Deus é amor
Deus é amor — esta é a declaração mais profunda da Bíblia sobre a natureza divina. Tudo que Deus faz nasce do amor. Quem permanece no amor permanece em Deus.
A natureza de Deus
Deus é amor. Quem permanece no amor, permanece em Deus e Deus nele. Ele nos amou primeiro com amor eterno.
देवावरची प्रीती व एकमेकांवरची प्रीती
प्रियांनो, आपण एकमेकांवर प्रीती करावी कारण प्रीती देवाकडून आहे आणि जो कोणी प्रीती करतो तो प्रत्येकजण देवापासून जन्मला आहे आणि देवाला ओळखतो. जो प्रीती करीत नाही, तो देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे.
आम्ही देवावर प्रीती केली असे नाही तर त्याने आम्हावर प्रीती केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापांकरिता प्रायश्चित्त म्हणून पाठवले; यातच खरी प्रीती आहे.
जर कोणी "येशू हा देवाचा पुत्र आहे" हे कबूल करतो तर त्याच्याठायी देव राहतो आणि देव त्यांच्यामध्ये राहतो. आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवर आम्ही विश्वास ठेवतो की, जी देवाने आमच्यावर केली. देव प्रीती आहे आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्यामध्ये राहतो.
पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली, म्हणून आपण प्रीती करतो.
कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे.
O amor de Deus revelado
Deus prova o seu amor em que Cristo morreu por nós quando ainda éramos pecadores. Seu amor é compassivo e eterno.
पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो.
पण देव खूप दयाळू आहे कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले. आम्ही आमच्या अपराधामुळे मरण पावलेले असता त्याने आम्हास ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले. तुमचे तारण कृपेने झाले आहे.
तरी हे प्रभू, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस.
मंदक्रोध, आणि दया व सत्य यामध्ये विपुल आहेस.
देवा! तुझी प्रेमदया किती मौल्यवान आहे.
मानवजात तुझ्या पंखांच्या सावलित आश्रय घेते.
कारण तुझी कराराची विश्वसनियता ही जीवनापेक्षा उत्तम आहे;
माझे ओठ तुझी स्तुती करतील.
परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुती
परमेश्वराची उपकारस्तुती करा; कारण तो चांगला आहे,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
तुझ्यासारखा देव कोण आहे?
जो तू पापांची क्षमा करतोस
आणि आपल्या वतनाच्या उरलेल्यांचा अपराध मागे टाकतो.
तो अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणार नाही,
कारण त्यास दयाळू व्हायला आवडते.
समाप्ती
शेवटी, बंधूंनो, आनंद करा तुम्ही आपली अधिकाधिक सुधारणा करा. तुमचे सांत्वन होवो. तुम्ही एकमनाचे व्हा व शांतीने रहा आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर राहील.