O Deus do impossível
Deus é o Deus do impossível. Para Ele não há nada difícil demais. O que parece impossível aos olhos humanos é perfeitamente possível para o Criador do universo.
Nada é impossível
Para Deus nada é impossível. Ele faz infinitamente mais do que podemos pedir ou imaginar — esse é o nosso Deus.
येशूंनी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले, "मानवाला हे अशक्य आहे, परंतु परमेश्वराला सर्वगोष्टी शक्य आहेत."
येशूंनी त्यांच्याकडे निरखून पाहिले आणि म्हटले, "मानवाला हे अशक्य आहे, परंतु परमेश्वराला नाही; परमेश्वराला सर्वगोष्टी शक्य आहेत."
येशूंनी उत्तर दिले, "जे काही मानवाला अशक्य आहे, परंतु त्या सर्वगोष्टी परमेश्वराला शक्य आहेत."
मरीयेने देवदूताला विचारले, "हे कसे होईल? मी तर कुमारिका आहे!"
यावर देवदूताने उत्तर दिले, "पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेल आणि सर्वोच्च परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. त्यामुळे जो पवित्र पुत्र तुला होणार आहे त्यांना परमेश्वराचा पुत्र म्हणतील. तुझी नातलग अलीशिबा हिलासुद्धा तिच्या वृद्धापकाळात बाळ होणार आहे आणि जी गर्भधारणा करू शकत नव्हती, तिला आता सहावा महिना आहे. कारण परमेश्वराला कोणतेही वचन पूर्ण करणे अशक्य नाही."
मरीया म्हणाली, "मी प्रभूची दासी आहे, तुम्ही जे वचन मला दिले आहे त्याची पूर्तता होवो." आणि मग देवदूत तिला सोडून गेला.
तेवढ्यात याहवेहने अब्राहामाला विचारले, " ‘माझ्यासारख्या वृद्धेला खरेच मूल होईल काय?’ असे म्हणत साराह का हसली? याहवेहला कोणतीही गोष्ट असाध्य आहे काय? मी सांगितल्याप्रमाणे पुढील वर्षी निश्चित वेळेत परत येईल आणि साराहला एक पुत्र होईल."
"तुम्हाला सर्वगोष्टी शक्य आहेत हे मला माहीत आहे;
तुमचा कोणताही उद्देश निष्फळ होत नाही.
"हे सार्वभौम याहवेह, तुमच्या महान शक्तीने व विस्तारलेल्या भुजेने तुम्ही स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली आहे. तुम्हाला अवघड असे काहीच नाही.
Fé no impossível
Se tiverdes fé como um grão de mostarda... Os impossíveis de Deus são convites ao exercício da fé audaciosa.
येशूंनी उत्तर दिले, "तुमच्या अल्पविश्वासामुळे," मी तुम्हाला सत्य सांगतो, तुमच्याजवळ मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला आणि या डोंगराला तू इथून पलीकडे सरक, असे तुम्ही म्हणाला, तरी तो दूर सरकेल. तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य होणार नाही.
"जर तुम्हाला शक्य असेल?" येशू म्हणाले, "जो विश्वास ठेवतो त्याला सर्वकाही शक्य आहे."
यास्तव मी तुम्हाला सांगतो की, प्रार्थना करून जे काही मागाल, ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला प्राप्त होईल.
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: "त्यावेळी हे अवशिष्ट लोकांना अद्भुत वाटेल, परंतु मला ते अद्भुत वाटेल का?" सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.
ते अत्यंत महान आहेत आणि त्यांचे सामर्थ्य अमर्याद आहे;
त्यांची बुद्धी अपरिमित आहे.
परमेश्वराच्या पूर्वनियोजित योजनेप्रमाणे व त्यांच्या पूर्वज्ञानानुसार या मनुष्यास तुमच्या हातात सोपवून दिले आणि तुम्ही दुष्ट लोकांच्या मदतीने, त्यांना क्रूसावर खिळे ठोकून जिवे मारले. परंतु परमेश्वराने त्यांची मृत्यूच्या वेदनांपासून सुटका केली व त्यांना मरणातून पुन्हा उठविले, कारण मृत्यूला येशूंवर अधिकार चालविणे अशक्य होते.