Dia dos avós
Os avós são tesouros vivos de sabedoria e fé. A Bíblia honra os mais velhos e celebra a transmissão de fé entre gerações — dos avós aos netos e destes aos que virão.
A bênção dos avós
A coroa dos velhos são os filhos dos filhos. A misericórdia de Deus é de geração em geração sobre os que o temem.
नातवंडे वृद्धांचा मुकुट आहेत,
आणि आईवडील आपल्या मुलांस वैभव आणतात.
परंतु परमेश्वराची करार विश्वसनियता त्याचा आदर करणाऱ्यावर अनादिकालापासून अनंतकाळापर्यंत असते.
त्याचा न्यायीपणाचा विस्तार त्यांच्या वंशजापर्यंत होतो.
मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे;
तरी नितीमान टाकलेला किंवा त्याच्या मुलांस भाकरी मागताना मी पाहिले नाही.
एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील,
आणि तुझ्या पराक्रमी कृतीचे वर्णन करतील.
कारण परमेश्वर चांगला आहे; त्याची दया सर्वकाळ आहे,
आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे.
Força e fidelidade
Mesmo na velhice darão frutos. Os cabelos brancos são coroa de glória. Deus não abandona seus filhos na idade avançada.
वृद्धपणातही ते फळ देत राहतील;
ते टवटवीत आणि हिरवे राहतील.
हे यासाठी की, परमेश्वर सरळ आहे हे त्यांनी जाहीर करावे;
तो माझा खडक आहे, आणि त्याच्याठायी काहीच अन्याय नाही.
पिकलेले केस वैभवाचा मुकुट आहे;
नीतिमत्तेच्या मार्गाने चालण्याने तो प्राप्त होतो.
तुमच्या म्हातारपणापर्यंतही मी आहे आणि तुमचे केस पिकेपर्यंत मी तुम्हास वाहून नेईन.
मी तुम्हास निर्माण केले आणि मी तुम्हास आधार देईल, मी वाहून तुमचे रक्षण करीन.
तरुण लोकही थकतात आणि दमतात, आणि तरुण माणसे अडखळतात आणि पडतात.
पण जे कोणी परमेश्वराची प्रतीक्षा करतात ते त्यांची नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडासारखे पंखांनी वर उडतील;
ते धावतील तरी दमणार नाहीत; ते चालतील तरी गळून जाणार नाहीत.
पण तुम्ही हे डोळ्यांत तेल घालून जपले पाहिजे. नाहीतर तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्या विसरून जाल. आपल्या मुला-नातवंडांना त्याची माहिती द्या.