Confissão
A confissão é caminho de libertação e restauração. Quando confessamos nossos pecados, Deus é fiel e justo para nos perdoar e nos purificar de toda injustiça.
Confessar e receber perdão
Se confessarmos os nossos pecados, Ele é fiel e justo para nos perdoar. A confissão abre a porta da graça restauradora.
जर आपण आपली पापे त्यांच्याजवळ कबूल करतो, तर ते विश्वसनीय व न्यायी आहेत, म्हणून आपल्या पापांची क्षमा करतील आणि सर्व अनीतीपासून आपल्याला शुद्ध करतील.
नंतर मी माझी सर्व पातके तुमच्याजवळ कबूल केली
आणि माझे अपराध लपविले नाही.
मी स्वतःशी म्हणालो, "मी याहवेहजवळ
माझी पातके कबूल करेन."
तेव्हा तुम्ही माझ्या पातकांच्या
दोषाची क्षमा केली. सेला
मी गप्प राहिलो,
तेव्हा संपूर्ण दिवस माझी हाडे
माझ्या कण्हण्यामुळे जर्जर झाली.
जो कोणी त्याचे पाप झाकून ठेवतो, तो समृद्ध होत नाही,
परंतु जो अपराध कबूल करून ते करण्याचे सोडून देतो त्याला कृपा प्राप्त होते.
परंतु आम्ही पाप आणि चूक केली आहे. आम्ही दुष्ट आणि बंडखोर आहोत; तुमच्या आज्ञांपासून आणि नियमांपासून आम्ही बहकलो आहोत.
जर कोणाला याची जाणीव होते की ते यापैकी कोणत्याही बाबतीत दोषी आहेत, तर त्याने जे पातक केले ते पातक कबूल करावे,
Confissão como fé
Se com a boca confessares que Jesus é Senhor e creres, serás salvo. A confissão de fé é alicerce da vida cristã.
"येशू प्रभू आहे," असे तुम्ही मुखाने जाहीर कराल व परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून उठविले असा तुमच्या अंतःकरणात विश्वास धराल, तर तुमचे तारण होईल.
कारण तुमच्या अंतःकरणात विश्वास ठेवल्यानेच तुम्ही नीतिमान ठरता; आणि आपल्या मुखाने इतरांना आपल्या विश्वासाबद्दल सांगितले की तारण होते.
कारण सर्वांनी पाप केले आहे, आणि परमेश्वराच्या गौरवाला अंतरले आहेत, आता परमेश्वराच्या कृपेने, ख्रिस्त येशूंच्याद्वारे खंडणी भरून आपल्याला मुक्त केले आणि विनामूल्य नीतिमान म्हणून जाहीर केले आहे.
विश्वासाचे सुयुद्ध लढ. परमेश्वराने तुला केलेले पाचारण आणि सार्वकालिक जीवन धरून ठेव, ज्याचा अनेक साक्षीदारांसमक्ष तू अंगीकार केला आहे.
यास्तव पश्चात्ताप करा आणि परमेश्वराकडे वळा, म्हणजे तुमची पापे पुसून टाकली जावी व दिवसेंदिवस प्रभूकडून तुम्हाला नवीन शक्ती प्राप्त व्हावी,
यास्तव एकमेकांजवळ आपली पापे कबूल करा व एकमेकांसाठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही निरोगी व्हाल. नीतिमान माणसाची प्रार्थना प्रबळ व परिणामकारक असते.
तुम्ही परमेश्वराजवळ या म्हणजे ते तुम्हाजवळ येतील. अहो पाप्यांनो, आपले हात धुवा आणि दुहेरी मनाचे जे आहेत त्यांनी आपली अंतःकरणे शुद्ध करावीत.