Anjos
Os anjos são seres celestiais criados por Deus para servir, adorar e executar seus propósitos. A Bíblia revela anjos mensageiros, guerreiros e protetores ao longo de toda a história redentora.
तो या गोष्टींविषयी विचार करीत असता त्यास स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन देऊन म्हटले; "योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस, कारण जो गर्भ तिच्या पोटी राहीला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.
देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, "भिऊ नका, कारण मी जाणतो की, ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही शोधत आहात. पण तो इथे नाही कारण तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्यास मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्यास ठेवले होते ती जागा पाहा.
मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवदूतांच्या सहा हजार सैन्याची एक अशा बारा पेक्षा अधिक पलटणी पाठवील, हे तुम्हास कळत नाही काय?
देवदूत तिला म्हणाला, "मरीये, भिऊ नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे. पाहा! तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू येशू ठेव.
देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका; जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो.
"परम उंचामध्ये देवाला गौरव
आणि पृथ्वीवर ज्या मनुष्यांसंबंधी
तो संतुष्ट आहे त्यांच्यामध्ये शांती."
त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हास सांगतो."
नंतर तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरूष त्यांच्याजवळ उभे राहिले. आणि ते असे बोलले, "अहो गालीलकारांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिले आहात? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे? तुम्ही त्यास जसे आकाशात जातांना पाहता तसाच तो परत येईल."
व्यवहारोपयोगी बोध
बंधुजनांवरील प्रीती निरंतर राहो. लोकांचा पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे.
प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय
मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.
सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे
तो देहात प्रकट झाला,
आत्म्याने तो नीतिमान ठरवला गेला,
तो देवदूतांच्या दृष्टीस पडला,
राष्ट्रांमध्ये गाजवला गेला,
जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला,
तो गौरवात वर घेतला गेला.
कारण आज्ञा करणाऱ्या गर्जणेने, आद्यदेवदूतांची वाणी आणि देवाच्या कर्ण्याचा आवाज येईल, तेव्हा प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तात मरण पावलेले प्रथम उठतील. मग आपण जे जिवंत आहोत व मागे राहू, ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी ढगात उचलले जाऊ आणि सर्वकाळ प्रभूबरोबर राहू.
जो विजय मिळवतो, तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करील, मी त्याचे नाव जीवनाच्या पुस्तकातून खोडणारच नाही; पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन,
कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत किंवा सत्ता, आताच्या गोष्टी किंवा येणार्या गोष्टी किंवा बले, किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणतीही निर्मिती आपला प्रभू ख्रिस्त येशू ह्याच्याठायी असलेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळे करू शकणार नाही.
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.