Crianças
As crianças ocupam lugar especial no coração de Deus. A Bíblia instrui a educá-las, protegê-las e ensiná-las nos caminhos do Senhor desde cedo — formando gerações que temem a Deus.
Herança do Senhor
Os filhos são herança do Senhor. Eles são presentes de Deus — cada criança é um milagre e uma responsabilidade sagrada.
पाहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे,
आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे.
आमची मुले आपल्या तारुण्याच्या भरांत उंच वाढलेल्या रोपांसारखी आहेत.
आमच्या मुली राजवाड्याच्या कोपऱ्यातील कोरलेल्या खांबाप्रमाणे आहेत.
तू माझे अंतर्याम निर्माण केलेस;
तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले.
मी तुला धन्यवाद देतो,
कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत,
हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो.
तरुण मनुष्य आपला मार्ग कशाने शुध्द राखील?
तुझ्या वचनाचे पालन करण्याने.
तरुण मनुष्य आपला मार्ग कशाने शुध्द राखील?
तुझ्या वचनाचे पालन करण्याने.
मुलांनो माझे ऐका
आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन.
Instruir as crianças
Instrui a criança no caminho em que deve andar. A educação cristã é mandamento repetido através de toda a Escritura.
मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे,
आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही.
मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे,
आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही.
मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे,
आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही.
बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते,
पण शिक्षेची काठी ती त्याच्यापासून दूर करील.
बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते,
पण शिक्षेची काठी ती त्याच्यापासून दूर करील.
जर कोणी आपल्या मुलांना शिक्षा करत नाही तो त्यांचा द्वेष करतो,
पण जो कोणी आपल्या मुलांवर प्रेम करतो तो काळजीपूर्वक त्यांना शिस्त लावतो.
सुज्ञ मुलगा आपल्या पित्याचे शिक्षण ऐकतो,
परंतु निंदक निषेध ऐकत नाही.
माझ्या मुला, माझ्या आज्ञा विसरु नकोस,
आणि माझी शिकवण तुझ्या हृदयात ठेव;
कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी
आणि शांती ही तुला अधिक लाभतील.
माझ्या मुला, माझ्या आज्ञा विसरु नकोस,
आणि माझी शिकवण तुझ्या हृदयात ठेव;
जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला शिक्षा करतो,
तसा परमेश्वर ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांनाच तो शिस्त लावतो.
त्यांनी मला शिकवले आणि मला म्हणाले,
"तुझे मन माझी वचने घट्ट धरून ठेवो;
माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत राहा.
ज्ञान आणि सुज्ञता संपादन कर;
माझे शब्द विसरु नकोस आणि माझ्या मुखातले शब्द नाकारू नकोस;
Disciplinar com amor
A vara e a repreensão dão sabedoria. A disciplina produz o fruto pacífico da justiça nos que são exercitados por ela.
छडी आणि सुबोध ज्ञान देतात,
पण मोकळे सोडलेले मूल आपल्या आईला लाज आणते.
मुलाला शिक्षा करण्यास अवमान करू नको;
कारण जर तू त्यास छडीने मारले तर तो मरणार नाही.
तू आपल्या जन्मदात्या पित्याचे ऐक,
तुझी आई म्हातारी झाली म्हणून तिचा तिरस्कार करू नको.
सत्य विकत घे, पण ते विकू नको;
शहाणपण, शिक्षण आणि समजूतदारपणा ही विकत घे.
जो कोणी आपल्या पित्याला लुटतो, व आईला हाकलून लावतो,
तो मुलगा लाज आणि दोष आणणारा आहे.
ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा
जो कोणी गरीब मनुष्य आपल्या सात्विकपणाने चालतो तो उत्तम आहे.
जो कोणी मनुष्य चांगले करतो त्याच्या प्रामाणिकतेने चालतो,
आणि त्याच्या मागे त्याची मुले त्यास अनुसरतात आणि ते सुखी होतात.
तरुणसुध्दा आपल्या कृतीने
आपली वर्तणूक शुद्ध आणि सरळ आहे की नाही ते दाखवतो.
मूर्ख मुलगा पित्याला दु:ख आहे,
आणि जिने त्यास जन्म दिला त्या स्त्रीला क्लेश असा आहे.
नातवंडे वृद्धांचा मुकुट आहेत,
आणि आईवडील आपल्या मुलांस वैभव आणतात.
नातवंडे वृद्धांचा मुकुट आहेत,
आणि आईवडील आपल्या मुलांस वैभव आणतात.
मूर्ख आपल्या वडिलांचे शिक्षण तुच्छ लेखतो,
पण जो विवेकी आहे तो चुकीतून सुधारतो.
शहाणा मुलगा आपल्या वडिलांना आनंदीत करतो.
पण मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो.
