Crianças
As crianças ocupam lugar especial no coração de Deus. A Bíblia instrui a educá-las, protegê-las e ensiná-las nos caminhos do Senhor desde cedo — formando gerações que temem a Deus.
Herança do Senhor
Os filhos são herança do Senhor. Eles são presentes de Deus — cada criança é um milagre e uma responsabilidade sagrada.
मुले, ही याहवेहकडून मिळालेला वारसा आहे,
प्रसवशील कूस, हे याहवेहकडून लाभणारे प्रतिफळ आहे.
मग आमचे पुत्र, तारुण्यात जोपासलेल्या
परिपक्व रोपांसारखे होतील;
आमच्या कन्या, राजमहालाच्या सजावटीसाठी केलेल्या
कोरीव स्तंभासारख्या होतील.
माझ्या शरीरातील अंतरंगाची घडण तुम्हीच केली आहे;
माझ्या मातेच्या उदरात माझी देहरचना केली.
मी तुमची स्तुती करतो,
कारण तुम्ही मला भयपूर्ण व अद्भुत रीतीने निर्माण केले आहे;
तुमचे हे कार्य किती अद्भुत आहे,
हे मी पूर्णपणे जाणतो.
तरुण मनुष्य शुद्ध मार्गावर कसा चालत राहील?
ते तुमच्या वचनानुसार आचरण करूनच.
तरुण मनुष्य शुद्ध मार्गावर कसा चालत राहील?
ते तुमच्या वचनानुसार आचरण करूनच.
माझ्या लेकरांनो या आणि माझे ऐका;
याहवेहचे भय कसे धरावे, हे मी तुम्हाला शिकवेन.
Instruir as crianças
Instrui a criança no caminho em que deve andar. A educação cristã é mandamento repetido através de toda a Escritura.
लहान मुलांनी जसे वर्तन केले पाहिजे, तसेच त्यांना वागावयास शिकवा,
म्हणजे मोठेपणी ती मुले त्या मार्गापासून दूर जाणार नाहीत.
लहान मुलांनी जसे वर्तन केले पाहिजे, तसेच त्यांना वागावयास शिकवा,
म्हणजे मोठेपणी ती मुले त्या मार्गापासून दूर जाणार नाहीत.
लहान मुलांनी जसे वर्तन केले पाहिजे, तसेच त्यांना वागावयास शिकवा,
म्हणजे मोठेपणी ती मुले त्या मार्गापासून दूर जाणार नाहीत.
बालकाचे मन मूर्खपणाने भरलेले असते,
परंतु अनुशासनाच्या छडीने त्याचा मूर्खपणा दूर करता येईल.
बालकाचे मन मूर्खपणाने भरलेले असते,
परंतु अनुशासनाच्या छडीने त्याचा मूर्खपणा दूर करता येईल.
जे कोणी छडी आवरतात, ते त्यांच्या लेकरांचा द्वेष करतात,
परंतु जे त्यांच्या लेकरांवर प्रेम करतात, ते त्यांना काळजीपूर्वक शिस्त लावतात.
सुज्ञ पुत्र आपल्या पित्याच्या शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो,
परंतु उपहास करणारा पुत्र फटकारास प्रतिसाद देत नाही.
माझ्या मुला, माझे शिक्षण विसरू नकोस,
परंतु माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात ठेव;
कारण ते तुझे आयुष्य अनेक वर्षापर्यंत वाढवतील,
आणि तुला शांती आणि समृद्धी देतील.
माझ्या मुला, माझे शिक्षण विसरू नकोस,
परंतु माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात ठेव;
कारण जसा पिता मुलामध्ये आनंद मानतो, तसाच त्याला शिस्तही लावतो,
याहवेह ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात!
तेव्हा त्यांनी मला शिकविले आणि ते मला म्हणाले,
"तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून माझ्या वचनांकडे लक्ष लाव;
माझ्या आज्ञांचे पालन कर आणि तुला आयुष्य लाभेल.
सुज्ञान मिळव, समंजसपणा प्राप्त कर;
माझी वचने विसरू नकोस किंवा त्यांच्यापासून दूर जाऊ नकोस.
