Comunhão com Deus
A comunhão com Deus é o propósito supremo da existência humana. Fomos criados para viver em intimidade com o Criador — e em Cristo, esse acesso é plenamente restaurado.
Em comunhão com Deus
Deus é fiel, pelo qual fostes chamados à comunhão de seu Filho. A comunhão com Deus é dom da graça e fruto da redenção.
परमेश्वर ज्यांनी त्यांचा पुत्र आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या सहभागितेत तुम्हाला बोलाविले ते विश्वसनीय आहेत.
तुम्ही स्वतः परमेश्वराचे मंदिर आहात आणि परमेश्वराचा आत्मा तुम्हामध्ये वस्ती करतो हे तुम्हाला माहीत नाही का?
जसे शरीर एक असून, अनेक अवयव आहेत, तरी हे सर्व अवयव मिळून एकच शरीर होते, तसेच ख्रिस्ताविषयीही आहे.
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाबरोबर असो.
आणि परमेश्वराचे मंदिर व मूर्ती, यांच्यामध्ये कसा मेळ बसणार? कारण आम्ही परमेश्वराचे मंदिर, जिवंत परमेश्वराचे घर आहोत आणि परमेश्वराने म्हटले आहे:
"मी त्यांच्यामध्ये राहीन
आणि त्यांच्यामध्ये चालेन;
मी त्यांचा परमेश्वर होईन
आणि ते माझे लोक होतील."
जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी सृष्टी झाला आहे; जुने संपले आहे व सर्व नवीन झाले आहे. हे सर्व परमेश्वरापासून आहे, ज्यांनी आमचा त्यांच्याशी ख्रिस्ताद्वारे समेट केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली आहे. परमेश्वर ख्रिस्ताद्वारे जगाशी समेट घडवून आणत होते आणि लोकांची पातके त्यांच्याविरुद्ध मोजत नव्हते. हाच समेटाचा संदेश त्यांनी आम्हाकडे सोपवून दिला आहे.
Presença divina
Eis que estou à porta e bato. O Senhor fez sua morada entre nós — e toda a criação é convidada à comunhão eterna.
पाहा! मी दाराशी उभा राहून, दार ठोठावीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, तर मी आत येईन; मी त्याच्याबरोबर भोजन करेन आणि तो माझ्याबरोबर भोजन करेल.
राजासनावरून मला एक मोठी वाणी ऐकू आली. ती म्हणाली, "पाहा! परमेश्वराचे वसतिस्थान आता मनुष्यांबरोबर आहे; ते स्वतः त्यांच्याबरोबर राहतील; ते त्यांचे लोक होतील; आणि ते त्यांचे परमेश्वर होतील.
मग मी इस्राएली लोकात राहीन आणि त्यांचा परमेश्वर होईन.
कारण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात, तिथे मी उपस्थित आहे."
"माझी प्रार्थना केवळ त्यांच्यासाठीच नाही. जे त्यांच्या संदेशाद्वारे मजवर विश्वास ठेवतील मी त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करतो. हे पित्या, तुम्ही मजमध्ये व मी तुम्हामध्ये आहे, तसेच त्या सर्वांनी एक व्हावे, म्हणजे तुम्ही मला पाठविले असा जग विश्वास ठेवेल. तुम्ही जे गौरव मला दिले ते मी त्यांना दिले, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे, मी त्यांच्यामध्ये व तुम्ही माझ्यामध्ये यासाठी आहोत की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तुम्ही मला पाठविले आहे आणि जशी तुम्ही मजवर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली आहे.
Viver na comunhão
Quem permanece nele e ele no Senhor, esse dá muito fruto. A comunhão com Deus produz transformação e alegria.
जे कोणी परमेश्वराच्या आज्ञा पाळतात ते परमेश्वरामध्ये राहतात आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये राहतात. आणि अशा रीतीने आपल्याला समजते की परमेश्वर आपल्यामध्ये राहतात: परमेश्वराने जो आत्मा आपणास दिला आहे त्याद्वारे हे आपणास समजून येते.
आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की, परमेश्वराचे पुत्र ख्रिस्त आले आहेत आणि आपण खर्या परमेश्वराला ओळखावे यासाठी त्यांनी आपल्याला बुद्धी दिली आहे. त्यांचे पुत्र येशू ख्रिस्तामध्ये असल्याने, जे खरे आहेत त्यांच्यामध्ये आपण आहोत. तेच एकमेव खरे परमेश्वर आहेत आणि तेच सार्वकालिक जीवन आहेत.
ते आपल्यामध्ये राहतात व आपण त्यांच्यामध्ये राहतो, याचा पुरावा हा आहेः त्यांनी स्वतःचा पवित्र आत्मा आपल्याला दिला आहे.
प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीती करू या, कारण प्रीती परमेश्वरापासून आहे. जे कोणी प्रीती करतात ते परमेश्वरापासून जन्मले आहेत आणि ते परमेश्वराला ओळखतात.
आम्ही जे पाहिले व ऐकले आहे तेच तुम्हाला सांगत आहोत, यासाठी की तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर सहभागी व्हावे. आमची सहभागिता पित्याबरोबर आणि त्यांचा पुत्र येशू ख्रिस्ताबरोबर आहे.
आता प्रिय मुलांनो, सतत त्यांच्यामध्ये राहा, म्हणजे ते प्रकट होतील त्यावेळी आपण आत्मविश्वासपूर्वक असावे आणि त्यांच्या येण्याच्या दिवशी त्यांच्यासमोर आपणास लज्जित व्हावे लागणार नाही.
ज्याअर्थी, विश्वासाद्वारे आपल्याला नीतिमान ठरविण्यात आले आहे, त्याअर्थी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराबरोबर शांती आहे, ख्रिस्ताद्वारे विश्वासामुळेच त्यांनी आपल्याला या कृपेत प्रवेश दिला आहे. येथे आपण स्थिर आहोत व आपण परमेश्वराच्या आशेच्या गौरवाची प्रौढी मिरवितो.
म्हणून आपली हृदये शुद्ध करण्यासाठी शिंपडले, दोषी विवेकापासून मुक्त झालेले व शुद्ध पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने परमेश्वराजवळ येऊ.
तुम्ही स्वतः परमेश्वराच्या अधीन व्हा. सैतानाचा विरोध करा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल; तुम्ही परमेश्वराजवळ या म्हणजे ते तुम्हाजवळ येतील. अहो पाप्यांनो, आपले हात धुवा आणि दुहेरी मनाचे जे आहेत त्यांनी आपली अंतःकरणे शुद्ध करावीत.