Aprender
Aprender é vocação do discípulo. Jesus disse: aprendei de mim. A Bíblia convida a aprender com humildade, perseverança e disposição — sentados aos pés do Mestre.
Aprender de Jesus
Tomai sobre vós o meu jugo e aprendei de mim. O Espírito Santo nos ensinará todas as coisas e nos recordará tudo.
मी अंतःकरणाने लीन व नम्र आहे, म्हणून माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे."
म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आणि जे काही मी तुम्हास शिकविले आहे ते त्या लोकांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे."
तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हास सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हास सांगितल्या त्या सर्वाची तुम्हास आठवण करून देईल.
त्यावरून येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, "माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे.
पण तुम्हाविषयी म्हणावयाचे तर, त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हास कोणी शिकविण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही तुम्हास सर्व गोष्टींविषयी शिकवितो त्याप्रमाणे व त्याने तुम्हास शिकविल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यामध्ये राहा.
Ensino e sabedoria
O temor do Senhor é o princípio do saber. A disciplina do Senhor forma o caráter e abre caminhos de entendimento.
परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे,
मूर्ख ज्ञान आणि शिक्षण तुच्छ मानतात.
माझ्या मुला, परमेश्वराची शिस्त तुच्छ मानू नको,
आणि त्याच्या शासनाचा द्वेष करू नकोस,
जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला शिक्षा करतो,
तसा परमेश्वर ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांनाच तो शिस्त लावतो.
मी तुला ज्ञानाचा मार्ग दाखविला आहे;
मी तुला सरळ मार्गाने घेऊन जात आहे.
ज्याला शिक्षण प्रिय त्यास ज्ञान प्रिय,
परंतु जो कोणी शासनाचा द्वेष करतो तो मूर्ख आहे.
तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यासाठी या सर्व गोष्टी केल्या आहेत ह्याची आठवण तुम्ही ठेवलीच पाहिजे. बाप आपल्या मुलाला शिकवतो, त्याच्यावर संस्कार करतो तसा तुमचा देव परमेश्वर तुम्हास आहे.
Comunidade de aprendizado
Ensinem e aconselhem-se mutuamente. A igreja é escola de Cristo — onde todos ensinam e todos aprendem juntos.
ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा.
म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उभारणी करा; हे तुम्ही करतही आहात.
आणि दररोज, परमेश्वराच्या भवनात व घरोघर शिकवण्याचे, व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.
जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हास सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हास माहीत आहे आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही.
माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले व पाहिले ते तुम्ही आचरीत राहा आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील.
तू तर सुशिक्षणास शोभणार्या गोष्टी बोलत जा.
Ouvir e praticar
Ensina-me a fazer a tua vontade. Guia-me pela tua verdade. O verdadeiro aprendiz pratica o que ouviu do Mestre.
मला तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास शिकव,
कारण तू माझा देव आहेस.
तुझा चांगला आत्मा
मला सरळपणाच्या देशात नेवो.
हे परमेश्वरा तुझे मार्ग मला कळव,
मला तुझे मार्ग शिकव.
तू आपल्या सत्यात मला मार्ग दाखव आणि मला शिकव.
कारण तू माझा तारणारा देव आहेस
मी रोज तुझी वाट पाहतो.
परमेश्वर चांगला आणि प्रामाणिक आहे.
यास्तव तो पाप्यांस मार्ग शिकवतो.
तो नम्र जणांस न्यायाने मार्गदर्शन करतो.
आणि दीनांना आपला मार्ग शिकवीतो.
परमेश्वर म्हणतो, "मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात, तू चालावे तो मी तुला शिकवीन.
तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला बोध करीन.
प्रत्येक रात्रीबरोबर तुझ्याशी एकरूप होण्याची आमची इच्छा आहे,
माझा आत्मा माझ्यामध्ये आतुरतेने तुला शोधीन,
कारण जेव्हा तुझा न्याय या पृथ्वीवर येतो, तेव्हा या जगातील राहणारे न्यायीपण शिकतात.