Bem
Fazer o bem é mandamento de Deus e expressão prática do amor cristão. A Bíblia convida a praticar o bem a todos, com alegria, sem se cansar — porque colheremos no tempo próprio.
पवित्र आत्मानाद्वारा निष्पन्न व्हनारा फळ, प्रिती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, ईश्वासुपणा, सौम्यता, संयम ह्या शेतस; असासना विरूध्द नियमशास्त्र नही.
तर मंग जश आपलाले येळ भेटी त्यानाप्रमाणे आपण सर्वासना अनं विशेष म्हणजे ईश्वासी कुटूंबना लोकससंगे चांगलं करानं.
तुमना तोंडवाटे कोणतं बी अमंगळ भाषण निंघाले नको, तर गरजपुरता अध्यात्मिक फायदाकरता जे काही चांगलं तेच निंघाले पाहिजे, त्यामुये ऐकणारसले कृपादान प्राप्त व्हई.
अनी तुम्हीन एकमेकससंगे उपकारी अनं कनवाळू व्हवाले पाहिजे; जशी देवनी ख्रिस्तमा तुम्हले क्षमा करेल शे तशी तुम्हीन बी एकमेकसले क्षमा करा.
प्रितीमा ढोंग नको; वाईट पाईन दूर रहा; चांगला शे त्याले बिलगी रावानं;
वाईटमा जिकाई जाऊ नको; चांगलाघाई वाईटले जिक.
सर्वकाही देवना महिमा करता
काही लोके म्हणतस, "सर्व गोष्टी करानी सुट शे," तरी सर्व गोष्टी हितकारक शे अस नही. अनं दुसरा म्हणतस, "सर्व गोष्टी करानी सुट शे," तरी सर्व गोष्टी उन्नती करतस अस नही.
फसु नका, खराब संगतमा नीति बिघडस.
सर्व प्रकारनी कृपा तुमनावर भरपुर व्हवाकरता देव शक्तिमान शे; हाई यानाकरता की तुमले सर्व गोष्टीसमा सगळा पुरवठा कायम व्हईसन प्रत्येक चांगला कामकरता तुमनाकडे सर्वकाही भरपूर शे.
तशी मनी ईच्छा शे की बायासनी शोभी असा कपडा घालीन स्वतःले सभ्यताना मर्यादामा सजाडानं. विविध प्रकारनं केस इनानं, अनी सोनं, मोती, मोल्यवान कपडा यासनी नही, तर चांगला कामसतीनं सजाडानं, जे देव भक्ती स्विकारेल बाईसले हाई शोभस.
त्यानी स्वतःले आपलाकरता दि दिधं यानाकरता की, त्यानी खंडणी भरनी आपलाले सर्व प्रकारना अधर्मपाईन सोडावाले अनी चांगल्या कामसमा तत्पर अस आपला स्वतःकरता शुध्द लोके असा करीसन ठेवानं.
यामुये तुमले व्हई तीतला प्रयत्न करीसन ईश्वासमा सात्त्विकतातीन, सात्त्विकतामा ज्ञाननी भर, ज्ञानमा इंद्रियदमननी, इंद्रियदमनमा धीरनी, धीरमा सुभक्तीनी, तुमनी सुभक्तीमा बंधुप्रितीनी अनं बंधुप्रितीमा प्रितीनी भर टाका.
जर तुम्हीन चांगला गोष्टीस कराकरता तयार शेतस तर तुमनं वाईट करनारा कोण?
दिवा लाईसन चंपानाखाल ठेवतस नही, दिवठणीवर ठेवतस म्हणजे तो घरमधला सर्वासले प्रकाश देस. तसच तुमना प्रकाश लोकससमोर असा पडू द्या की, त्यासनी तुमना सत्कर्म दखीसन तुमना स्वर्गमधला बापनं गौरव कराले पाहिजे.
जसं तुमना स्वर्गीय पिता दयाळु शे तसा तुम्हीन बी दयाळु व्हा.