Amor de casal
O amor de casal é celebrado na Bíblia como dom sagrado. O Cântico dos Cânticos exalta a beleza do amor conjugal — íntimo, exclusivo e forte como a morte.
तू मला आपल्या हृदयावर मोहर लावल्याप्रमाणे ठेव,
मुद्रेप्रमाणे आपल्या भुजांवर मला ठेव;
कारण मृत्यूप्रमाणेच प्रीती प्रबळ आहे,
तिचा हेवा कबरेप्रमाणे आहे.
तिचे उद्रेक अग्निज्वालेप्रमाणे उसळतात,
ते खरोखर आगीचे लोळच असतात.
प्रेमाचा अग्नी विपुल जलाशयांनी विझत नाही;
नद्यांमध्ये महापूर आला तरी ती बुडत नाही.
एखाद्याने आपल्या घरातील
संपूर्ण संपत्ती देऊ केली तरी
प्रेमापुढे ती अगदी तुच्छ होय.
मित्र
अगे माझ्या भगिनी, माझी वधू;
तुझ्या एकाच नजरेने
तुझ्या माळेच्या एकाच मणीने
तू माझे हृदय चोरून घेतले आहेस.
तो आपल्या मुखाच्या चुंबनांनी माझे चुंबन घेवो—
कारण तुझे प्रेम हे द्राक्षारसापेक्षा आनंददायक आहे.
तुझ्या अत्तरांचा सुगंध सुखदायक आहे;
तुझे नाव ओतलेल्या अत्तरासारखे आहे.
तरुण कुमारी तुझ्यावर प्रेम करतात यात आश्चर्य नाही!
माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस!
अहा, किती सुंदर!
तुझे नयन कबुतरे आहेत.
नायिका
माझ्या वल्लभा, तू किती सुंदर दिसतोस!
अहा, किती मोहक!
आणि आपले अंथरूण ताजेतवाने आहे.
नायक
याहवेह परमेश्वर म्हणाले, "मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी एक योग्य मदतनीस निर्माण करेन."
याहवेह परमेश्वराने मानवाची जी फासळी काढली, त्याची त्यांनी एक स्त्री निर्माण केली आणि तिला त्यांनी मानवाकडे आणले.
तेव्हा मानव म्हणाला,
"ही माझ्या हाडाचे हाड
आणि मांसाचे मांस आहे;
हिला नारी असे म्हणतील,
कारण ती नरापासून बनविली आहे."
या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती एकदेह होतील.
ज्याला पत्नी लाभते, त्याला चांगुलपणा प्राप्त झाला आहे.
ती त्याच्यासाठी याहवेहकडून आनंददायी भेट आहे.
तुझे पौरुषत्व आशीर्वादित होवो;
आपल्या तारुण्यातील पत्नीबरोबर आनंदाचा उपभोग घे.
प्रेमळ हरिणी सारखी, एक आकर्षक हरिणी अशी ती—
तिचे स्तन तुला नेहमीच तृप्त करोत,
तिच्या प्रेमाने तू नेहमी धुंद व्हावेस.
माझ्या मुला, तू दुसर्या मनुष्याच्या पत्नीबरोबर धुंद का व्हावेस?
आणि स्वैर स्त्रीला आलिंगन का द्यावेस?
म्हणून येथून पुढे ते दोघे नसून एकदेह आहेत. म्हणून परमेश्वराने जे जोडले आहे, ते कोणीही विभक्त करू नये."
प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे. ती कधीही हेवा किंवा मत्सर करीत नाही, कधीही अभिमान बाळगत नाही, गर्व करीत नाही. ती कधीही इतरांचा अपमान करीत नाही, स्वार्थ पाहत नाही किंवा सहज चिडत नाही. ती अयोग्य गोष्टींची कधीही नोंद ठेवीत नाही. प्रीती वाईट गोष्टींमध्ये आनंद मानत नाही परंतु सत्यामध्ये आनंद मानते. प्रीती नेहमी संरक्षण करते, सर्वदा विश्वास ठेवते, सर्वदा आशा धरते आणि सर्वदा धीर धरते.
याचप्रमाणे पतींनीही त्यांच्या पत्नीवर, त्या आपलेच शरीर आहेत, असे समजून प्रीती करावी. जो त्याच्या पत्नीवर प्रीती करतो, तो स्वतःवर प्रीती करतो. कोणी कधीही स्वतःच्याच शरीराचा द्वेष केला नाही, परंतु ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे संगोपन करून काळजी घेतात त्याप्रमाणे करतो.
म्हणून तुम्ही प्रत्येकाने जशी आपणावर तशीच आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीनेही आपल्या पतीचा सन्मान करावा.
आणि या सर्व सद्गुणांपेक्षा प्रीती धारण करा कारण त्यामुळे तुम्ही सर्वजण प्रीतीमध्ये एकत्र बांधले जाल.
एकापेक्षा दोघेजण बरे!
कारण त्यांच्या कष्टाचे अधिक चांगले प्रतिफळ मिळेल:
दोघांपैकी एकजण पडला,
तर दुसरा त्याला मदत करून उठवेल,
परंतु एकजण पडला आणि त्याला उचलण्यास कोणी नसला
तर ते दयनीय आहे.
जेव्हा दोन व्यक्ती झोपतील तेव्हा ते एकमेकांना ऊब देतील,
पण कोणी एकटा असल्यास, त्याला ऊब कशी मिळणार?
एकट्या व्यक्तीवर मात करता येते,
दोघे स्वतःचा बचाव करू शकतात,
तीन पदरी दोर सहजपणे तुटत नाही.
तुम्हाला एकाच परमेश्वराने निर्माण केले नाही का? तुमचे शरीर व आत्मा त्यांचाच मालकीचे आहे. आणि एका परमेश्वरास काय हवे असते? धार्मिक संतती. म्हणून सावध राहा, आपल्या तारुण्यातील पत्नीचा विश्वासघात करू नका.
नुकतेच विवाह झालेल्या पुरुषाला सैन्याबरोबर मोहिमेवर पाठवू नये किंवा त्याच्यावर इतर कुठलीही जबाबदारी टाकू नये. त्याला वर्षभर घरी राहण्याची मोकळीक असावी आणि त्याने घरी राहून आपल्या विवाहित पत्नीला आनंदित करावे.