Bíblia
A Bíblia é a Palavra de Deus — viva, eficaz e mais cortante que espada de dois gumes. Toda Escritura é inspirada por Deus e útil para ensinar, repreender, corrigir e instruir em justiça.
Inspiração divina
Toda Escritura é inspirada por Deus. Homens santos falaram da parte de Deus movidos pelo Espírito Santo.
संपूर्ण पवित्रशास्त्र परमेश्वराच्या प्रेरणेने रचलेले आहे आणि शिक्षण, निषेध, सुधारणा, नीतिमत्वाचे शिक्षण याकरिता उपयोगी आहे. यासाठी की, परमेश्वराचा सेवक पूर्णपणे प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.
लहानपणापासूनच पवित्रशास्त्र तुला माहीत आहे. हेच पवित्रशास्त्र ख्रिस्त येशूंमधील विश्वासाच्याद्वारे परमेश्वराचे तारण स्वीकारण्यासाठी तुला सुज्ञ करते. संपूर्ण पवित्रशास्त्र परमेश्वराच्या प्रेरणेने रचलेले आहे आणि शिक्षण, निषेध, सुधारणा, नीतिमत्वाचे शिक्षण याकरिता उपयोगी आहे. यासाठी की, परमेश्वराचा सेवक पूर्णपणे प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.
सर्वात महत्त्वाचे, प्रथम हे ध्यानात ठेवा की, धर्मशास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा संदेष्ट्यांच्या स्वतःच्या कल्पनेने करता येत नाही. कारण भविष्यकथन मनुष्यांच्या इच्छेने कधी झालेले नाही, तर संदेष्ट्यांनी, जरी ते मनुष्य होते तरी पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन परमेश्वराकडून आलेला संदेश सांगितला आहे.
तू सत्यवचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कोणतेही कारण नसलेला, परमेश्वराच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा तू स्वतःस परमेश्वराला सादर करण्याचा प्रयत्न कर.
तू वचनाची घोषणा करीत राहा. वेळी अवेळी त्यामध्ये तत्पर राहा. सर्व सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर आणि बोध कर.
मी तिथे येईपर्यंत सार्वजनिक शास्त्रवाचन करण्यात, बोध करण्यात, शिक्षण देण्यात तत्पर राहा.
Poder da Palavra
A Palavra de Deus é viva e eficaz. O céu e a terra passarão, mas as minhas palavras jamais passarão.
कारण परमेश्वराचे वचन जिवंत व सक्रिय आहे. ते कोणत्याही दुधारी तलवारीहून अधिक तीक्ष्ण असून जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा यांना खोलवर भेदून जाणारे व अंतःकरणातील विचार आणि वृत्ती यांचा न्याय करणारे आहे.
आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
तेव्हा येशूंनी उत्तर दिले, " ‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्या प्रत्येक वचनाने जगेल’ असे लिहिले आहे."
आकाशातून पाऊस व हिम
ज्याप्रमाणे खाली पडतात
आणि पृथ्वीला भिजवून टाकल्याशिवाय
परत जात नाहीत
आणि तिला अंकुरतात व बहरतात,
जेणेकरून पेरणार्यासाठी बीज निपजते व खाणार्याला भाकर मिळते,
त्याप्रमाणे माझे वचन, जे माझ्या मुखातून बाहेर पडते:
ते कार्य केल्याशिवाय माझ्याकडे परत येत नाही,
पण ते माझ्या इच्छेप्रमाणे सर्व परिपूर्ण करते
व ज्या कार्यासाठी पाठविण्यात आले, तो माझा हेतू साध्य करते.
सत्याने त्यांना पवित्र करा; तुमचे वचन सत्य आहे.
तुम्ही मेहनतीने शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे, असे तुम्हाला वाटते. तेच शास्त्रलेख माझ्याबद्दल साक्ष देतात;
परंतु प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते."
आणि हेच ते वचन आहे ज्याचा प्रचार तुम्हाला करण्यात आला होता.
तरुण मनुष्य शुद्ध मार्गावर कसा चालत राहील?
ते तुमच्या वचनानुसार आचरण करूनच.
तुमची सर्व वचने पूर्णपणे सत्य आहेत;
तुमचे सर्व नीतियुक्त न्याय अनंतकाळचे आहेत.
ש शीन
Estudar e pregar
Os bereanos examinavam as Escrituras diariamente. Procura apresentar-te a Deus aprovado como obreiro que maneja bem a Palavra.
आता बिरुया येथील यहूदी थेस्सलनीकातील लोकांपेक्षा थोर चरित्राचे होते, त्यांनी संदेश मोठ्या उत्सुकतेने ऐकला पौलाची विधाने खरी आहेत की नाहीत, हे ते प्रतिदिवशी वचनांची तपासणी करून पाहात असत.
आपल्या रीतीप्रमाणे, पौल सभागृहामध्ये गेला आणि लागोपाठ तीन शब्बाथ दिवस त्याने धर्मशास्त्रावरून त्यांच्याशी संवाद केला, त्याने त्यांना स्पष्टीकरण करून पटवून दिले की, ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यामधून पुन्हा उठावे याचे अगत्य आहे. तो त्यांना म्हणाला, "या येशूंची मी तुम्हाला घोषणा करीत आहे, तेच ख्रिस्त आहेत."
