Consolo
O consolo de Deus é bálsamo para a alma ferida. Ele nos conforta em todas as tribulações para que possamos consolar outros com o mesmo consolo divino.
Deus consola
Ainda que eu ande pelo vale da sombra da morte, não temerei mal algum. O Senhor consola, guia e está sempre presente.
मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी,
मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही,
कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात.
परमेश्वर माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे.
मी कोणाचे भय बाळगू?
परमेश्वरच माझ्या जीवाचा आश्रय आहे,
मी कोणाची भीती बाळगू?
माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की,
तुझे वचन मला नवजीवन देते;
तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार,
आपल्या कराराच्या विश्वसनीयतेने सांत्वन कर.
जे परमेश्वराची वाट पाहतात व जो जीव त्यास शोधतो, त्याला परमेश्वर चांगला आहे.
Confiança na aflição
Eu sei que o meu Redentor vive. Deus é força e escudo — mesmo na tribulação, Ele nos sustenta e consola.
माझा तारण करणारा जिवंत आहे याची मला खात्री आहे.
आणि शेवटी तो या पृथ्वीतलावर येऊन उभा राहील.
मी जेव्हा माझे शरीर सोडून जाईन तेव्हा आणि माझी कातडी नष्ट होईल
तेव्हा सुध्दा मी देवाला पाहू शकेन.
पाहा, देव माझे तारण आहे; मी त्याजवर भाव ठेवीतो व भिणार नाही,
कारण परमेश्वर, होय परमेश्वर माझे बल व गीत आहे. तो माझे तारण झाला आहे."
परमेश्वर तुमच्या सोबतीला तुमच्यापुढेच चालणार आहे. तो तुम्हास सोडून जाणार नाही, तुम्हास अंतर देणार नाही. तेव्हा भिऊ नको आणि निर्भय राहा."
मी तुला आज्ञा केली नाही का? बलवान हो, धीट हो, घाबरू नकोस, धैर्यहीन होऊ नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल."
म्हणून आपण धैर्याने म्हणू शकतो,
"देव माझा सहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही.
मनुष्य माझे काय करणार?"
‘जे शोक करतात’, ते धन्य आहेत,
कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’
परंतू मी तर परमेश्वराकडे दृष्टी लावीन,
मी आपल्या तारणाऱ्या देवाची वाट पाहीन,
माझा परमेश्वर माझे ऐकेल.
मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही; मी तुम्हाकडे येईन.