Confiar no Senhor
Confiar no Senhor é a base de toda vida espiritual. A confiança em Deus nos livra do medo, nos dá paz e nos posiciona para receber as promessas divinas.
Confiar de todo coração
Confia no Senhor de todo o coração. Não te apoies em teu próprio entendimento — em todos os caminhos o reconheça.
तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहवर भरवसा ठेव;
आणि स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस;
तुझ्या सर्व मार्गात तू त्यांच्या अधीन राहा,
आणि ते तुझे मार्ग सुकर करतील.
जो परमोच्चाच्या आश्रयाखाली राहतो,
तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.
मी याहवेहला म्हणेन, "तेच माझा आश्रय व माझा दुर्ग आहेत,
माझे परमेश्वर, ज्यांच्यावर मी भरवसा ठेवला आहे."
कारण ते पारध्याच्या पाशापासून
आणि प्राणघातक मरीपासून
तुझे रक्षण करतील.
ते आपल्या परांनी तुझ्यावर पाखर घालतील,
त्यांच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल;
त्यांचे सत्य तुझी ढाल व गड होईल.
ज्यांचा याहवेहवर विश्वास आहे, ते सीयोन पर्वतासारखे स्थिर आहेत,
कारण ते कधीही ढळत नाहीत, तर सर्वकाळ टिकतात.
यरुशलेमला वेष्टण करणारे पर्वत जसे तिचे रक्षण करतात,
तसेच आता आणि सदासर्वकाळ,
याहवेह आपल्या लोकांना वेष्टून त्यांचे रक्षण करतात.
वाईट बातमी त्यांना भयभीत करणार नाही;
याहवेहवर पूर्ण भरवसा असल्याने त्यांचे मन स्थिर असते.
याहवेहवर भरवसा ठेव आणि चांगले ते कर;
की तू सुरक्षित कुरणाचा आनंद उपभोगून देशात वसती करू शकशील.
याहवेहमध्ये आनंद कर,
म्हणजे ते तुझ्या हृदयाची मागणी पूर्ण करतील.
तू आपला जीवनक्रम याहवेहच्या स्वाधीन कर;
त्यांच्यावर भरवसा ठेव, म्हणजे ते तुझ्यासाठी हे करतील:
तुझ्या नीतिमत्त्वाचे फळ सूर्योदयेप्रमाणे प्रकाशित होईल,
तुझ्यातील सत्यता भर दुपारच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट होईल.
ज्यांना तुमचे नाव ठाऊक आहे, ते तुमच्यावर भरवसा ठेवतात,
कारण हे याहवेह, जे तुमचा धावा करतात त्यांना तुम्ही कधीही टाकत नाही.
Segurança em Deus
Bem-aventurado o homem que confia no Senhor. Ele é como árvore plantada junto às águas — não temerá quando vier o calor.
"परंतु जो मनुष्य याहवेहवर भरवसा ठेवतो,
जो फक्त याहेवेहवर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादित असो,
ते पाण्याच्या जवळ लावलेल्या झाडासारखे आहेत.
त्याची मुळे खोलवर पाण्यात गेलेली असतात.
या झाडाला उष्णतेचे भय वाटत नाही;
त्याची पाने सदा हिरवी राहतात.
अवर्षणाच्या वर्षांची त्याला काळजी वाटत नाही.
आणि ते आपली रसाळ फळे देण्याचे कधीच थांबत नाही."
याहवेहवर कायम भरवसा ठेवा,
कारण याहवेह, याहवेह स्वत: सनातन खडक आहेत.
निश्चितच परमेश्वर माझे तारण आहेत;
मी भरवसा ठेवेन आणि घाबरणार नाही.
याहवेह, याहवेह स्वतः माझे सामर्थ्य आणि माझे संरक्षण आहेत;
ते माझे तारण झाले आहेत."
सर्वशक्तिमान याहवेह, जे लोक तुमच्यावर भाव ठेवतात,
ते कितीतरी धन्य होत.
कोणी रथांवर आणि कोणी घोड्यांवर भरवसा ठेवतात,
परंतु आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावावर भरवसा ठेऊ.
ती कोसळतील आणि नाश पावतील,
पण आम्ही उठू आणि बळकटपणे उभे राहू.
नश्वर मानवावर भरवसा ठेवण्यापेक्षा,
याहवेहचा आश्रय घेणे उत्तम आहे.
अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा,
याहवेहचा आश्रय घेणे उत्तम आहे.
Não confiar no homem
Não temas — em ti confiarei. Melhor é confiar no Senhor do que confiar no homem ou nos príncipes.
परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन,
याहवेहमध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन—
मी परमेश्वरावरच आपला भरवसा ठेवणार
आणि मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार?
कारण तुमच्या निरंतर प्रीतीवर मी भरवसा ठेवला आहे;
माझे हृदय तुमच्या तारणात हर्ष करीत आहे.
परंतु याहवेह, माझा भरवसा तुमच्यावर आहे.
मी म्हणालो, "तुम्हीच माझे परमेश्वर आहात."
जे लोक याहवेहवर भरवसा ठेवतात,
जे गर्विष्ठांच्या व असत्याकडे वळणार्यांच्या
वार्यासही उभे राहत नाही,
ते धन्य होत.
येशू आपल्या शिष्यांचे सांत्वन करतात
"तुमची हृदये अस्वस्थ होऊ देऊ नका. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा; आणि माझ्यावरसुद्धा विश्वास ठेवा.