Deus é nosso refúgio
Deus é nosso refúgio e fortaleza, socorro bem presente nas angústias. Quando o mundo treme, o crente encontra paz sob as asas do Altíssimo.
Refúgio e fortaleza
Deus é nosso refúgio e fortaleza. Quem habita no abrigo do Altíssimo descansa à sombra do Todo-Poderoso.
देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे,
जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो.
जो परात्पराच्या आश्रयात राहतो,
तो सर्वसामर्थ्याच्या सावलीत राहील.
मी परमेश्वराविषयी म्हणेन की, "तो माझा आश्रय आणि माझा किल्ला आहे,
माझा देव, ज्यावर मी विश्वास ठेवतो."
कारण तो तुला पारध्याच्या पाशातून
आणि नाश करणाऱ्या मरीपासून तुला सोडवील.
तो तुला आपल्या पंखानी झाकील,
आणि तुला त्याच्या पंखाखाली आश्रय मिळेल.
त्याचे सत्य ढाल व कवच आहे.
"हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो."
परमेश्वर माझा खडक माझा गढ आहे, जो मला सुरक्षा देतो, तो माझा देव, माझा खडक आहे, त्याच्यात मी आश्रय घेतो.
तो माझी ढाल आहे, माझ्या तारणाचे शिंग आणि माझा बळकट दुर्ग आहे.
जो स्तुतीच्या योग्य आहे, त्या परमेश्वरास मी हाक मारीन, आणि मी माझ्या शत्रूंपासून वाचवला जाईन.
हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्यात आश्रय घेतला आहे.
परमेश्वर माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे.
मी कोणाचे भय बाळगू?
परमेश्वरच माझ्या जीवाचा आश्रय आहे,
मी कोणाची भीती बाळगू?
जेव्हा दुष्ट माझे मांस खायला जवळ आले,
तेव्हा माझे शत्रू आणि माझे विरोधक अडखळून खाली पडले.
जरी सैन्याने माझ्याविरोधात तळ दिला,
माझे हृदय भयभीत होणार नाही.
जरी माझ्याविरूद्ध युध्द उठले,
तरी सुद्धा मी निर्धास्त राहीन.
हे परमेश्वरा, तुझ्यामध्ये मी आश्रय धरिला आहे,
कधीच माझी निराशा होऊ देऊ नकोस.
तुझ्या न्यायात मला वाचव.
माझे ऐक, त्वरीत मला वाचव,
माझ्या आश्रयाचा खडक हो.
माझा तारणारा बळकट दुर्ग असा हो.
कारण तू माझा खडक आणि माझा दुर्ग आहेस,
तर तुझ्या नामास्तव मला मार्गदर्शन कर आणि मला चालव.
त्यांनी गुप्तपणे रचलेल्या सापळ्यातून तू मला उपटून बाहेर काढ.
कारण तू माझा आश्रय आहे.
मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो,
हे परमेश्वरा, सत्याच्या देवा, तू मला खंडून घेतले आहे.
मला नेहमी आश्रय मिळावा म्हणून माझा तू खडक हो;
तू मला तारावयास आज्ञा दिली आहे,
कारण तू माझा खडक आणि दुर्ग आहेस.
Proteção e segurança
O Senhor é a minha rocha e a minha fortaleza. Melhor é confiar no Senhor do que confiar no homem.
मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा
परमेश्वराच्या आश्रयास जाणे अधिक चांगले आहे.
मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा
परमेश्वरास शरण जाणे हे अधिक चांगले आहे.
हे माझ्या जिवा, तू केवळ देवासाठी निशब्द राहून प्रतिक्षा कर;
कारण माझी आशा त्याच्यावर लागली आहे.
तोच केवळ माझा खडक आणि तारण आहे;
तो माझा उंच बुरूज आहे; मी ढळणार नाही.
माझे तारण आणि माझे गौरव देवावर अवलंबून आहे;
माझ्या सामर्थ्याचा खडक आणि माझा आश्रय देवच आहे.
अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भरवसा ठेवा;
त्याच्यापुढे आपले अंतःकरण मोकळे करा;
देव आमच्यासाठी आश्रय आहे.
हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी स्तवने गाईन;
कारण देव माझा उंच बुरूज आहे,
माझा देव ज्यावर मी विश्वास ठेऊ शकतो.
हे प्रभू, तू सर्व पिढ्यानपिढ्या
आमचे निवासस्थान आहेस.
पर्वत अस्तित्वात येण्यापूर्वी
किंवा पृथ्वी व जग निर्माण होण्याआधीच,
अनादिकाळापासून ते अनंतकाळापर्यंत तूच देव आहेस.
परमेश्वर पीडितांना आश्रयदुर्ग आहे,
संकटकाळी तो बळकट दुर्ग असा आहे.
जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात.
कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही.
देवा! तुझी प्रेमदया किती मौल्यवान आहे.
मानवजात तुझ्या पंखांच्या सावलित आश्रय घेते.
Em todo tempo
O Senhor é bom e é fortaleza no dia da angústia. A torre forte do nome do Senhor protege os seus em toda circunstância.
परमेश्वर चांगला आहे, संकटसमयी तो शरणदुर्ग आहे आणि जे त्याच्या ठायी आश्रय घेतात त्यांना तो जाणतो.
कारण तू गोरगरीबांचा रक्षणकर्ता आहेस, गरजूंना त्यांच्या दुःखाच्या समयी तू संरक्षक असा आहेस.
जेव्हा निर्दयींचा फटका भींतीला लागणाऱ्या वादळासारखा असतो,
तेव्हा तू उन्हाच्या तापात त्यांची सावली व सकंटाच्या वादळात त्यांचा निवारा असा आहेस.
परमेश्वराच्या भयात दृढ विश्वास आहे,
आणि त्याच्या मुलांसाठी ती आश्रयस्थान आहेत.
जो कोणी प्रामाणिक आहे परमेश्वर त्याचे रक्षण करील,
दुष्कर्म करणाऱ्यांना तो नाशकारक आहे.