मग फिलिप्प धावत रथापर्यंत गेला आणि तो खोजा यशायाह संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता. ते ऐकून त्याने त्याला विचारले, "आपण जे वाचत आहात ते आपणास समजते काय?"
तो म्हणाला, "कोणीतरी स्पष्टीकरण करून सांगितल्याशिवाय हे मला कसे समजेल?" म्हणून त्याने फिलिप्पाला विनंती केली की, त्याने रथात चढून त्याच्याजवळ बसावे.
शास्त्रलेखातील जो उतारा तो षंढ वाचीत होता तो असा होता:
"वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले,
आणि लोकर कातरणार्यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते,
तसेच त्याने आपले मुख उघडले नाही.
तेव्हा फिलिप्पाने त्याच शास्त्रलेखापासून सुरुवात करून त्याला येशूंची शुभवार्ता सांगितली.
कारण एज्रा याहवेहच्या नियमांचा अभ्यास करण्यास, ते पाळण्यास, व ते नियम इस्राएली लोकांना शिकविण्यासाठी समर्पित होता.
तेव्हा येशू त्यांना म्हणाले, "तुम्ही मूर्ख आहात आणि संदेष्ट्यांनी जे लिहिले आहे त्यावर विश्वास ठेवण्यास मतिमंद आहात. आपल्या गौरवात जाण्यापूर्वी या गोष्टी ख्रिस्ताने सहन करणे गरजेचे आहे असे नाही काय?" नंतर त्यांनी संपूर्ण धर्मशास्त्रातील मोशे व सर्व संदेष्ट्यांच्या लिखाणामधून स्वतःविषयी काय सांगितले आहे, हे त्यांना स्पष्ट केले.
मग येशू त्यांच्याजवळ येऊन त्यांना म्हणाले, "स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. यास्तव सर्व राष्ट्रांमध्ये जाऊन शिष्य बनवा आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; आणि मी तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांना सर्वकाही पाळावयास शिकवा आणि मी सदैव, युगाच्या अंतापर्यंत तुमच्याबरोबर आहे."
जात असताना, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे’ अशी घोषणा करा.
Revelação e fidelidade
A Palavra do Senhor veio aos profetas. A graça de Deus se manifestou na Escritura para a salvação de todos.
मग याहवेहचे वचन एलीयाहकडे आले:
पेथूएलचा पुत्र योएलकडे याहवेहचे वचन आले.
नंतर यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले:
एक भविष्यवाणी: संदेष्टा मलाखी द्वारे याहवेहने इस्राएलला दिलेले वचन.
जखर्याहला याहवेहकडून पुन्हा संदेश आला:
तेव्हा याहवेहचे वचन यशायाहकडे आले:
सार्वभौम याहवेहचा आत्मा मजवर आहे,
कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी
याहवेहने माझा अभिषेक केला आहे.
भग्नहृदयी लोकांचे सांत्वन करण्यासाठी,
कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी
व अंधकारातून बंदिवानांना मुक्त करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.
याहवेहच्या कृपेचे वर्ष
आणि परमेश्वराचा सूड घेण्याचा दिवस आला आहे, हे जाहीर करण्यास,
आणि जे सर्व विलाप करतात त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.
सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना—
राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट,
विलापाऐवजी
आनंदाचे तेल,
निराशेच्या आत्म्याऐवजी
स्तुतीचे वस्त्र
बहाल करण्यासाठी.
कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी
ते नीतिमत्तेचे एला वृक्ष
याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.
Viver pela Palavra
Não só de pão vive o homem. Nada acrescentes nem diminuas. A Palavra é alimento, guia e espada do cristão.
"परमेश्वराचा प्रत्येक शब्द दोषरहित आहे;
जे त्यांच्याकडे आश्रय घेतात, त्यांची ते ढाल आहेत.
त्यांच्या वचनात भर घालू नका.
नाहीतर ते तुम्हाला रागावतील आणि तुम्ही लबाड आहात हे सिद्ध होईल.
या पुस्तकातील संदेश ऐकणार्या प्रत्येकाला मी सावध करतो: या ग्रंथपटात जे लिहिले आहे त्यात कोणी भर घातली, तर परमेश्वर त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा आणेल. तसेच जो कोणी या भविष्यकथनच्या पुस्तकात वर्णन केलेल्या वचनांतून काही काढून टाकील, परमेश्वर त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून काढून टाकील.