जो कोणी मुलगा नियमाचे पालन करतो तो हुशार असतो,
पण जो खादाडाचा सोबती आहे तो आपल्या वडिलांना लाज आणतो.
माझ्या मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण ऐक,
आणि तू तुझ्या आईचा नियम बाजूला टाकू नकोस;
ते तुझ्या शिराला सुशोभित वेष्टन
आणि तुझ्या गळ्यात लटकते पदक आहे.
तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका,
जे माझे मार्ग अनुसरतात ते धन्य आहेत.
माझी शिकवण ऐका आणि शहाणे व्हा;
दुर्लक्ष करू नका.
Obediência e promessa
Filhos, obedecei a vossos pais no Senhor. Honra a teu pai e tua mãe para que viva muito tempo sobre a terra.
मुलांनो, प्रभूमध्ये आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे योग्य आहे. "आपल्या वडिलांचा व आईचा मान राख, यासाठी की तुझे सर्वकाही चांगले व्हावे व तुला पृथ्वीवर दीर्घ आयुष्य लाभावे." अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे.
आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.
आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.
तर मग देवाच्या प्रिय मुलांसारखे अनुकरण करणारे व्हा,
मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे प्रभूला संतोष देणारे आहे.
वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; नाही तर, कदाचित ती निरुत्साही होतील.
मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा.
त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा.
आज मी तुम्हास त्याचे नियम व आज्ञा सांगणार आहे, त्या पाळा. त्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे भले होईल. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या प्रदेशात तुमचे वास्तव्य दीर्घकाळ राहील. तो प्रदेश कायमचा तुमचाच होईल.
मी दिलेल्या या सर्व आज्ञांचे पालन काळजीपूर्वक करा. जे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने चांगले व उचित आहे ते केल्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे निरंतर कल्याण होईल.
मोशे लोकांस म्हणाला, "मी ज्या गोष्टी आज सांगतो त्या लक्षपूर्वक ऐका. आपल्या मुलाबाळांनाही या नियमशास्त्राचे काटेकोरपणे पालन करायला सांगा. त्यांचे महत्व कमी लेखू नका. या आज्ञांवरच तुमचे जीवन अवलंबून आहे. त्यायोगेच तुम्ही आपल्याला मिळणार असलेल्या त्या यार्देन नदीपलीकडच्या प्रदेशात दीर्घकाळ वास्तव्य कराल."
Crianças e o reino
Deixai vir a mim as crianças. Jesus honrou as crianças como modelo de fé e humildade para todo o seu povo.
परंतु येशू म्हणाला, "लहान मुलांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे."
परंतु येशू म्हणाला, "लहान मुलांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे."
त्यावेळेस शिष्य येशूकडे आले आणि त्यांनी विचारले, "स्वर्गाच्या राज्यात सर्वात महान कोण?" तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्याजवळ बोलावून त्यांच्यामध्ये उभे केले, आणि म्हटले, "मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. म्हणून जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वाहून महान आहे.
आणि म्हटले, "मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. म्हणून जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वाहून महान आहे. आणि जो कोणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो, तो मला स्वीकारतो.
सावध असा. ही लहान मुले यांना कमी समजू नका कारण मी तुम्हास सांगतो की, स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नेहमी पाहतात.
मग येशू म्हणाला, "हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू मी तुझे उपकार मानतो कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुद्धीमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकासारखे अशिक्षित आहेत त्यांना तू प्रकट केल्या.
जे शांती करणारे ते धन्य आहेत, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.
मग त्याने बालकांस हात ठेवावा? करावा आणि आशीर्वाद द्यावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. येशूने हे पाहिले तेव्हा तो रागवला आणि त्यांना म्हणाला, "लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या. त्यांना मना करू नका कारण देवाचे राज्य यांच्यासारख्यांचेच आहे.
मग येशूने एक बालकास घेऊन त्यांच्यामध्ये उभे केले व त्यांना म्हणाला? "जो कोणी या लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी मला स्वीकारतो तो केवळ माझाच स्वीकार करतो असे नाही तर ज्याने मला पाठवले त्याचाही स्वीकार करतो."
येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या आणि मनुष्यांच्या कृपेत वाढत गेला.
मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, "योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?" तो त्यास म्हणाला, "होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो." तो त्यास म्हणतो, "माझी कोकरे चार."
Identidade e crescimento
Somos filhos de Deus pelo Espírito de adoção. Crescer em Cristo é amadurecer em fé, obediência e amor ao próximo.
पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.
कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवतो ते देवाचे पुत्र आहेत.
कारण तुम्हास पुन्हा भय धरण्यास दासपणाचा आत्मा मिळाला नाही; पण आपण ज्यायोगे ‘अब्बा-पित्या’ अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे.
तो पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची लेकरे आहोत.
कारण, सृष्टीची उत्कट अपेक्षा देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा करीत आहे.
