Amor verdadeiro
O amor verdadeiro vem de Deus. Não é emoção passageira — é decisão, sacrifício e compromisso eterno. O perfeito amor lança fora o medo e nunca deixará de existir.
कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
"मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देत आहे: तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्वजण ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात."
परंतु परमेश्वर आम्हावरील स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण असे देतात की, आम्ही पापी असताना, ख्रिस्त आम्हासाठी मरण पावले.
कारण माझी खात्री आहे की ना मरण ना जीवन, ना देवदूत ना भुते, ना वर्तमान ना भविष्यकाळ, ना कोणती शक्ती, अथवा उंची, खोली आणि सृष्टीमधील कोणतीही गोष्ट आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधील परमेश्वराच्या प्रीतीपासून आपणास विभक्त करू शकणार नाही.
प्रीती शेजार्याचे काही वाईट करीत नाही, म्हणूनच ती नियमशास्त्राची परिपूर्ती करते.
प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे. ती कधीही हेवा किंवा मत्सर करीत नाही, कधीही अभिमान बाळगत नाही, गर्व करीत नाही. ती कधीही इतरांचा अपमान करीत नाही, स्वार्थ पाहत नाही किंवा सहज चिडत नाही. ती अयोग्य गोष्टींची कधीही नोंद ठेवीत नाही. प्रीती वाईट गोष्टींमध्ये आनंद मानत नाही परंतु सत्यामध्ये आनंद मानते. प्रीती नेहमी संरक्षण करते, सर्वदा विश्वास ठेवते, सर्वदा आशा धरते आणि सर्वदा धीर धरते.
भविष्यनिवेदन करण्याचे दान समाप्त होईल, वेगवेगळी भाषा बोलण्याचे दान स्तब्ध होईल आणि बुद्धीचे ज्ञान नाहीसे होईल; परंतु प्रीती अखंडपणे टिकून राहील.
परंतु जे प्रीती करीत नाहीत, ते परमेश्वराला ओळखत नाहीत, कारण परमेश्वर प्रीती आहेत.
प्रीतीमध्ये भय नसते. पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते, कारण भीतीमध्ये शासन असते. जो भीती बाळगतो तो प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नसतो.
परमेश्वराच्या आज्ञा पाळणे म्हणजे त्यांच्यावर प्रीती करणे होय आणि त्यांच्या आज्ञा जाचक नाहीत
परंतु आत्म्याचे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा,