सुगंध मोहक आहे,
तुझे नाव दरवळणाऱ्या सुवासासारखे आहे. त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात.
(तिचा प्रियकर तिच्याशी बोलतो) पाहा माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस!
तू फारच सुंदर आहेस.
तुझे डोळे कबुतरासारखे आहेत.
(तरुणी आपल्या प्रियकराशी बोलते) पाहा, माझ्या प्रियकरा, तू देखणा आहेस, तू किती देखणा आहेस.
आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखावह आहे.
नंतर परमेश्वर देव बोलला, "मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी सुसंगत मदतनीस निर्माण करीन."
परमेश्वर देवाने मनुष्याची बरगडी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला मनुष्याकडे आणले. तेव्हा मनुष्य म्हणाला,
"आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व माझ्या मांसातले मांस आहे;
मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो,
कारण ती नरापासून बनवलेली आहे."
म्हणून मनुष्य आपल्या आई वडीलांस सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील.
ज्या कोणाला पत्नी मिळते त्यास चांगली वस्तू मिळते,
आणि त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो.
तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त होवो,
आणि तरुणपणी केलेल्या पत्नीसह तू संतुष्ट रहा.
कारण ती सुंदर हरीणी आणि आकर्षक रानशेळी आहे.
तिचे स्तन तुला सर्वदा आनंदाने भरोत;
तू तिच्या प्रेमाने नेहमी आनंदीत रहा.
माझ्या मुला, व्यभिचारी स्त्रीने तुला कां आनंदित करावे;
तू परक्या स्त्रीच्या उराचे आलिंगन कां करावे?
म्हणून दोन व्यक्ती या दोन नाहीत तर एक आहेत. देवाने त्या दोघांना एकत्र जोडले आहे. म्हणून कोणाही व्यक्तीने त्यांना वेगळे करू नये."
प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही. प्रीती गैरशिस्तपणे वागत नाही, स्वहित पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. प्रीती अनीतीत आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी ती आनंद मानते. प्रीती सर्व गोष्टी सहन करते, सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टींची आशा करते, सर्व गोष्टी सहन करते.
याप्रकारे पतींनी सुद्धा आपल्या पत्नीवर असेच प्रेम करावे, जसे ते स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात, जो कोणी त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम करतो, तो स्वतःवर प्रेम करतो. कारण आतापर्यंत कोणीही आपल्या शरीराचा द्वेष केला नाही. उलट तो त्याचे पोषण करतो, त्याची काळजी घेतो. ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे पोषण करतो व काळजी घेतो.
तरीही, तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे व पत्नीनेही पतीचा मान राखला पाहिजे.
पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा.
एकापेक्षा काम करणारे दोन माणसे बरी आहेत.
कारण त्यांच्या एकत्र श्रमाने ते चांगले वेतन मिळवू शकतात.
जर एखादा पडला तर त्याचा दुसरा मित्र त्यास उचलतो.
पण जो एकटाच असून पडतो त्यास उचलण्यास कोणी नसते, त्याच्यामागे दुःख येते.
आणि जर दोघे एकत्र झोपले तर त्यांना ऊब येऊ शकते.
परंतु एकट्याला ऊब कशी काय येऊ शकेल?
जो मनुष्य एकटा आहे त्यास कोणी भारी झाला
तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल.
तीन पदरी दोरी सहसा तुटत नाही.
आणि त्याच्या जवळ आत्म्याचे शेष होते तरी त्याने एक केले नाही काय? आणि त्याने तुम्हास एक का केले? कारण तो ईश्वरीय संततीची आशा बाळगत होता. म्हणून तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण करा, आणि कोणीही आपल्या तरूणपणाच्या पत्नी सोबत विश्वासघात करू नये.
एखाद्याचे नुकतेच लग्न झाले असेल तर त्यास सैन्यात मोहिमेवर पाठवू नये. तसेच त्याच्यावर विशेष कामगिरी सोपवू नये. नववधूला सुखी ठेवण्यासाठी वर्षभर घरीच राहण्याची मोकळीक त्यास द्यावी.