Amor
O amor é o maior mandamento e a essência de Deus. Deus é amor. Nós amamos porque Ele nos amou primeiro. O amor cristão é sacrificial, incondicional e eterno — refletindo o coração do Pai.
Deus é amor
Deus é amor. Quem permanece no amor permanece em Deus. Nós amamos porque Ele nos amou primeiro — com amor eterno.
परमेश्वराची प्रीती व आपली प्रीती
प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीती करू या, कारण प्रीती परमेश्वरापासून आहे. जे कोणी प्रीती करतात ते परमेश्वरापासून जन्मले आहेत आणि ते परमेश्वराला ओळखतात. परंतु जे प्रीती करीत नाहीत, ते परमेश्वराला ओळखत नाहीत, कारण परमेश्वर प्रीती आहेत.
परमेश्वराची प्रीती व आपली प्रीती
प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीती करू या, कारण प्रीती परमेश्वरापासून आहे. जे कोणी प्रीती करतात ते परमेश्वरापासून जन्मले आहेत आणि ते परमेश्वराला ओळखतात.
परंतु जे प्रीती करीत नाहीत, ते परमेश्वराला ओळखत नाहीत, कारण परमेश्वर प्रीती आहेत.
परमेश्वराची प्रीती आपल्यावर आहे, ती आपण ओळखतो आणि तिच्यावर अवलंबून राहतो.
परमेश्वर प्रीती आहेत. जे प्रीतीत राहतात ते परमेश्वरामध्ये राहतात आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये राहतात. अशा रीतीने प्रीती आपल्यामध्ये पूर्ण होते, यासाठी की न्यायाच्या दिवशी आपल्याला असा आत्मविश्वास प्राप्त व्हावाः या जगात आपण येशू सारखे आहोत. प्रीतीमध्ये भय नसते. पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते, कारण भीतीमध्ये शासन असते. जो भीती बाळगतो तो प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नसतो.
परमेश्वराची प्रीती आपल्यावर आहे, ती आपण ओळखतो आणि तिच्यावर अवलंबून राहतो.
परमेश्वर प्रीती आहेत. जे प्रीतीत राहतात ते परमेश्वरामध्ये राहतात आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये राहतात.
आम्ही त्यांच्यावर प्रीती करतो, कारण त्यांनी प्रथम आम्हावर प्रीती केली.
आम्ही त्यांच्यावर प्रीती करतो, कारण त्यांनी प्रथम आम्हावर प्रीती केली. जे कोणी परमेश्वरावर प्रीती करण्याचा दावा करतात, तरी आपल्या भावाचा किंवा बहिणीचा द्वेष करतात तर ते लबाड आहेत. कारण जर कोणी आपल्या भावाला आणि बहिणीला पाहत असूनही त्यांच्यावर प्रीती करीत नाही, तर ते परमेश्वरावर प्रीती करू शकत नाहीत, ज्यांना त्यांनी पाहिलेले नाही.
प्रिय मित्रांनो, ज्याअर्थी परमेश्वराने आपल्यावर एवढी प्रीती केली, त्याअर्थी आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे.
परमेश्वराला कोणीही कधीही पाहिले नाही; परंतु जर आपण एकमेकांवर प्रीती केली तर, परमेश्वर आपल्यामध्ये राहतात आणि त्यांची प्रीती आपल्यामध्ये पूर्ण झाली आहे.
परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिली आहेः जे कोणी परमेश्वरावर प्रीती करतात त्यांनी आपल्या भावावर आणि बहिणीवर सुद्धा प्रीती करावी.
प्रीती काय आहे हे यावरून आपल्याला समजते की, येशू ख्रिस्ताने त्यांचे जीवन आपल्यासाठी दिले आणि म्हणून आपणही आपल्या भावांसाठी आणि बहिणींसाठी आपले जीवन दिले पाहिजे. जर कोणाजवळ ऐहिक संपत्ती असेल आणि तो पाहतो की त्याचा भाऊ किंवा बहीण गरजेत आहे परंतु त्याला त्यांची दया येत नाही, तर अशा व्यक्तीमध्ये परमेश्वराची प्रीती कशी असू शकेल? प्रिय लेकरांनो, आपण शब्दांनी किंवा कोरड्या बोलण्याने प्रीती करू नये, परंतु कृतीने आणि सत्याने प्रीती करावी.
