Ano novo
O Ano Novo é oportunidade de renovação e consagração. A Bíblia convida a esquecer o que ficou para trás e avançar em fé, confiança e esperança em Deus.
बंधू व भगिनींनो, मी अजूनही ते प्राप्त केलेले नाही, परंतु मी एक गोष्ट करतो: मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे नेटाने लक्ष लावतो. ख्रिस्त येशूंमध्ये परमेश्वराच्या स्वर्गीय पाचारणासंबंधीचे पारितोषिक जिंकण्यासाठी मी त्या लक्ष्याकडे धावत आहे.
मी सर्वकाही मिळविले किंवा माझ्या ध्येयाप्रत पोहोचलो आहे असे नाही, परंतु ते आपलेसे करण्यासाठी व घट्ट धरून ठेवण्यासाठी मी नेटाने पुढे जात आहे. कारण मला ख्रिस्त येशूंनी पकडून ठेवले आहे. बंधू व भगिनींनो, मी अजूनही ते प्राप्त केलेले नाही, परंतु मी एक गोष्ट करतो: मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे नेटाने लक्ष लावतो. ख्रिस्त येशूंमध्ये परमेश्वराच्या स्वर्गीय पाचारणासंबंधीचे पारितोषिक जिंकण्यासाठी मी त्या लक्ष्याकडे धावत आहे.
पौलाचे अनुकरण
आपण जे सर्व परिपक्व आहोत त्यांनीही हाच भाव ठेवावा. जर एखाद्या गोष्टीसंबंधाने तुमचे विचार वेगळे असतील तर परमेश्वर ती गोष्ट तुम्हाला स्पष्ट करतील.
जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी सृष्टी झाला आहे; जुने संपले आहे व सर्व नवीन झाले आहे.
जिवंत आशेबद्दल परमेश्वराची स्तुती
परमेश्वर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता यांची स्तुती असो! त्यांनी आपल्या महान दयेने आणि येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमधून झालेल्या पुनरुत्थानाद्वारे जिवंत आशेमध्ये आपल्याला नवीन जन्म दिला आहे.
परमेश्वरा, माझ्यामध्ये शुद्ध हृदय निर्माण करा
आणि माझ्यात स्थिर असा आत्मा पुनर्स्थापन करा.
मला आपल्या समक्षतेतून दूर करू नका
व तुमचा पवित्र आत्मा मजमधून काढून घेऊ नका.
याहवेहसमोर निश्चिंत राहा
व धीराने त्यांची वाट पाहा;
जेव्हा लोकांना त्यांच्या मार्गात यश मिळते,
त्यांच्या दुष्ट योजना सफल होतात, तेव्हा तू संतापू नकोस.
याहवेह किती चांगले आहेत याचा अनुभव घ्या;
जे त्यांच्यावर भाव ठेवतात ते धन्य.
पण जे याहवेहवर आशा ठेवतात
ते नवे सामर्थ्य प्राप्त करतात,
ते त्यांच्या पंखांनी गरुडाप्रमाणे वर झेप घेतील;
ते धावतील पण दमणार नाहीत,
ते चालतील पण क्षीण होणार नाहीत.
याहवेह असे जाहीर करतात, "कारण मी तुमच्यासाठी केलेल्या योजना मला माहीत आहेत, त्या योजना तुमच्या भल्यासाठी आहेत, वाईटासाठी नाहीत, तुम्हाला आशा व उज्वल भविष्यकाळ देण्याच्या त्या योजना आहेत.
मी तुमच्यावर स्वच्छ पाणी शिंपडेन, आणि तुम्ही शुद्ध व्हाल; मी तुम्हाला तुमच्या सर्व अशुद्धतेपासून आणि तुमच्या मूर्तींपासून शुद्ध करेन. मी तुम्हाला नवे हृदय देईन आणि तुमच्यात नवा आत्मा ओतेन; मी तुमच्यातून तुमचे पाषाणी हृदय काढून मांसमय हृदय तुम्हाला देईन. आणि मी माझा आत्मा तुमच्यामध्ये घालेन, तुम्ही माझे विधी आचारावे व माझे नियम काळजीपूर्वक पाळावे म्हणून मी तुम्हाला चालवेन.
आणि या सर्व सद्गुणांपेक्षा प्रीती धारण करा कारण त्यामुळे तुम्ही सर्वजण प्रीतीमध्ये एकत्र बांधले जाल.
ख्रिस्ताची शांती, तुमच्या अंतःकरणात राज्य करो; कारण एकाच शरीराचे अवयव म्हणून तुम्हीही या शांतीसाठी बोलावलेले आहात. तुम्ही कृतज्ञ राहा.
त्यांनी प्रत्येक गोष्ट, त्याच्या समयात सुंदर अशी बनविली आहे. परमेश्वराने मनुष्याच्या अंतःकरणात अनंतकाळचे जीवन ठेवलेले आहे. तरीसुद्धा परमेश्वराने आरंभापासून शेवटपर्यंत केलेली कृत्ये कोणीही समजू शकले नाहीत.
त्यांनी थोडे दिवस त्यांना योग्य वाटली तशी शिस्त लावली; परंतु परमेश्वर आपल्या हितासाठी शिस्त लावतात, म्हणजे आपण त्यांच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे. कोणतीही शिस्त तत्काली आनंदाची वाटत नाही, परंतु दुःखाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून प्रशिक्षण मिळाले आहे, त्यांना ती पुढे नीतिमत्वाचे शांतिकारक फळ देते.
उद्याची बढाई
आता ऐका, तुम्ही म्हणता, "आम्ही आज किंवा उद्या या किंवा त्या शहरात जाऊ, तिथे वर्षभर राहू, उद्योग सुरू करू आणि पैसे कमवू." तुम्हाला उद्या काय आणि कसे होणार हे माहीत नाही. तुमचे जीवन ते काय आहे? तुम्ही त्या धुक्यासारखे आहात, जे थोड्या वेळासाठी दिसते आणि नाहीसे होते. याऐवजी, तुम्ही असे म्हणावयास हवे, "जर प्रभूची इच्छा असेल, तर आम्ही जगू व हे किंवा ते करू." जसे आता तुम्ही घमेंड करता आणि अभिमान बाळगता. अशा सर्व प्रकारची बढाई वाईट आहे. जर कोणाला चांगले करणे कळत असूनही, ते करत नाही, तर ते त्यांना पाप गणले जाते.
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.