Dar
Dar é princípio do Reino de Deus. Jesus deu tudo — até a própria vida. A Bíblia nos ensina que é mais bem-aventurado dar do que receber, e que Deus ama ao que dá com alegria.
Dar com alegria
Deus ama ao que dá com alegria. Dai e dar-se-vos-á. O generoso prospera e quem abençoa será abençoado.
आपण किती द्यावे हे ज्याने त्याने स्वतः मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, हे भाग पाडते म्हणून किंवा बळजबरीने नव्हे, कारण संतोषाने देणारा परमेश्वराला आवडतो.
परमेश्वर तुम्हाला विपुल आशीर्वाद देण्यास समर्थ आहे. ते तुम्हाला सर्ववेळी व सर्व गोष्टीत एवढे देतील की जे काही तुम्हाला गरजेचे आहे ते मिळेल व चांगल्या कामासाठी भरपूर शिल्लक राहील.
कारण तो पेरणार्यांसाठी बी पुरवितो आणि खाण्यासाठी भाकर पुरवितो तोच तुम्हालाही पेरण्यासाठी बियांचा भांडार वाढवेल व पुरवठा करेल आणि तुमच्या नीतिमत्वाच्या हंगामाची वाढ करेल.
होय, तुम्ही सर्व दृष्टीने संपन्न व्हावे यासाठी की प्रत्येक प्रसंगी तुम्ही उदारपणे द्यावे व आमच्याद्वारे तुमच्या उदारतेबद्दल परमेश्वराचे आभारप्रदर्शन व्हावे.
जर देण्याची तुमची खरोखर इच्छा असेल, तर जे तुमच्याकडे आहे, त्या आधारावर तुमचे दान स्वीकारले जाईल, जे तुमच्याजवळ नाही त्याप्रमाणे नाही.
द्या आणि तुम्हाला दिले जाईल. मोठ्या प्रमाणात दाबून, हालवून, ओसांडून वाहू लागेल अशा मापाने परत मिळेल. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल."
Princípios de generosidade
Honra ao Senhor com as tuas primícias. Não negues o bem a quem o merece. A alma generosa prosperará.
तुझ्या संपत्तीने व तुझ्या सर्व पिकातील प्रथमफळांनी
याहवेहचा सन्मान कर;
ज्यांचे भले करण्याचे तुझ्या आटोक्यात असले,
तर ते करण्यास नाकारू नकोस.
उदार मनुष्याची समृद्ध होईल;
आणि जो दुसर्याला प्रोत्साहित करतो, तो स्वतः प्रोत्साहित होईल.
उपहार तो देणार्याचा मार्ग मोकळा करते,
तो तुम्हाला थोर लोकांच्या पुढे घेऊन जाईल!
अधिक मिळावे यासाठी तो दिवसभर तीव्र इच्छा करतो,
परंतु नीतिमान राखून न ठेवता दान देतात.
गोरगरीब आणि गरजवंत यांचा कैवार घे;
त्यांच्यासाठी बोल आणि त्यांना निष्पक्ष न्याय मिळवून दे.
तुमचा सर्व दशांश मंदिराच्या भांडारात आणा म्हणजे माझ्या भवनात पुरेसे अन्न राहील. याबाबत तुम्ही माझी परीक्षा घ्या," सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. "आणि बघा तुमच्यासाठी मी स्वर्गाची धरणद्वारे उघडेन आणि तुमच्यावर आशीर्वादाचा एवढा वर्षाव करेन की ते साठविण्यास तुमच्याजवळ पुरेशी जागाही असणार नाही.
O ensino de Jesus
Quando deres esmola, não toque a trombeta. A generosidade do coração importa mais que a grandeza do donativo.
"म्हणून तुम्ही एखाद्या गरजवंताला दान देता, तेव्हा तुतार्या वाजवून जाहीर करू नका, जसे ढोंगी रस्त्यांवर किंवा सभागृहांमध्ये लोकांकडून मान करून घेण्यासाठी करतात. मी तुम्हाला खरोखर सांगतो की, त्यांना त्यांचे पूर्ण प्रतिफळ मिळाले आहे.
तुम्ही गरजवंतास देता तेव्हा तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका. म्हणजे तुमचे दान करणे गुप्त राहील, मग तुमच्या गुप्त गोष्टी पाहणारा पिता तुम्हाला प्रतिफळ देईल.
आजार्यांना बरे करा, मृतांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूतग्रस्तांतून भुते काढून टाका. तुम्हाला विनामूल्य मिळाले आहे, तुम्हीही विनामूल्य द्या.
येशू म्हणाले, "तू परिपूर्ण होऊ इच्छित असल्यास जा, तुझी मालमत्ता विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर."
जे तुम्हाजवळ मागतात त्यांना द्या आणि जो तुमचे घेतो, त्याची परत मागणी करू नका.
याहवेहमध्ये आनंद कर,
म्हणजे ते तुझ्या हृदयाची मागणी पूर्ण करतील.
दुष्ट लोक उसने घेतात पण फेडीत नाहीत,
परंतु नीतिमान उदारपणे देत असतो;
"परंतु मी कोण, माझी शक्ती आणि माझे लोक कोण, जे तुम्हाला इतक्या उदारतेने दान देऊ शकतील? आमच्याजवळचे सर्वकाही तुमच्याकडूनच मिळालेले आहे आणि तेच आम्ही तुम्हाला देत आहोत.
नहेम्याह म्हणाला, "जा आणि मिष्टान्ने खा व गोड रस प्या व ज्यांनी काहीही बनविले नाही अशांनाही ते पाठवा. आजचा दिवस प्रभूप्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही दुःखी असू नये, कारण याहवेहचा आनंद तुमचे सामर्थ्य आहे."
माझ्याजवळ जी संपत्ती आहे ती सर्व मी गरिबांना दिली आणि माझे शरीर कष्ट सहन करण्यासाठी अर्पण केले, परंतु माझ्याठायी प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही.