Ascensão
A ascensão de Jesus ao céu é a coroação de sua obra redentora. Ele subiu à destra do Pai, de onde voltará com poder e glória para buscar os seus.
असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर तो वर घेतला गेला, आणि मेघांनी त्यास दृष्टीआड केले.
नंतर तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरूष त्यांच्याजवळ उभे राहिले. आणि ते असे बोलले, "अहो गालीलकारांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिले आहात? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे? तुम्ही त्यास जसे आकाशात जातांना पाहता तसाच तो परत येईल."
मग प्रभू येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला.
नंतर तो त्यांना बाहेर दूरवर बेथानीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने हात वर करून आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद देत असतानाच तोपर्यंत आकाशात घेतला गेला.
माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हास तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो
मी तुम्हास खरे खरे सांगतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा अधिक मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो.
मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा, जग सोडून पित्याकडे जातो."
येशूने तिला म्हटले, "मला शिवू नकोस; कारण, मी अजून पित्याकडे वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन, त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता, माझा देव आणि तुमचा देव आहे त्याच्याकडे मी वर जातो."
यावरुन येशू त्यांना म्हणाला, "मी आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे मग ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाणार आहे.
सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे
तो देहात प्रकट झाला,
आत्म्याने तो नीतिमान ठरवला गेला,
तो देवदूतांच्या दृष्टीस पडला,
राष्ट्रांमध्ये गाजवला गेला,
जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला,
तो गौरवात वर घेतला गेला.