Disciplinar com amor
A vara e a repreensão dão sabedoria. A disciplina produz o fruto pacífico da justiça nos que são exercitados por ela.
छडी व ताकीद यामुळे ज्ञान मिळते;
परंतु बालकाला बेशिस्त सोडल्यास, ते आपल्या आईला कलंकित करते.
मुलाला अनुशासन करण्यास संकोच करू नकोस;
जर तू छडीने त्यांना शिक्षा करशील तर ते मरणार नाहीत.
आपल्या वडिलांचे ऐक ज्याने तुला जीवन दिले,
आणि तुझी आई वृद्ध झाल्यावर तिचा तिरस्कार करू नको.
सत्याला मोलाने विकत घे आणि ते विकू नको—
सुज्ञान, शिक्षण आणि समंजसपणासुद्धा मिळव.
जे कोणी त्यांच्या वडिलांना लुटतात आणि त्यांच्या आईला हाकलून देतात,
ती अशी संतान आहे जी लज्जा व अप्रतिष्ठा यांना कारणीभूत होते.
विकृत ओठांच्या मूर्ख मनुष्यापेक्षा,
निर्दोषपणाने वागणारा गरीब मनुष्य अधिक चांगला आहे.
नीतिमान मनुष्य निष्कलंकीतपणे चालतो;
त्याच्यामागे त्याच्या मुलाबाळांना आशीर्वाद प्राप्त होतात.
अगदी लहान मुलेसुद्धा खरोखरच प्रामाणिक आणि निर्दोष आहेत
ते त्यांच्या कृत्यांवरून ओळखली जात नाहीत काय?
मूर्ख मुलगा आपल्या वडिलांच्या दुःखास कारणीभूत होतो,
आणि ज्या आईने त्याला जन्म दिला तिला क्लेश देतो.
वयस्क माणसांची नातवंडे त्यांचे गौरवी भूषण आहेत;
आणि मुलांचे भूषण त्यांचे मातापिता आहेत.
वयस्क माणसांची नातवंडे त्यांचे गौरवी भूषण आहेत;
आणि मुलांचे भूषण त्यांचे मातापिता आहेत.
मूर्ख पुत्र आपल्या आईवडिलांचा सल्ला तुच्छ मानतो,
पण जो सुधारणा अंमलात आणतो, तो सुज्ञपणा दाखवितो.
समंजस पुत्र आपल्या वडिलांना आनंद देतो,
परंतु मूर्ख मनुष्य आईला तुच्छ लेखतो.
सुज्ञ पुत्र शिक्षणाकडे लक्ष लावतो,
परंतु खादाडांची संगत करणारा पुत्र त्याच्या वडिलांचा अब्रू घालवितो.
माझ्या मुला, तुझ्या वडिलांचे शिक्षण ऐकून घे
आणि तुझ्या आईची शिकवण विसरू नकोस.
ती तुझ्या मस्तकाला अलंकृत करणारी माळ आहे
आणि तुझ्या गळ्यातील सुशोभित हार आहे.
"आणि म्हणून मुलांनो, माझे ऐका,
कारण जे माझी शिकवण आचरतात, ते खूप आशीर्वादित होतात.
माझे शिक्षण कान देऊन ऐका आणि शहाणे व्हा;
त्याचा अव्हेर करू नका.
Obediência e promessa
Filhos, obedecei a vossos pais no Senhor. Honra a teu pai e tua mãe para que viva muito tempo sobre a terra.
लेकरांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण हे योग्य आहे. "तुमच्या आई आणि वडिलांचा मान राखा" अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे. "यासाठी की तुमचे कल्याण व्हावे आणि तुम्हाला पृथ्वीवर दीर्घायुष्याचा लाभ घेता यावा."
पित्यांनो, तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका; याउलट प्रभूच्या शिक्षणात व बोधवचनात त्यांना वाढवा.
पित्यांनो, तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका; याउलट प्रभूच्या शिक्षणात व बोधवचनात त्यांना वाढवा.
परमेश्वराची प्रिय लेकरे या नात्याने तुम्ही परमेश्वराचा कित्ता गिरवावा.
लेकरांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण त्यामुळे प्रभूला संतोष होतो.
वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका, नाही तर त्यांचे धैर्य खचेल.
या ज्या आज्ञा मी आज तुम्हाला देणार आहे, त्या तुमच्या अंतःकरणात सदैव असाव्या. त्या तुमच्या मुलांवर बिंबवा. घरी बसले असताना, वाटेवर चालत असताना, झोपण्याच्या वेळी व झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल बोलत राहा.
त्या तुमच्या मुलांवर बिंबवा. घरी बसले असताना, वाटेवर चालत असताना, झोपण्याच्या वेळी व झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल बोलत राहा.
आज जे विधी व आज्ञा मी तुम्हाला सांगणार आहे, यांचे तुम्ही पालन केले, तर तुमचे व तुमच्या वंशजांचे कल्याण होईल आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या या देशामध्ये तुम्ही चिरकाल वस्ती कराल.
या सर्व आज्ञा पाळण्याची तुम्ही खबरदारी घ्यावी. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे उत्तम आणि योग्य ते तुम्ही केले, तर तुमचे आणि तुमच्या मुलाबाळांचे निरंतर कल्याण होईल.
तेव्हा तो त्यांना म्हणाला: "आज मी ज्या नियमशास्त्रामधील आज्ञा तुमच्यापुढे जाहीर केल्या आहेत, त्याला हृदयात साठवून ठेवा आणि तुमच्या मुलाबाळांना काळजीपूर्वक रीतीने त्यांचे पालन करण्यास शिकवा. कारण हे केवळ पोकळ शब्द नाहीत—तर ते तुमचे जीवन आहे. त्याद्वारे यार्देनेच्या पलीकडे असलेला जो देश तुम्ही ताब्यात घेणार आहात, त्या देशात तुम्ही दीर्घकाल जगाल."
Crianças e o reino
Deixai vir a mim as crianças. Jesus honrou as crianças como modelo de fé e humildade para todo o seu povo.
येशू शिष्यांना म्हणाले, "लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका; कारण स्वर्गाचे राज्य अशांचेच आहे."
येशू शिष्यांना म्हणाले, "लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका; कारण स्वर्गाचे राज्य अशांचेच आहे."
त्याच सुमारास शिष्य येशूंकडे आले आणि त्यांना विचारले, "स्वर्गाच्या राज्यात सर्वात श्रेष्ठ कोण आहे?"
तेव्हा येशूंनी एका लहान लेकराला जवळ बोलाविले आणि त्या लेकराला त्यांच्यामध्ये उभे केले. मग येशू त्यांना म्हणाले, "मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, जोपर्यंत तुमच्यात बदल होऊन तुम्ही लहान बालकासारखे होत नाही तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यात कधीही तुमचा प्रवेश होणार नाही. म्हणून जो कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वश्रेष्ठ होईल.
मग येशू त्यांना म्हणाले, "मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, जोपर्यंत तुमच्यात बदल होऊन तुम्ही लहान बालकासारखे होत नाही तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यात कधीही तुमचा प्रवेश होणार नाही. म्हणून जो कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वश्रेष्ठ होईल. आणि कोणीही माझ्या नावाने अशा लहान बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो.
"या लहान बालकांपैकी एकालाही तुच्छ लेखू नका, कारण मी तुम्हाला सांगतो की स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या पित्याचे मुख निरंतर पाहत असतात.
त्यावेळी येशूंनी ही प्रार्थना केली, "हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, स्वतःस ज्ञानी आणि सुज्ञ समजणार्या लोकांपासून या गोष्टी गुप्त ठेऊन, त्या तुम्ही लहान बालकांना प्रगट केल्यास म्हणून मी तुमचे आभार मानतो.
धन्य आहेत ते, जे शांती प्रस्थापित करतात,
कारण ते परमेश्वराची मुले म्हटले जातील.
लोक आपल्या लहान बालकांना, येशूंनी त्यांच्यावर हात ठेवावे म्हणून त्यांच्याकडे आणत होते, परंतु शिष्यांनी त्यांना दटाविले. जेव्हा येशूंनी पाहिले, तेव्हा ते रागावले व म्हणाले, "लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका, कारण परमेश्वराचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.
मग त्यांनी एका लहान लेकराला त्यांच्यामध्ये ठेवले. मग त्या लेकराला कवेत उचलून घेत त्यांना म्हणाले, "जो कोणी माझ्या नावाने अशा लहान बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो माझा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याचा स्वीकार करतो."
आणि येशू ज्ञानाने व शरीराने परमेश्वराच्या व मनुष्याच्या कृपेत वाढले.
जेवल्यानंतर येशू शिमोन पेत्राला म्हणाले, "योहानाच्या पुत्रा शिमोना, या सर्वांपेक्षा तू मजवर अधिक प्रीती करतोस काय?"
तेव्हा पेत्राने उत्तर दिले, "होय, प्रभू, आपणाला माहीत आहे, की माझे तुमच्यावर प्रेम आहे."
येशूंनी त्याला म्हटले, "तर माझ्या कोकरांना चार."
Identidade e crescimento
Somos filhos de Deus pelo Espírito de adoção. Crescer em Cristo é amadurecer em fé, obediência e amor ao próximo.
परंतु ज्या सर्वांनी त्यांना स्वीकारले, त्यांच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना परमेश्वराची मुले होण्याचा अधिकार दिला—
कारण ज्यांना परमेश्वराचा आत्मा चालवितो, ती परमेश्वराची लेकरे आहेत,
पुन्हा भीती बाळगावी असा दास्यतेचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाही; याउलट असा आत्मा मिळाला आहे की ज्यामुळे तुम्ही दत्तकपुत्र झाला आहात आणि, "अब्बा, बापा" अशी हाक मारू शकता.
कारण पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण परमेश्वराची मुले आहोत.
कारण परमेश्वर आपल्या लेकरांना प्रकट करेल, त्या दिवसाची अखिल सृष्टी वाट पाहत आहे.
कारण आता आपण ख्रिस्त येशूंवरील विश्वासाच्याद्वारे परमेश्वराची लेकरे आहोत. ज्या आपण सर्वांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, त्या आपण ख्रिस्ताला परिधान केले आहे.
पित्याने आपण परमेश्वराची लेकरे म्हणून संबोधले जावे म्हणून पित्याने आपणावर किती मोठा अगाध प्रीतीचा वर्षाव केला आहे! आणि आपण तसे आहोतच! जग आपल्याला ओळखत नाही कारण जगाने त्यांना ओळखले नाही.
प्रिय मित्रांनो, आपण आता परमेश्वराची लेकरे आहोत आणि आपण पुढे काय होऊ हे अजून आपल्याला ठाऊक झालेले नाही. परंतु जेव्हा ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा जसे ख्रिस्त आहेत तसे आपण होणार, कारण जसे ते आहेत तसेच आपण त्यांना पाहू. ज्यांना त्यांच्यामध्ये अशी आशा आहे ते स्वतःला शुद्ध करतात, जसे ते शुद्ध आहेत.
माझ्या प्रिय मुलांनो, मी तुम्हाला लिहित आहे,
कारण येशूंच्या नावामुळे तुमच्या पातकांची क्षमा झाली आहे.
प्रिय लेकरांनो, तुम्ही स्वतःस मूर्तीपासून दूर ठेवा.
तो आपल्या घरावर उत्तम अधिकार चालविणारा, त्याने आपल्या लेकरांना आज्ञाधारक ठेवावे आणि हे सर्व आदरयुक्तरितीने करावे.
परंतु जर कोणी आपल्या स्वकीयांचे आणि विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे आणि तो अविश्वासणार्यापेक्षा वाईट आहे.
आणि तुम्हाला उद्देशून पिता आपल्या पुत्रास बोलतो ते परमेश्वराचे उत्तेजनाचे शब्द विसरलात काय? ते म्हणाले,
"माझ्या पुत्रा, प्रभूच्या शिस्तीकडे दुर्लक्ष करू नकोस,
त्याने तुझा निषेध केल्यास खचू नकोस,
कारण प्रभू ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात,
आणि ज्या प्रत्येकाला पुत्र म्हणून ते स्वीकार करतात त्याला फटकेही मारतात."
तुम्ही धीराने शिस्त सहन करत आहात; परमेश्वर तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितात आणि लेकरांना शिस्त लावत नाही असा कोण पिता आहे? जर तुम्हाला शिस्त लावली नाही तर—सर्वांनाच शिस्तीला सामोरे जावे लागते—तुम्ही अनौरस आहात, तुम्ही या कुटुंबातील खरे पुत्र किंवा कन्या नाहीत. आपल्या सर्वांना शिस्त लावणारे मानवी पिता होते आणि त्यासाठी आपण त्यांचा मान राखतो, तर मग आपण आत्म्यांच्या पित्याच्या कितीतरी अधिक स्वाधीन होऊन जगावे!
कोणतीही शिस्त तत्काली आनंदाची वाटत नाही, परंतु दुःखाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून प्रशिक्षण मिळाले आहे, त्यांना ती पुढे नीतिमत्वाचे शांतिकारक फळ देते.
त्यांनी सांगितले, "प्रभू येशूंवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल."
तारुण्यातील वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात त्यांच्यासोबत नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्यामागे लाग.
ज्यागोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांच्या समोर माझ्याकडून ऐकल्या, त्या विश्वासू माणसांच्या स्वाधीन कर. जे इतरांनाही शिकविण्यास समर्थ आहेत.
Transmitir a fé
Contaremos à geração vindoura os louvores do Senhor. O legado de fé é o maior presente que damos aos nossos filhos.
तुझ्या सर्व लेकरांना याहवेह शिकवतील,
व त्यांना मोठी शांती प्राप्त होईल.
तुझ्या सर्व लेकरांना याहवेह शिकवतील,
व त्यांना मोठी शांती प्राप्त होईल.
जिवंत, जे जिवंत आहेत—ते तुमची स्तुती करतात,
जसे मी आज करीत आहे;
पालक त्यांच्या मुलांना
तुमच्या विश्वासूपणाबद्दल सांगतात.
"आईला आपल्या दुधपित्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल का
आपल्या जन्मदात्या मुलावरील तिची माया कधी आटेल का?
ती कदाचित विसरेल,
पण मी तुम्हाला विसरणार नाही.
पाहा, तुम्हाला मी माझ्या तळहातावर कोरले आहे
व तुझे तट सदोदित माझ्यासमोर आहेत.
संपूर्ण परिस्थितीकडे नजर टाकल्यावर, मी उभा राहिलो व सर्व प्रतिष्ठितांना, अधिकाऱ्यांना व बाकी लोकांना एकत्र बोलाविले आणि त्यांना म्हणालो, "त्यांना भिऊ नका! महान व भयावह परमेश्वराची आठवण ठेवा. आपल्या कुटुंबांसाठी, तुमच्या पुत्रांसाठी, तुमच्या कन्यांसाठी, तुमच्या पत्नीसाठी आणि घरांसाठी लढा!"
शमुवेल बाळ एलीच्या हाताखाली याहवेहची सेवा करीत होता. त्या दिवसात याहवेहचे वचन दुर्मिळ होते; दृष्टान्तही फारसे मिळत नसत.
माझी मुले सत्याने चालतात, हे ऐकल्याने मला जेवढा आनंद होतो, तेवढा आनंद दुसर्या कशानेही होत नाही.
माझी मुले सत्याने चालतात, हे ऐकल्याने मला जेवढा आनंद होतो, तेवढा आनंद दुसर्या कशानेही होत नाही.
आम्ही त्या त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही,
आम्ही भावी पिढीच्या लोकांपुढे,
याहवेहचे गौरव करू आणि
त्यांच्या सामर्थ्याचे आणि चमत्कारांचे वर्णन करू.
कारण त्यांनी आपले नियम याकोबाला दिले,
आणि इस्राएलात कायदे प्रस्थापित केले,
जे त्यांनी आपल्या मुलाबाळांना
शिकवावे अशी पूर्वजांना आज्ञा दिली.
जेणेकरून येणार्या पिढ्या,
म्हणजे जन्माला येणारी मुले त्यांना ओळखतील;
आणि त्यांनी आपल्या भावी पिढीस त्यांच्याबद्दल कथन करण्यास तयार राहावे.
मग ते परमेश्वरावर आपला भरवसा ठेवतील
आणि त्यांची कृत्ये विसरणार नाहीत
तर त्यांच्या आज्ञा पाळतील.