Comunhão com os irmãos
A comunhão com os irmãos é marca da igreja verdadeira. Os cristãos primevos perseveravam na comunhão — partindo pão, orando e encorajando-se mutuamente.
Comunhão verdadeira
Perseveravam na doutrina dos apóstolos e na comunhão. A comunhão autêntica envolve amor sacrificial e acolhimento mútuo.
ज्यांनी हा त्यांचा संदेश ग्रहण केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी सुमारे तीन हजार लोकांची त्यांच्या संख्येत भर पडली.
विश्वासणार्यांची सहभागिता
प्रेषितांद्वारे दिले जात असलेले शिक्षण आणि सहभागिता, भाकर मोडणे आणि प्रार्थना यासाठी ते स्वतः समर्पित झाले. प्रेषितांद्वारे झालेली अनेक अद्भुते व चिन्हे पाहून सर्वांच्या मनामध्ये भीतियुक्त आदर निर्माण झाला होता. तेव्हा सर्व विश्वासणारे एकत्र होते आणि त्यांच्याजवळ असलेले सर्वकाही समाईक होते. जे कोणी गरजवंत होते, त्यांना देण्यासाठी त्यांनी त्यांच्या जमिनी आणि मालमत्ता विकल्या. दररोज मंदिराच्या अंगणात ते एकत्र जमत होते आणि त्यांच्या घरांमध्ये भाकर मोडीत असत आणि मोठ्या आनंदाने व कृतज्ञ मनाने एकत्र खात होते, परमेश्वराची स्तुती करीत होते आणि सर्व लोकांकडून त्यांना चांगली वागणूक मिळाल्याचा आनंद ते करीत होते आणि प्रभूने त्यांच्या संख्येत प्रत्येक दिवशी तारण पावलेल्यांची भर घातली.
आणि प्रीती व चांगली कृत्ये करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांना प्रेरित करू या. आपण कित्येकांच्या सवयीप्रमाणे आपले एकत्रित मिळणे न सोडता एकमेकांना उत्तेजन द्यावे आणि तो दिवस जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते म्हणून तसे एकत्रित मिळून एकमेकांना अधिक उत्तेजन द्यावे.
ती किती मनोरम आणि सुखदायी स्थिती असते,
जेव्हा परमेश्वराचे लोक एकोप्याने राहतात,
ते अहरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या मोलवान तेलासमान,
त्याच्या दाढीवर ओघळलेल्या,
अहरोनाच्या दाढीवर ओघळलेल्या,
झग्याच्या काठापर्यंत आलेल्या सुगंधी तेलाप्रमाणे आहे.
हे जणू सीयोन पर्वतावर पडणार्या
हर्मोनातील दवबिंदूप्रमाणे आहे.
कारण हे ते स्थान आहे,
ज्याला सार्वकालिक आशीर्वाद देण्याचा याहवेहनी संकल्प केला आहे.
जेव्हा आम्ही आराधकांसह चालत होतो,
तेव्हा त्याच्यासोबत परमेश्वराच्या भवनातील
मधुर सहभागितेचा
मी आनंद घेतला होता.
एकापेक्षा दोघेजण बरे!
कारण त्यांच्या कष्टाचे अधिक चांगले प्रतिफळ मिळेल:
दोघांपैकी एकजण पडला,
तर दुसरा त्याला मदत करून उठवेल,
परंतु एकजण पडला आणि त्याला उचलण्यास कोणी नसला
तर ते दयनीय आहे.
जेव्हा दोन व्यक्ती झोपतील तेव्हा ते एकमेकांना ऊब देतील,
पण कोणी एकटा असल्यास, त्याला ऊब कशी मिळणार?
एकट्या व्यक्तीवर मात करता येते,
दोघे स्वतःचा बचाव करू शकतात,
तीन पदरी दोर सहजपणे तुटत नाही.
Amor fraternal
Amai-vos com amor fraternal sincero. Encorajem-se mutuamente e carreguem os fardos uns dos outros.
आता सत्याचे आज्ञापालन करून तुम्ही स्वतःला शुद्ध केले आहे यासाठी की, तुमची एकमेकांवर खरी प्रीती असावी आणि एकमेकांवर खोल अंतःकरणापासून प्रीती करावी.
कुरकुर न करता एकमेकांचे आदरातिथ्य करा.
एकमेकांवर बंधुभावाने प्रीती करा आणि आपल्यापेक्षा इतरांचा आदर करा.
ख्रिस्ताच्या नम्रतेचे अनुकरण
यास्तव ख्रिस्ताच्या ठायी ऐक्यता असल्यामुळे काही उत्तेजन, त्यांच्या प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, जर काही करुणा व कळवळा आहे, तर तुम्ही एकमेकांशी सहमत होणारे, सारखीच प्रीती करणारे आणि एका आत्म्याचे व एकमनाचे होऊन माझा आनंद परिपूर्ण करा.
स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते, यांच्याद्वारे कृतज्ञ अंतःकरणातून परमेश्वराला गाणी गाऊन एकमेकांना पूर्ण सज्ञानाने शिकविताना आणि बोध देताना ख्रिस्ताचा संदेश तुम्हामध्ये विपुलतेने राहो.
एकमेकांना दयाळू व कनवाळूपणे वागवा; जशी परमेश्वराने तुम्हाला ख्रिस्तामध्ये क्षमा केली, तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा.
आत्म्याने प्रेरित जीवन
बंधू व भगिनींनो, तुम्हाला स्वतंत्र होण्यासाठी बोलाविले आहे. पण तुमचे स्वातंत्र्य देहवासना पूर्ण करण्यासाठी वापरू नका, तर प्रीतीने व नम्रपणाने एकमेकांची सेवा करा.
म्हणून तुम्ही आता जे करीत आहात त्याचप्रमाणे एकमेकांना प्रोत्साहन द्या आणि एकमेकांची वुद्धी करण्यासाठी झटा.
जर आम्ही असे म्हणतो की, आमची त्यांच्याबरोबर सहभागिता आहे आणि तरीसुद्धा अंधारात राहतो तर आम्ही खोटे बोलतो आणि खरेपणाने जगत नाही. परंतु जसे ते प्रकाशात आहेत, तसे आम्ही प्रकाशामध्ये चाललो, तर आमची एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्यांचा पुत्र येशू यांचे रक्त सर्व पापापासून आम्हाला शुद्ध करते.
शेवटच्या शुभेच्छा
शेवटी, बंधू आणि भगिनींनो, आनंद करा! मी सांगितले त्याकडे लक्ष पुरवा. परिपूर्ण होण्यासाठी झटा, एकचित्त व्हा, उत्तेजन द्या व शांतीने राहा आणि प्रीतीचा व शांतीचा परमेश्वर तुम्हाबरोबर असो.
"मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देत आहे: तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे.