Confiabilidade
A confiabilidade de Deus é absoluta. Ele é fiel em todas as suas promessas, constante em seu amor e seguro em seu caráter. Podemos confiar nele completamente.
Deus é fiel
O Senhor é fiel em todas as suas palavras e bondoso em todos os seus atos. Grande é a sua fidelidade!
याहवेहच्या महान प्रीतीमुळे आम्ही पूर्णपणे भस्म झालेलो नाही
कारण त्यांच्या कृपेचा कधीही ऱ्हास होत नाही.
त्यांची प्रेमदया प्रतिदिवशी नवी होते;
तुमची विश्वसनीयता महान आहे.
जे त्यांचा धावा करतात,
जे खरोखर मनापासून त्यांचा धावा करतात, त्यासर्वांच्या समीप याहवेह असतात.
याहवेह माझे निर्दोषत्व सिद्ध करतील;
परमेश्वरा, तुमची करुणा सनातन आहे—
आपल्या हस्तकृतीचा त्याग करू नका.
परंतु याहवेहची प्रेममयदया त्यांचे भय धरणार्यांवर
अनादि पासून अनंतकालापर्यंत
तथा त्यांची नीतिमत्ता त्याच्या पुत्र पौत्रांना लाभते.
जे त्यांच्या कराराशी प्रामाणिक राहतात,
आणि त्यांच्या आज्ञा पाळण्याची आठवण ठेवतात.
परंतु जे त्यांचे भय धरतात,
ज्यांची आशा त्यांच्या अक्षय प्रीतीवर आहे, त्यांच्यावर याहवेहची दृष्टी असते.
ते त्यांना मृत्यूपासून सोडवून,
दुष्काळात त्यांच्या प्राणाचे रक्षण करतात.
कारण याहवेहस न्यायी प्रिय आहे;
ते आपल्या विश्वासू भक्तांचा कधीही त्याग करणार नाही.
दुष्टपणा करणारे लोक मात्र पूर्णपणे नाश पावतील,
दुष्टांची संतती नष्ट होऊन जाईल.
परंतु प्रभू विश्वासू आहेत, ते तुम्हाला सामर्थ्यवान करतील आणि दुष्टापासून तुमचे रक्षण करतील,
मनुष्यमात्रावर येणार्या सर्वसाधारण परीक्षेपेक्षा वेगळी परीक्षा तुम्हावर आलेली नाही आणि परमेश्वर विश्वासू आहेत; ते तुमच्या सहनशक्तीपलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाहीत. तुम्ही ते सहन करण्यास समर्थ व्हावे म्हणून परीक्षा आली असताना त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सिद्ध करतील.
म्हणून हे जाणून घ्या की, याहवेहच तुमचे परमेश्वर आहेत; ते विश्वासू परमेश्वर आहेत, जे त्यांच्यावर प्रीती करतात आणि त्यांच्या आज्ञा पाळतात, अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत ते आपल्या प्रीतीचा करार पाळतात.
याहवेह स्वतः तुझ्यापुढे चालतील आणि तुझ्याबरोबर राहतील; ते तुला कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाहीत. भिऊ नकोस; निरुत्साही होऊ नकोस."
Caráter de Deus
Toda boa dádiva vem do alto. O Senhor é bom e sua misericórdia dura para sempre. Nele podemos descansar.
प्रत्येक उत्तम व परिपूर्ण दान वरून आहे, ते स्वर्गातील प्रकाशाचे पिता जे छायेसारखे बदलत नाहीत, त्यांच्यापासून येते.
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत;
त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.
हे प्रभू, तुम्ही क्षमाशील आणि चांगले आहात,
तुमच्याकडे धाव घेणार्या सर्वांवर तुम्ही विपुल दया करता.
कारण ते तहानेल्यास तृप्त करतात,
आणि भुकेल्या जिवास उत्तम पदार्थांनी संतुष्ट करतात.
परंतु मी दररोज सकाळी तुमचे सामर्थ्य
आणि तुमची दया यांची गीते गाईन,
कारण माझ्या दुःखाच्या व संकटाच्या दिवसात तुम्ही माझे
आश्रयदुर्ग आणि शरणस्थान आहात.
तू आपला भार याहवेहवर टाक
आणि ते तुला आधार देतील;
नीतिमानाला ते कधीही
विचलित होऊ देणार नाही.
ते तुझा पाय कदापि घसरू देणार नाहीत;
तुझे रक्षक डुलकीही घेत नाही.
Integridade e confiança
Eu sou o Alfa e o Ômega — Deus é o mesmo ontem, hoje e sempre. Fiel em o que realizou e realizará por cada filho.
प्रभू परमेश्वर म्हणतात, "मीच अल्फा व ओमेगा, जे होते आणि जे येणार आहेत, ते सर्वसमर्थ परमेश्वर आहेत."
हे याहवेह, तुमचे शासन सदासर्वकाळचे आहे;
तुमचे राजासन पिढ्यान् पिढ्या स्थिर आहे.
याहवेह तुम्ही माझे परमेश्वर आहात;
मी तुम्हाला उंचावेन आणि तुमच्या नावाची स्तुती करेन,
कारण परिपूर्ण विश्वासूपणाने
तुम्ही अद्भुत गोष्टी केल्या आहेत,
ज्या फार पूर्वीपासून योजलेल्या होत्या.
मनुष्य इच्छा बाळगतो की त्याला अतूट प्रेम मिळावे;
लबाडी करण्यापेक्षा गरीब राहणे बरे.
चहाडी करण्याने विश्वासघात होतो,
परंतु विश्वासपात्र मनुष्य गुपित उघड करीत नाही.
नीतिमानाचा प्रामाणिकपणा त्यांचे मार्गदर्शन करतो,
परंतु दुटप्पीपणा विश्वासघातकी लोकांचा नाश करतो.
"त्याचा धनी म्हणाला, ‘शाबास, चांगल्या व विश्वासू दासा! तू लहान गोष्टीत विश्वासू राहिलास; मी तुझी पुष्कळ गोष्टींवर नेमणूक करेन; ये आणि तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो!’
आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही. माझ्या नावाने मागा म्हणजे मिळेल आणि तुमचा आनंद पूर्ण होईल.