पण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्याद्वारे देवाचे पुत्र आहात. कारण ख्रिस्तात तुम्हामधील जितक्यांचा बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे.
आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात देव पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहोत ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही कारण त्यांनी त्यास ओळखले नाही.
प्रियांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत आणि भविष्यकाळात आम्ही कसे असू हे आम्हास माहीत नाही. तरीही आम्हास माहीत आहे की, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू, कारण तो जसा आहे तसे आम्ही त्यास पाहू. आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, जसा ख्रिस्त शुद्ध आहे, तसा तो आपणाला शुद्ध करतो.
प्रिय मुलांनो, मी तुम्हास लिहीत आहे कारण ख्रिस्ताच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हास क्षमा झालेली आहे.
माझ्या मुलांनो, स्वतःला मूर्तीपूजेपासून दूर राखा.
आपल्या स्वतःच्या घरावर चांगल्या प्रकारचा अधिकार चालवणारा, पूर्ण गंभीरपणे आपल्या मुलांना स्वाधीन राखणारा असा तो असावा.
पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे व तो अविश्वासू मनुष्यापेक्षा वाईट आहे.
आणि तुम्हास पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय?
माझ्या मुला, प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको,
आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको.
कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्यास तो शिक्षा करतो
आणि ज्यांना तो आपले पुत्र म्हणून स्वीकारतो, त्या प्रत्येकांना तो शिक्षा करतो.
हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन करा. ते असे दर्शवते की, देव तुम्हास मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत? परंतु ज्या शिक्षेचे सर्व भागीदार झाले आहेत अशा शिक्षेवाचून जर तुम्ही आहा, तर तसे तुम्ही दासीपुत्र आहात आणि तुम्ही खरे पुत्र नाही. याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हास शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला. तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात अधीन होऊन जगले पाहिजे बरे?
कोणतीही शिक्षा तर सध्या आनंदाची वाटत नाही, तर दुःखाची वाटते तरी तिचा अनुभव ज्यांना मिळाला आहे, त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतीकारक फळ देते.
ते म्हणाले, "प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल."
पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्यामागे लाग.
माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांस सोपवून दे.
Transmitir a fé
Contaremos à geração vindoura os louvores do Senhor. O legado de fé é o maior presente que damos aos nossos filhos.
आणि तुझ्या सर्व मुलांना परमेश्वर शिकवील; आणि तुमच्या मुलांची शांती महान असेल.
आणि तुझ्या सर्व मुलांना परमेश्वर शिकवील; आणि तुमच्या मुलांची शांती महान असेल.
जिवंत मनुष्य, जिवंत मनुष्य, तोच एक तुझे आभार मानेल, जसा मी आज करीत आहे;
पित्याने मुलांना तुझ्या सत्याची जाणीव करून द्यावी.
कोणी स्त्री तिने जन्म दिलेल्या, आपल्या दुध पित्या बाळाला दया न दाखवता विसरेल काय?
होय, कदाचित ती विसरेल पण मी तुला विसरणार नाही.
पाहा! तुझे नाव मी माझ्या तळहातावर कोरले आहे. तुझे कोट नित्य माझ्या पुढे आहेत.
सगळी परिस्थिती मी डोळ्यांखालून घातली. आणि मग उभा राहून मी महत्वाची घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांना म्हणालो, "आपल्या शत्रूंची भीती बाळगू नका. आमचा प्रभू, परमेश्वर जो महान आणि सामर्थ्यशाली आहे, त्याचे स्मरण करा. आपले भाऊबंद, मुले, मुली, आपल्या स्त्रिया आणि घरेदारे यांच्यासाठी लढा."
शमुवेल बाळ एलीच्या हाताखाली देवाची सेवा करीत होता. परमेश्वराचे वचन त्या दिवसात दुर्मिळ झाले होते; वारंवार भविष्यसूचक दृष्टांत होत नव्हते.
माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्या कशानेही होत नाही.
माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्या कशानेही होत नाही.
त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही.
त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये,
त्याचे सामर्थ्य आणि त्याने केलेले आश्चर्ये कृत्ये सांगू.
कारण त्याने याकोबात निर्बंध स्थापले
आणि इस्राएलासाठी नियमशास्त्र नेमले.
त्याने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या की,
त्यांनी त्या आपल्या मुलांना शिकवाव्या.
त्याने ही आज्ञा यासाठी दिली की, पुढच्या पिढीने म्हणजे जी मुले जन्माला येतील, त्यांनी त्या आज्ञा जाणाव्या,
त्या आपल्या स्वतःच्या मुलांना सांगाव्या.
मग ते आपली आशा देवावर ठेवतील
आणि त्याची कृत्ये विसरणार नाहीत
परंतु त्याच्या आज्ञा पाळतील.