Aniversário de criança
O aniversário de uma criança é momento de celebrar o presente precioso que Deus deu. Cada criança é formada e conhecida por Deus desde antes de nascer.
तू माझे अंतर्याम निर्माण केलेस;
तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले.
मी तुला धन्यवाद देतो,
कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत,
हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो.
मी गुप्तस्थळी निर्माण होत असता,
आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे
माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती.
तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस;
माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी
ते सर्व तुझ्या पुस्तकात नमूद करून ठेवले होते.
हे देवा, तुझे विचार मला किती मोलवान आहेत,
त्यांची संख्या किती मोठी आहे.
परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे;
ह्यात आपण आनंद व उल्लास करू.
म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे
मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू.
गर्भापासून तूच माझा आधार आहेस;
माझ्या आईच्या उदरातून तूच मला बाहेर काढले;
माझी स्तुती नेहमी तुझ्याविषयी असेल.
मी परमेश्वरास एक गोष्ट मागितली, तीच मी शोधीन,
परमेश्वराची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात
ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस घालवेन,
परमेश्वराच्या घरात मी वस्ती करीन.
परंतु मला उदरांतून बाहेर काढणारा तुच आहेस,
मी माझ्या आईच्या स्तनांवर असता, तू मला तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकवले.
मी गर्भातूनच तुझ्यावर सोपवून दिलेला होतो.
माझ्या आईच्या उदरात असतानाच तू माझा देव आहेस.
या मुलासाठी मी प्रार्थना केली आणि जी माझी मागणी मी परमेश्वरापाशी मागितली होती ती त्याने मला दिली आहे.
जेव्हा मी माझ्या वडिलाचा मुलगा होतो,
माझ्या आईच्या दृष्टीने सुकुमार व एकुलता एक होतो,
त्यांनी मला शिकवले आणि मला म्हणाले,
"तुझे मन माझी वचने घट्ट धरून ठेवो;
माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत राहा.
प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा सांगतो, आनंद करा.
बालक मोठा होत गेला आणि बलवान झाला व ज्ञानातही वाढत गेला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती.