Aprender
Aprender é vocação do discípulo. Jesus disse: aprendei de mim. A Bíblia convida a aprender com humildade, perseverança e disposição — sentados aos pés do Mestre.
Aprender de Jesus
Tomai sobre vós o meu jugo e aprendei de mim. O Espírito Santo nos ensinará todas as coisas e nos recordará tudo.
माझे जू आपणावर घ्या आणि माझ्याकडून शिका; कारण मी सौम्य व लीन मनाचा आहे आणि तुमच्या आत्म्याला विसावा मिळेल. कारण माझे जू हलके व माझे ओझे सहज पेलवणारे आहे."
यास्तव सर्व राष्ट्रांमध्ये जाऊन शिष्य बनवा आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; आणि मी तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांना सर्वकाही पाळावयास शिकवा आणि मी सदैव, युगाच्या अंतापर्यंत तुमच्याबरोबर आहे."
परंतु तो कैवारी, पवित्र आत्मा, ज्याला पिता माझ्या नावाने पाठवतील, तो तुम्हाला सर्वकाही शिकवेल आणि मी सांगितलेल्या सर्व गोष्टींची आठवण करून देईल.
येशू त्यांना म्हणाले, "माझी शिकवण माझी स्वतःची नसून ज्यांनी मला पाठविले त्यांची आहे.
प्रभूपासून जो अभिषेक तुम्हाला मिळाला आहे तो तुम्हावर राहतो; आणि तुम्हाला कोणी शिकविण्याची गरज नाही. त्यांचा अभिषेक तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवेल. त्यांचा अभिषेक खोटा नाही तर सत्य आहे, जसे त्यांनी तुम्हाला शिकविले आहे तसे त्यांच्यामध्ये राहा.
Ensino e sabedoria
O temor do Senhor é o princípio do saber. A disciplina do Senhor forma o caráter e abre caminhos de entendimento.
याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय,
परंतु मूर्ख माणसे सुज्ञान आणि शिक्षण तुच्छ लेखतात.
माझ्या पुत्रा, याहवेहच्या शिस्तीचा अनादर करू नकोस;
आणि त्यांनी निषेध केल्यास चिडू नकोस;
कारण जसा पिता मुलामध्ये आनंद मानतो, तसाच त्याला शिस्तही लावतो,
याहवेह ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात!
मी तुला सुज्ञान मार्गाचे शिक्षण देतो,
आणि तुला सरळ वाटेने चालवितो.
जो अनुशासन प्रिय असतो, त्याला ज्ञान प्रिय असते,
परंतु ज्याला सुधारणा अप्रिय आहे, तो मूर्ख होय.
तेव्हा तुम्हाला हे समजावे की, जसा पिता आपल्या पुत्राला शिस्त लावतो तसे याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला शिस्त लावतात.
Comunidade de aprendizado
Ensinem e aconselhem-se mutuamente. A igreja é escola de Cristo — onde todos ensinam e todos aprendem juntos.
स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते, यांच्याद्वारे कृतज्ञ अंतःकरणातून परमेश्वराला गाणी गाऊन एकमेकांना पूर्ण सज्ञानाने शिकविताना आणि बोध देताना ख्रिस्ताचा संदेश तुम्हामध्ये विपुलतेने राहो.
म्हणून तुम्ही आता जे करीत आहात त्याचप्रमाणे एकमेकांना प्रोत्साहन द्या आणि एकमेकांची वुद्धी करण्यासाठी झटा.
आणि प्रत्येक दिवशी मंदिराच्या आवारात व घरोघरी जाऊन "येशू हेच ख्रिस्त आहेत" याबद्दलचे शिक्षण देण्याचे व शुभवार्तेची घोषणा करण्याचे त्यांनी थांबविले नाही.
जे तुमच्यासाठी हितकारक आहे, त्याचा प्रचार करण्यास उशीर अथवा कुरकुर केली नाही, परंतु लोकांमध्ये उघडपणे आणि घरोघरी जाऊन शिक्षण दिले.
माझ्यापासून तुम्ही जे सर्वकाही शिकला किंवा स्वीकारले किंवा ऐकले, किंवा मजमध्ये पाहिले त्यानुसार आचरण करा आणि शांती देणारे परमेश्वर तुम्हाबरोबर राहतील.
शुद्ध शिक्षणास जे धरून आहे तेच तू शिकव.
Ouvir e praticar
Ensina-me a fazer a tua vontade. Guia-me pela tua verdade. O verdadeiro aprendiz pratica o que ouviu do Mestre.
तुमच्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला साहाय्य करा,
कारण तुम्हीच माझे परमेश्वर आहात;
तुमचा उत्तम आत्मा
मला नीतिमार्गाने नेवो.
याहवेह, मला तुमचे मार्ग दाखवा,
तुमचे मार्ग मला शिकवा.
मला तुमच्या सत्यामध्ये चालवा आणि शिक्षण द्या;
कारण मला तारणारे परमेश्वर तुम्हीच आहात,
आणि दिवसभर माझी आशा तुम्हामध्ये आहे.
याहवेह चांगले आणि न्यायी आहेत;
म्हणून ते पापी जनांस आपल्या मार्गांचे शिक्षण देतात.
ते नम्रजनांस नीतिमत्वाच्या मार्गावर नेतात,
आणि त्यांना आपल्या मार्गाचे शिक्षण देतात.
याहवेह म्हणतात, जो मार्ग तू अनुसरावा त्याचे मी तुला मार्गदर्शन व शिक्षण देईन;
माझी प्रेमळ नजर तुजवर ठेऊन मी तुला बोध करेन.
रात्री माझ्या जीवाला तुमचा ध्यास लागतो;
सकाळी माझा आत्मा तुमच्यासाठी आसुसलेला असतो.
जेव्हा तुमचे न्याय पृथ्वीवर येतात,
तेव्हा जगातील लोक धार्मिकता शिकतात.