Consolo
O consolo de Deus é bálsamo para a alma ferida. Ele nos conforta em todas as tribulações para que possamos consolar outros com o mesmo consolo divino.
Deus consola
Ainda que eu ande pelo vale da sombra da morte, não temerei mal algum. O Senhor consola, guia e está sempre presente.
मृत्युछायेच्या दरीतूनही
मी जात असलो,
तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही,
कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात;
तुमची आकडी व तुमची काठी
मला धीर देतात.
याहवेह माझे प्रकाश व माझे तारण आहेत—
मी कोणाचे भय बाळगू?
याहवेह माझ्या जीवनाचे दुर्ग आहेत—
मला कोणाचे भय आहे?
माझ्या संकटात माझे सांत्वन हे आहे:
तुमचे अभिवचन माझ्या जीवनाचे जतन करते.
तुमच्या अभिवचनानुसार
तुमची अक्षय प्रीती माझे सांत्वन करो;
जे याहवेहवर त्यांची आशा ठेवतात,
आणि जे त्यांचा शोध घेतात, त्या सर्वांसाठी ते भले आहेत.
Confiança na aflição
Eu sei que o meu Redentor vive. Deus é força e escudo — mesmo na tribulação, Ele nos sustenta e consola.
मला ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे,
आणि अखेरीस ते पृथ्वीवर उभे राहील;
आणि हे शरीर कुजून गेल्यानंतरही,
आपल्या देहाशिवाय मी परमेश्वराला पाहीन;
निश्चितच परमेश्वर माझे तारण आहेत;
मी भरवसा ठेवेन आणि घाबरणार नाही.
याहवेह, याहवेह स्वतः माझे सामर्थ्य आणि माझे संरक्षण आहेत;
ते माझे तारण झाले आहेत."
याहवेह स्वतः तुझ्यापुढे चालतील आणि तुझ्याबरोबर राहतील; ते तुला कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाहीत. भिऊ नकोस; निरुत्साही होऊ नकोस."
मी तुला आज्ञापिले नाही का? खंबीर हो आणि धैर्यवान हो. भिऊ नको; निराश होऊ नको, कारण तू जिथे जाशील तिथे याहवेह तुझे परमेश्वर तुझ्याबरोबर असतील."
म्हणूनच आत्मविश्वासाने आपल्याला म्हणता येते:
"प्रभू माझे सहायक आहेत; मला कशाचेही भय वाटणार नाही.
नश्वर मानव मला काय करणार?"
धन्य आहेत ते, जे शोकग्रस्त आहेत,
कारण त्यांना सांत्वन मिळेल.
मी तर, याहवेहची आशेने वाट पाहतो,
मी माझ्या तारणाऱ्या परमेश्वराची प्रतीक्षा करतो;
माझे परमेश्वर माझे ऐकतील.
मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही; मी तुमच्याकडे येईन.