Tomar uma decisão
Tomar decisões com sabedoria é um dos maiores desafios da vida. A Bíblia nos ensina a buscar a Deus em oração, na Palavra e no conselho, confiando que Ele dirige os nossos passos.
Buscar a Deus
Se algum de vós tem falta de sabedoria, peça a Deus. Ele dá generosamente e sem repreensão a todos os que pedem.
म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे म्हणजे ते त्यास मिळेल कारण तो दोष न लावता सर्वांस उदारपणे देतो.
आणि आम्हास देवामध्ये धैर्य आहे की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.
जर आपण आपली पापे कबूल करतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.
तू आपल्या सर्व अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव.
आणि तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस;
तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव,
आणि तो तुझ्या वाटा सरळ करील.
तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव,
आणि तो तुझ्या वाटा सरळ करील.
कारण परमेश्वर असे म्हणतो की, तुमच्याविषयी माझ्या मनात ज्या योजना आहेत त्या मी जाणतो; त्या योजना तुमच्या हिताच्या आहेत आणि अनिष्टासाठी नाहीत, त्या तुम्हास भविष्य व आशा देणाऱ्या आहेत.
Conselho e direção
Onde não há conselho os planos se frustam. Toda Escritura é útil para nos guiar nas decisões da vida.
जेथे कोठे शहाण्याचे मार्गदर्शन नसते, राष्ट्र पडते,
पण पुष्कळ सल्लागार असल्याने विजय मिळतो.
पदरात चिठ्ठ्या टाकतात,
पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून आहे.
जो कोणी आपणास वेगळा करतो तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला पाहतो;
आणि तो सर्व स्वस्थ सुज्ञतेविरूद्ध लढतो.
मूर्खाला समंजसपणात आनंद मिळत नाही,
पण केवळ आपल्या मनात काय आहे हे प्रगट करण्यात त्यास आनंद आहे.
जेव्हा वाईट मनुष्य येतो, त्याच्याबरोबर तिरस्कार येतो,
निर्भत्सना आणि लाज त्यासह येतात.
मनुष्याच्या मुखाचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत;
ज्ञानाचा झरा वाहणाऱ्या प्रवाहासारखे आहेत.
जे कोणी चांगले करतात त्यांचा न्याय विपरित करण्यासाठी,
दुष्टाचा पक्ष धरणे चांगले नाही.
मूर्खाचे ओठ त्यास भांडणात पाडतात,
आणि त्याचे मुख मारास आमंत्रण देते.
मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो,
आणि त्याचे ओठ त्यास स्वतःला पाश होतात.
गप्पागोष्टी करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे आहेत,
आणि ते अगदी खोल पोटात शिरतात.
जो कोणी आपल्या कामात निष्काळजी आहे
तो नाश करणाऱ्याचा भाऊ आहे.
परमेश्वराचे नाव बळकट बुरुजाप्रमाणे आहे;
नीतिमान त्यामध्ये धावत जातो आणि सुरक्षित राहतो.
श्रीमंताची संपत्ती त्याचे बळकट नगर आहे;
आणि त्याच्या कल्पनेने तो उंच भींतीसारखा आहे.
मनुष्याच्या नाशापूर्वी त्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते,
पण गौरवापूर्वी विनम्रता येते.
जो कोणी ऐकण्यापूर्वी उत्तर देतो,
त्याचे ते करणे मूर्खपणाचे आणि लज्जास्पद असते.
आजारपणात मनुष्याचा आत्मा जिवंत राहतो,
पण तुटलेला आत्मा कोणाच्याने सोसवेल?
प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.
यासाठी की, देवाचा मनुष्य तरबेज होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.
आणि मुसिया प्रांतापर्यंत आल्यावर बिथुनिया प्रांतास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही.
अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते, ते पुढीलप्रमाणेः बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, मनाएन (जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला होता) आणि शौल. ही सर्व माणसे परमेश्वराची आराधना करीत व उपवास करीत असता, पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, "बर्णबा व शौलाला ह्यांना ज्या कामासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करा." म्हणून मंडळीने उपवास व प्रार्थना केल्या, त्यांनी बर्णबा व शौल यांच्या डोक्यांवर हात ठेवून प्रार्थना केली, मग त्यांना पाठवून दिले.
Confiar e seguir
Seja o que for que façais, fazei tudo para a glória de Deus. O sábio ouve a Deus antes de agir.
म्हणून खाताना, पिताना किंवा काहीही करताना सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा.
म्हणून, आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज अडवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.
शलमोन गिबोन येथे असतानाच परमेश्वराने एका रात्री त्यास स्वप्नात दर्शन दिले तो म्हणाला, माग! "तुला काय हवे ते माग मी ते देईन." तेव्हा शलमोन म्हणाला, "तुझा सेवक म्हणजेच माझे वडिल दावीद यांच्यावर तुझी कृपा होती. ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले. ते विश्वासूपणाने आणि न्यायाने वागले. त्यानंतर आज त्याच्या मुलालाच गादीवर बसवून तू तुझ्या महान कराराबद्दल मोठाच दयाळूपणा दाखवला आहेस. माझे वडिल दावीदानंतर, परमेश्वर देवा, तू मला राजा केले आहेस. पण मी लहान मुलासारखाच आहे. मला बाहेर जायला व आत यायला समजत नाही. तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे, त्यांचा जमाव मोठा आहे ते असंख्य व अगणित आहेत. म्हणून तुझ्या सेवकास लोकांचा न्याय करण्यास शहाणपणाचे मन दे, त्यामुळे मला बऱ्यावाईटामधील फरक समजेल. त्याखेरीज तुझ्या एवढ्या लोकांचा न्याय करणे कोणास शक्य आहे?" शलमोनाने हा वर मागितला याचा परमेश्वरास फार आनंद झाला म्हणून देव त्यास म्हणाला, "तू स्वत:साठी दीर्घायुष्य किंवा सुखसमृध्दी मागितली नाहीस. तसेच शत्रूंचा नि:पात व्हावा असे म्हणाला नाहीस. तू फक्त न्यायबुध्दी आणि विवेक याची मागणी केलीस. तेव्हा तुझे मागणे मी मान्य करतो. तुला ज्ञानी आणि शहाणपणाचे मन देतो, तुला एवढे शहाणपण लाभेल की तुझ्यासारखा भूतकाळात कधी झाला, नाही आणि पुढे कधी होणार नाही.
नंतर त्याची पत्नी त्यास म्हणाली, "तुम्ही अजूनही तुमची सात्विक्ता धरून ठेवली आहे का? तुम्ही देवाचा त्याग करा आणि मरा," परंतू तो तिला म्हणाला, "तू मूर्ख स्त्रीसारखी बोलत आहेस. देवाच्या हातातून आपण चांगलेच घेतले पाहीजे वाईट नाही काय?" तू असाच विचार करतेस ना? या सर्व बाबतीत ईयोबाने त्याच्या बोलण्याद्बारे पाप केले नाही.