Céu
O céu é a morada eterna de Deus e a esperança final do cristão. A Bíblia descreve o céu como lugar de glória, alegria e comunhão perfeita com o Criador.
A morada de Deus
Na casa de meu Pai há muitas moradas. Os céus declaram a glória de Deus — e um dia habitaremos lá eternamente.
माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हास तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो
आकाश देवाचा गौरव जाहीर करते,
आणि अंतराळ त्याच्या हातचे कृत्य दाखविते.
दिवस दिवसाशी बोलतो,
रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.
हे देवा, तू आकांशाच्यावर उंचावलेला आहे.
आणि तुझी महिमा सर्व पृथ्वीवर होवो.
पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण करणारा परमेश्वर
त्याच्या नावामुळे आम्हास मदत मिळते.
स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे?
पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय कोणी प्रिय नाही?
प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. पृथ्वी अंदाधुंद व रिकामी होती. जलाशयावर अंधकार होता, देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालत होता.
ज्याने आकाशामध्ये आपल्या माड्या बांधल्या,
आणि आपला घुमट पृथ्वीत स्थापिला आहे,
जो समुद्राच्या पाण्याला बोलवून पृथ्वीच्या पाठीवर ओततो,
त्याचे नाव परमेश्वर आहे.
परमेश्वर असे म्हणतो, कोण असा आहे जो गुप्त ठिकाणी लपतो म्हणजे मी त्यास पाहू शकणार नाही?
मी स्वर्ग आणि पृथ्वी भरून उरलो नाही काय?
अहा, प्रभू परमेश्वरा! पाहा! तू एकट्याने आपल्या महान सामर्थ्याने व आपला उभारलेल्या बाहूने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलीस. तुला खूप अवघड आहे असे म्हणण्यास काहीच नाही.
Cidadania celestial
A nossa cidadania está nos céus. Ajuntai tesouros no céu, não na terra. O céu é a pátria do cristão.
आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहत आहोत.
तुम्ही पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका कारण येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. म्हणून त्याऐवजी स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा.
परंतु येशू म्हणाला, "लहान मुलांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे."
येशूने उत्तर दिले, "तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टाक आणि ते पैसे गरीबांना वाटून दे. म्हणजे स्वर्गात तुला मोठी संपत्ती मिळेल आणि चल, माझ्यामागे ये."
आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.
वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका;
Esperança eterna
Seremos arrebatados para encontrar o Senhor nos ares. Ainda não se manifestou o que havemos de ser — mas seremos semelhantes a Ele.
कारण आज्ञा करणाऱ्या गर्जणेने, आद्यदेवदूतांची वाणी आणि देवाच्या कर्ण्याचा आवाज येईल, तेव्हा प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तात मरण पावलेले प्रथम उठतील. मग आपण जे जिवंत आहोत व मागे राहू, ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी ढगात उचलले जाऊ आणि सर्वकाळ प्रभूबरोबर राहू.
प्रियांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत आणि भविष्यकाळात आम्ही कसे असू हे आम्हास माहीत नाही. तरीही आम्हास माहीत आहे की, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू, कारण तो जसा आहे तसे आम्ही त्यास पाहू. आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, जसा ख्रिस्त शुद्ध आहे, तसा तो आपणाला शुद्ध करतो.
प्रभू मला प्रत्येक वाईट कामापासून सोडवील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्यास सदासर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन.
नंतर तो त्यांना बाहेर दूरवर बेथानीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने हात वर करून आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद देत असतानाच तोपर्यंत आकाशात घेतला गेला.
असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर तो वर घेतला गेला, आणि मेघांनी त्यास दृष्टीआड केले.
कारण आपले झगडणे रक्त आणि मांसाबरोबर नाही, तर सत्ताधीशांविरुद्ध, अधिकाऱ्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या अधिपतीबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्याविरुद्ध आहे.
कारण आपण जगात काहीही आणले नाही आणि आपल्याच्याने या जगातून काहीही बाहेर घेऊन जाता येत नाही. जर आपणास अन्न, वस्त्र असल्यास तेवढ्याने आपण संतुष्ट असावे.
कारण जसे आकाश पृथ्वीपेक्षा उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझे विचार तुमच्या विचांरापेक्षा उंच आहेत.
प्रत्येक गोष्टीला नेमलेला समय असतो आणि आकाशाखाली प्रत्येक कार्याला समय असतो.
जसा मनुष्य आपल्या आईच्या उदरातून नग्न जन्मला,
जसा तो आला तसाच, तो नग्न परत जाईल.
आपल्या कामापासून आपल्या हातात काहीही घेऊन जाऊ शकत नाही.