Aniversário de idoso
O aniversário de um idoso é celebração de uma vida longa e cheia de experiências com Deus. A Bíblia honra os cabelos brancos como coroa de glória e prova da fidelidade divina.
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत;
त्यांची दया सनातन आहे.
याहवेहने आज हे केले आहे;
आजच आपण आनंद व उल्लास करू.
मी सर्व समयी याहवेहचा धन्यवाद करेन;
माझ्या ओठांनी मी त्यांची निरंतर स्तुती करेन.
याहवेह माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहेत;
माझे हृदय त्यांच्यावर भरवसा ठेवते, तेच माझे साहाय्य करतात.
माझे अंतःकरण आनंदाने उड्या मारत आहे,
माझ्या गीताद्वारे मी त्यांचे स्तवन करेन.
विपुल धान्य व द्राक्षारस देतो त्या आनंदापेक्षाही
कितीतरी अधिक आनंद तुम्ही माझ्या हृदयात दिला आहे.
तुम्ही मला जीवनाचा मार्ग दाखवाल;
तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल,
तुमच्या उजव्या हातात सर्वदा सौख्य आहे.
मी याहवेहला एक याचना केली,
हीच माझी आकांक्षा आहे:
मी आयुष्यभर याहवेहच्या
भवनात वस्ती करावी जेणेकरून
मी याहवेहचे सौंदर्य बघून त्यांच्या
मंदिरात ध्यान करावे.
आमच्या जीवनाचे दिवस मोजणे आम्हाला शिकवा,
जेणेकरून आमचे अंतःकरण सुज्ञ होईल.
पांढरे केस गौरवी मुकुट आहे;
नीतिमत्तेच्या मार्गात चालल्याने तो लाभतो.
तरुणांचे भूषण त्यांचे बळ आहे.
वृद्धांचे भूषण त्यांचे पांढरे केस आहेत.
पण जे याहवेहवर आशा ठेवतात
ते नवे सामर्थ्य प्राप्त करतात,
ते त्यांच्या पंखांनी गरुडाप्रमाणे वर झेप घेतील;
ते धावतील पण दमणार नाहीत,
ते चालतील पण क्षीण होणार नाहीत.
"इस्राएली लोक रानात फिरत असता याहवेहने मोशेला हे सांगितले तेव्हापासून आजपर्यंत पंचेचाळीस वर्षे याहवेहने मला जिवंत ठेवले आहे आणि आज मी पंचाऐंशी वर्षांचा आहे! मोशेने मला पाठविले होते, त्या दिवशी मी जेवढा बलवान होतो तेवढाच आज देखील आहे आणि तेव्हा युद्धावर जाण्यास मी जसा आवेशी होतो तसाच आज देखील आहे.
" ‘ "याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो
आणि तुमचे संरक्षण करो;
याहवेह आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो
आणि तुमच्यावर कृपा करो;
याहवेह आपले मुख तुमच्याकडे लावो,
आणि तुम्हाला शांती देवो." ’
प्रिय मित्रा, मी प्रार्थना करतो की, तुला चांगले आरोग्य लाभो आणि तुझ्याबरोबर सर्वकाही चांगले होत जावो, जशी तुझ्या आत्म्याचीसुद्धा उन्नती होत आहे.