प्रीती काय आहे हे यावरून आपल्याला समजते की, येशू ख्रिस्ताने त्यांचे जीवन आपल्यासाठी दिले आणि म्हणून आपणही आपल्या भावांसाठी आणि बहिणींसाठी आपले जीवन दिले पाहिजे. जर कोणाजवळ ऐहिक संपत्ती असेल आणि तो पाहतो की त्याचा भाऊ किंवा बहीण गरजेत आहे परंतु त्याला त्यांची दया येत नाही, तर अशा व्यक्तीमध्ये परमेश्वराची प्रीती कशी असू शकेल? प्रिय लेकरांनो, आपण शब्दांनी किंवा कोरड्या बोलण्याने प्रीती करू नये, परंतु कृतीने आणि सत्याने प्रीती करावी.
आपल्याला माहीत आहे की आपण मरणातून जीवनात पार गेलो आहोत कारण आपण एकमेकांवर प्रीती करतो. जे कोणी प्रीती करीत नाही ते मरणामध्येच राहतात.
प्रीती आणि द्वेष
कारण आपण एकमेकांवर प्रीती करावी हाच संदेश तुम्ही सुरुवातीपासून ऐकला आहे.
पित्याने आपण परमेश्वराची लेकरे म्हणून संबोधले जावे म्हणून पित्याने आपणावर किती मोठा अगाध प्रीतीचा वर्षाव केला आहे! आणि आपण तसे आहोतच! जग आपल्याला ओळखत नाही कारण जगाने त्यांना ओळखले नाही.
परमेश्वराच्या आज्ञा पाळणे म्हणजे त्यांच्यावर प्रीती करणे होय आणि त्यांच्या आज्ञा जाचक नाहीत
Amor de Deus
Deus prova o seu amor em que Cristo morreu por nós. Deus amou o mundo de tal maneira que deu o seu Filho unigênito.
परंतु परमेश्वर आम्हावरील स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण असे देतात की, आम्ही पापी असताना, ख्रिस्त आम्हासाठी मरण पावले.
कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
आपल्या मित्रासाठी स्वतःचे प्राण अर्पण करावे, यापेक्षा कोणतीही प्रीती मोठी नाही.
आपल्या मित्रासाठी स्वतःचे प्राण अर्पण करावे, यापेक्षा कोणतीही प्रीती मोठी नाही.
"जशी पित्याने मजवर प्रीती केली, तशीच मीही तुमच्यावर प्रीती केली आहे. आता तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्यांच्या प्रीतीत राहतो, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर माझ्या प्रीतीत राहाल.
माझी आज्ञा ही आहे: मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.
येशूंचे पवित्र आत्मा देण्याबद्दल अभिवचन
"जर तुमची मजवर प्रीती असेल, तर माझ्या आज्ञा पाळा.
ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच मजवर प्रीती करतो. जो मजवर प्रीती करतो त्यावर माझे पिताही प्रीती करतील आणि मी देखील त्याजवर प्रीती करेन व स्वतः त्यांना प्रकट होईन."
नंतर यहूदाह (यहूदाह इस्कर्योत नव्हे) म्हणाला, "पण प्रभूजी, आपण फक्त आम्हाला प्रकट होणार पण जगाला का प्रकट होणार नाही?"
येशूंनी उत्तर दिले, "कारण जो कोणी मजवर प्रीती करतो तो माझे शिक्षण आचरणात आणेल. माझे पितादेखील त्यांच्यावर प्रीती करतील आणि आम्ही त्यांच्याकडे येऊ व त्यांच्याबरोबर वस्ती करू. जो कोणी माझ्यावर प्रीती करीत नाही, तो माझे शिक्षण पाळीत नाही. माझी जी वचने तुम्ही ऐकत आहात ती माझी स्वतःची नाहीत; तर ज्याने मला पाठविले त्या पित्याची आहेत.
"मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देत आहे: तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्वजण ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात."
O maior mandamento
Amarás ao Senhor de todo o coração e ao próximo como a ti mesmo. Estes são os maiores mandamentos — neles se resume toda a lei.
येशूंनी उत्तर दिले, " ‘प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती करा.’ हीच सर्वात पहिली आणि महान आज्ञा आहे. यासारखीच दुसरी ही आहे: ‘जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा.’
येशूंनी उत्तर दिले, " ‘प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती करा.’ हीच सर्वात पहिली आणि महान आज्ञा आहे. यासारखीच दुसरी ही आहे: ‘जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा.’ सर्व नियम आणि संदेष्ट्यांची शिकवण या दोन आज्ञांवरच आधारित आहे."
"मग राजा उत्तर देऊन म्हणेल, ‘मी तुम्हाला निश्चित सांगतो, जे काही या लहानातील माझ्या एकाही भावा-बहिणीसाठी तुम्ही केले ते तुम्ही माझ्यासाठी केले.’
तर मग जे सर्व इतरांनी तुमच्यासाठी करावे असे तुम्हाला वाटते, तसेच तुम्हीही त्यांच्यासाठी करा. नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे सार हेच आहे.
पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा.’ दुसरी ही आहे: ‘जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा.’ या आज्ञांपेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही."
O amor que não falha
O amor é paciente, é benigno. Tudo sofre, tudo crê, tudo espera, tudo suporta. O amor jamais acaba.
प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे. ती कधीही हेवा किंवा मत्सर करीत नाही, कधीही अभिमान बाळगत नाही, गर्व करीत नाही. ती कधीही इतरांचा अपमान करीत नाही, स्वार्थ पाहत नाही किंवा सहज चिडत नाही. ती अयोग्य गोष्टींची कधीही नोंद ठेवीत नाही.
प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे. ती कधीही हेवा किंवा मत्सर करीत नाही, कधीही अभिमान बाळगत नाही, गर्व करीत नाही. ती कधीही इतरांचा अपमान करीत नाही, स्वार्थ पाहत नाही किंवा सहज चिडत नाही. ती अयोग्य गोष्टींची कधीही नोंद ठेवीत नाही. प्रीती वाईट गोष्टींमध्ये आनंद मानत नाही परंतु सत्यामध्ये आनंद मानते. प्रीती नेहमी संरक्षण करते, सर्वदा विश्वास ठेवते, सर्वदा आशा धरते आणि सर्वदा धीर धरते.
विश्वास, आशा, प्रीती या तीन गोष्टी टिकून राहतात; परंतु त्यामध्ये प्रीती सर्वश्रेष्ठ आहे.
विश्वास, आशा, प्रीती या तीन गोष्टी टिकून राहतात; परंतु त्यामध्ये प्रीती सर्वश्रेष्ठ आहे.
विश्वास, आशा, प्रीती या तीन गोष्टी टिकून राहतात; परंतु त्यामध्ये प्रीती सर्वश्रेष्ठ आहे.
मला परमेश्वराचे संकल्पनिवेदन करण्याचे दान असले, सर्वप्रकारच्या रहस्यांचे गहन अर्थ आकलन होत असले आणि सर्व ज्ञान असले आणि जरी डोंगर हालविण्याइतका मजजवळ विश्वास असला, पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही.
तरी शास्त्रलेखानुसार:
"जे डोळ्यांनी पाहिले नाही,
जे कोणत्याही कानावर पडले नाही,
माणसाच्या मनात आले नाही,"—
त्या सर्वगोष्टी परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांसाठी त्यांनी सिद्ध केल्या आहेत—
तुम्ही जे काही करता ते प्रीतीने करा.
तुम्ही जे काही करता ते प्रीतीने करा.
Amor inseparável
Nada poderá nos separar do amor de Deus. Nem morte, nem vida, nem anjos — absolutamente nada.
कारण माझी खात्री आहे की ना मरण ना जीवन, ना देवदूत ना भुते, ना वर्तमान ना भविष्यकाळ, ना कोणती शक्ती, अथवा उंची, खोली आणि सृष्टीमधील कोणतीही गोष्ट आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधील परमेश्वराच्या प्रीतीपासून आपणास विभक्त करू शकणार नाही.
कारण माझी खात्री आहे की ना मरण ना जीवन, ना देवदूत ना भुते, ना वर्तमान ना भविष्यकाळ, ना कोणती शक्ती, अथवा उंची, खोली आणि सृष्टीमधील कोणतीही गोष्ट आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधील परमेश्वराच्या प्रीतीपासून आपणास विभक्त करू शकणार नाही.
कृतीद्वारे प्रीती
प्रीती निष्कपट असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा. जे चांगले आहे त्याला चिटकून राहा.
कृतीद्वारे प्रीती
प्रीती निष्कपट असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा. जे चांगले आहे त्याला चिटकून राहा.
कृतीद्वारे प्रीती
प्रीती निष्कपट असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा. जे चांगले आहे त्याला चिटकून राहा. एकमेकांवर बंधुभावाने प्रीती करा आणि आपल्यापेक्षा इतरांचा आदर करा.
एकमेकांवर बंधुभावाने प्रीती करा आणि आपल्यापेक्षा इतरांचा आदर करा.
प्रीती नियम पूर्ण करते
इतरांवर प्रीती करण्याशिवाय कोणाचे ॠणी राहू नका, कारण जो कोणी दुसर्यांवर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे.
Viver no amor
Revesti-vos de amor, que é vínculo da perfeição. O amor cobre multidão de pecados e edifica a comunidade.