मला आश्चर्य वाटते की, ज्यांनी तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत जगण्यासाठी बोलाविले, त्यांना सोडून तुम्ही इतक्या लवकर वेगळ्या शुभवार्तेकडे वळत आहात, जी खरोखर शुभवार्ता नाहीच. काही लोक उघडपणे तुम्हाला गोंधळात टाकीत आहेत आणि ख्रिस्ताच्या शुभवार्तेत बदल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु ज्या शुभवार्तेचा प्रचार आम्ही तुम्हाला केला, त्या व्यतिरिक्त जर आम्ही किंवा स्वर्गातून एखादा देवदूतसुद्धा प्रचार करीत असेल तर त्यांच्यावर परमेश्वराचा शाप येवो! जसे आम्ही पूर्वी सांगितलेले आहे, म्हणून मी आता पुन्हा सांगतो: जर कोणी तुम्हाला तुम्ही स्वीकारलेल्या शुभवार्ते व्यतिरिक्त दुसरा प्रचार करीत आहेत, तर त्यांच्यावर परमेश्वराचा शाप असो!
आपल्या प्रभूची सहनशीलता ही तारणाचीच संधी आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौलाला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हाला असेच लिहिले आहे, हे तारणच आहे असे समजा. या विषयाचे वर्णन करून तो त्याच्या सर्व पत्रात त्याच प्रकारे लिहितो. त्याच्या पत्रातील काही गोष्टी समजावयास कठीण अशा आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर धर्मशास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा या पत्राचाही करतात. अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.
कारण जे काही पूर्वी लिहिण्यात आले, ते सर्व आपल्याला शिक्षण मिळावे म्हणून लिहिले गेले, यासाठी की धीर धरून शास्त्रलेखापासून मिळणार्या प्रोत्साहनाद्वारे आपण आपल्या आशेला दृढ धरून राहवे.
ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही, तर ते त्याचा धावा कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी कधी ऐकलेच नाही, तर त्याच्यावर विश्वास कसा ठेवतील? आणि कोणी त्यांना संदेश सांगितलाच नाही, तर ते कसे ऐकतील? आणि कोणाला पाठविल्यावाचून ते संदेश कसा सांगतील? कारण असे लिखित आहे: "शुभवार्ता आणणार्याचे पाय किती मनोरम आहेत!"
परंतु शुभवार्ता सर्वच इस्राएल लोकांनी स्वीकारली नाही. यशायाह म्हणतो, "प्रभू, आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे?" तरीपण, संदेश ऐकल्यानेच विश्वास प्राप्त होतो, आणि ख्रिस्ताचा संदेश, वचन ऐकल्यामुळे प्राप्त होतो.
शुभवार्तेची मला लाज वाटत नाही, कारण त्यावर विश्वास ठेवणार्या प्रत्येकाचे, प्रथम यहूदीयांचे नंतर गैरयहूदीयांचे तारण करण्यास ती परमेश्वराचे सामर्थ्य आहे. या शुभवार्तेमध्ये परमेश्वराचे नीतिमत्व प्रकट होते व हे नीतिमत्व विश्वासाने प्रथमपासून शेवटपर्यंत विश्वासाद्वारे साध्य होते, कारण असे लिहिले आहे, "नीतिमान विश्वासाने जगेल."
आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही, परंतु जो आत्मा परमेश्वरापासून आहे तो मिळाला आहे, यासाठी की परमेश्वराने आपल्याला जे विनामूल्य दिले आहे, ते आपण समजून घ्यावे. आम्ही असे बोलतो हे मानवी ज्ञानाने शिकविलेले शब्द नव्हे, तर आत्म्याने शिकविलेले शब्द म्हणजे आत्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करण्याकरिता आम्ही आत्म्याने शिकविलेले शब्द वापरतो. परंतु जो मनुष्य आत्मिक नाही, तो परमेश्वराच्या आत्म्यापासून आलेल्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्याला त्या मूर्खपणाच्या वाटतात, त्याला त्या समजणार नाहीत, कारण त्या गोष्टी परमेश्वराच्या आत्म्यानेच पारखल्या जाऊ शकतात.
कारण परमेश्वराच्या ज्ञानामध्ये असतानाही जगाला त्याच्या ज्ञानाद्वारे परमेश्वराला ओळखता आले नाही, जो प्रचार मुर्खपणाद्वारे केला होता त्यावर विश्वास ठेवणार्या सर्वांचे परमेश्वराने आनंदाने तारण केले.
यहूदी लोक चिन्हाची मागणी करतात; आणि ग्रीक लोक ज्ञान शोधतात. पण आम्ही क्रूसावर खिळलेल्या ख्रिस्ताला गाजवितो: जो यहूदीयांना अडखळण आणि गैरयहूदीयांना मूर्खपणा असा आहे, परंतु परमेश्वराने ज्यांना बोलाविले आहे, त्या यहूदी आणि ग्रीक, या दोघांनाही ख्रिस्त हे परमेश्वराचे सामर्थ्य आणि ज्ञान आहे.
कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्याकरिता नव्हे, तर शुभवार्तेचा प्रचार करण्याकरिता पाठविले आहे—वाक्पटुतेने व ज्ञानाने नव्हे, यामुळे असे न होवो की ख्रिस्ताच्या क्रूसाचे सामर्थ्य रिक्त व्हावे.
परंतु तुम्ही निवडलेले लोक, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, परमेश्वराचे विशेष धन आहात, यासाठी की ज्यांनी तुम्हाला अंधारातून काढून त्यांच्या अद्भुत प्रकाशात आणले त्यांच्या स्तुतीची घोषणा करावी.