Anjos
Os anjos são seres celestiais criados por Deus para servir, adorar e executar seus propósitos. A Bíblia revela anjos mensageiros, guerreiros e protetores ao longo de toda a história redentora.
जवय तो हाऊ ईचार करीच राहींता ईतलामा एक प्रभुना स्वर्गदूतनी त्याले सपनमा दर्शन दिसन सांगं, हे, "योसेफ दावीदना पोऱ्या, तु मरीयाले बायको बनाडाले घाबरू नको, कारण तिना पोटमा जो गर्भ शे, तो पवित्र आत्माकडतीन शे.
देवदूत त्यासले बोलणा, "तुम्हीन घाबरू नका," क्रुसखांबवर खियेल येशुले तुम्हीन शोधी राहिनात, हाई माले माहित शे. तो आठे नही शे, कारण त्यानी सांगेल प्रमाणे तो जिवत व्हयेल शे, या, प्रभु झोपेल व्हता ती हाई जागा दखा.
तुले अस वाटस का की, माले मना पिताजोडे मांगता येस नही, आत्तेना आत्तेच तो मनाकरता देवदूतसना बारा सैन्यपेक्षा जास्त धाडु नही शकस?
देवदूतनी तिले सांगं, "मरीया, घाबरू नको; कारण देवनी कृपा तुनावर व्हयेल शे. तु गरोदर व्हशी अनं पोऱ्याले जन्म देशी, अनी त्यानं नाव येशु ठेव.
पण देवदूत त्यासले बोलणा, "घाबरू नका! कारण दखा जो मोठा आनंद सर्व लोकसले व्हणार शे, त्यानी सुवार्ता मी तुमले सांगस."
"स्वर्गलोकी देवले गौरव,
अनी पृथ्वीवर मनुष्यसमा शांती त्यासनावर तो प्रसन्न व्हयेल शे!"
त्यानामायकच, पश्चाताप करनारा एक पापी माणुसबद्दल देवना दूतससमोर आनंद व्हस, हाई मी तुमले सांगस.
तो जाई राहिंता तवय त्या आकाशकडे टक लाईसन दखी राहींतात, तवय दखा, पांढरा शुभ्र कपडा घालेल दोन माणसं त्यासनाजोडे उभा राहीनात. तवय त्या बोलनात, अहो गालीलकरसवन, तुम्हीन आकाशकडे काय दखीसन उभा राहिंनात? तुमना मातीन वर स्वर्गमा लेवाई गया तोच येशु, जस तुम्हीन त्याले स्वर्गमा जातांना दखं तसच येतांना दखशात.
ईश्वासु भाऊ अनी बहिणीसवन एकमेकसवर प्रिती करत राहा. प्रेमतीन अनोळखीसना पाहूणचार करानं ध्यानमा ठेवा, कारण त्यामुये कितलातरी जणसनी देवदूतसना पाहूणचार न समजता करेल शे.
जर मी मनुष्यना अनं देवदूतसना भाषा बोलनु, पण मना आंगी प्रेम नही राहीनं तर मी वाजणारी थाळी अनं झणझणारी झांज असा शे.
कोणीच नाकारू शकस नही की, भक्तीनं रहस्य मोठं शे, जसं की;
तो जो शरिरमा ऱ्हाईसन प्रकट व्हयना,
आत्माघाई नितीमान ठरना,
अनी देवदूतसले दखायना.
त्यानी राष्ट्रसमा घोषणा व्हयनी,
जगमा त्यानावर ईश्वास ठेवामा वना,
अनी तो गौरवमा वर लेवाई गया.
कारण, आज्ञाध्वनी आद्यदिव्यदूतसनी वाणी अनं देवना तुतारीना नाद व्हत असतांना प्रभु स्वतः स्वर्गामातीन उतरी; अनी ख्रिस्तमा ज्या मरेल शेतस त्या पहिले ऊठतीन; नंतर जिवत उरेल आपण त्यासनासंगे मेघारूढ व्हईन अंतराळमा लेवाई जासुत, अनी आम्हीन कायम परमेश्वरनासंगे राहसुत.
ज्या विजय मिळावतस त्या असा पध्दततीन शुभ्र कपडा घालेल व्हतीन; मी जिवनी पुस्तकमाधलं त्यासनं नाव खोडावुच नही, अनी मना पितासमोर अनं त्याना दूतसमोर मी त्यासनं नाव उघडपणतीन जाहीर करसु.
कारण मनी खात्री शे की, मरण किंवा जिवन, देवदूत किंवा सत्ता, वर्तमानकाळना गोष्टी, भविष्यकाळना गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणती बी सृष्ट वस्तु, आपला प्रभु ख्रिस्त येशु यानामा देवनी आपलावर जी प्रिती शे, तिनापाईन आपलाले वेगळं कराले समर्थ व्हवावं नही.