आणि या सर्व सद्गुणांपेक्षा प्रीती धारण करा कारण त्यामुळे तुम्ही सर्वजण प्रीतीमध्ये एकत्र बांधले जाल.
एकमेकांचे सहन करा, जर कोणाची एखाद्याविरुद्ध काही तक्रार असेल तर जशी प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. आणि या सर्व सद्गुणांपेक्षा प्रीती धारण करा कारण त्यामुळे तुम्ही सर्वजण प्रीतीमध्ये एकत्र बांधले जाल.
मी प्रार्थना करतो की आपल्या गौरवशाली संपत्तीनुरूप आपल्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य देऊन त्यांनी तुम्हाला अंतर्यामी शक्तिसंपन्न करावे. ज्यामुळे ख्रिस्त विश्वासाद्वारे तुमच्या हृदयात राहतील व तुम्ही प्रीतीमध्ये खोल मुळावलेले व स्थिर व्हावे अशी मी प्रार्थना करतो,
पूर्ण नम्रतेने आणि सौम्यतेने; सहनशीलतेने, प्रीतीने एकमेकांचे सहन करा.
पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती केली पाहिजे, ज्याप्रमाणे ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती करून स्वतःस तिच्यासाठी अर्पण केले, जेणेकरून मंडळीला वचनरुपी पाण्याने धुवून शुद्ध करून तिला पवित्र करावे;
आणि ही माझी प्रार्थना आहे: तुमची प्रीती ही ज्ञानाने व विवेकाच्या खोलीने अधिकाधिक वाढावी. कारण जे उत्तम आहे ते तुम्हाला ओळखता यावे व ख्रिस्ताच्या दिवसासाठी तुम्ही शुद्ध व निर्दोष असावे, येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त होणार्या नीतिमत्वाच्या फळांनी भरले जावे व त्याद्वारे परमेश्वराची स्तुती आणि गौरव व्हावे.
कारण सर्व नियमशास्त्र या एका आज्ञेत सामावलेले आहे: "जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा."
प्रभू तुमची अंतःकरणे परमेश्वराच्या प्रीतिकडे आणि ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांवर निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पुष्कळ पापांची रास झाकून टाकते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांवर निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पुष्कळ पापांची रास झाकून टाकते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांवर निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पुष्कळ पापांची रास झाकून टाकते.
Expressões de amor
O amor há de ser eterno como o grande Rei. Como a esmeralda reluz, assim brilha o amor que vem de Deus.
द्वेष कलहास चेतावणी देतो;
परंतु प्रीती सर्व अपराधांवर आच्छादन टाकते.
प्रीती आणि विश्वासूपणा तुला कधीही न त्यागोत;
त्यांना तू आपल्या गळ्याभोवती बांध,
त्यांना तुझ्या हृदयाच्या पटलावर लिहून ठेव.
तेव्हा तुला परमेश्वराकडून आणि मानवाकडून
अनुग्रह आणि सत्कीर्ती प्राप्त होतील.
प्रेमाचा अग्नी विपुल जलाशयांनी विझत नाही;
नद्यांमध्ये महापूर आला तरी ती बुडत नाही.
एखाद्याने आपल्या घरातील
संपूर्ण संपत्ती देऊ केली तरी
प्रेमापुढे ती अगदी तुच्छ होय.
मित्र
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत,
त्यांची करुणा सनातन आहे.
प्रातःकाळी तुमच्या वात्सल्याचा मला प्रेमसंदेश येऊ द्या,
कारण मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे.
माझे जीवन मी तुमच्या हातात सोपविले आहे,
म्हणून मी कोणत्या मार्गाने चालावे ते मला दाखवा.
अहो याहवेहच्या सर्व भक्तांनो, त्यांच्यावर प्रीती करा!
याहवेह प्रामाणिक लोकांना मदत करतात
पण ते गर्विष्ठांना पूर्ण मापाने शिक्षा करतात.
कारण तू माझ्यासाठी मौल्यवान व आदरणीय आहेस,
आणि मी तुझ्यावर प्रीती करतो,
मी तुझ्या मोबदल्यात लोकांना देईन,
तुझ्या जिवाच्या मोबदल्यात मी राष्ट्रांना देईन.
तुमच्या शत्रूवर प्रेम करा, त्यांचे भले करा आणि परतफेड करण्याची आशा बाळगू नका. असे केले म्हणजे तुम्हाला फार मोठे प्रतिफळ मिळेल आणि तुम्ही परात्पराची लेकरे व्हाल, कारण ते अनुपकारी आणि दुष्ट यांनाही दयाळूपणाने वागवितात.