Dia dos pais
O Dia dos Pais celebra o amor e o sacrifício paterno. A Bíblia honra os pais como provedores, protetores e guias espirituais que moldam as próximas gerações.
O pai que educa
Instrui a criança no caminho em que deve andar. O pai justo educa com amor, firmeza e o exemplo de uma vida íntegra.
लहान मुलांनी जसे वर्तन केले पाहिजे, तसेच त्यांना वागावयास शिकवा,
म्हणजे मोठेपणी ती मुले त्या मार्गापासून दूर जाणार नाहीत.
जे कोणी छडी आवरतात, ते त्यांच्या लेकरांचा द्वेष करतात,
परंतु जे त्यांच्या लेकरांवर प्रेम करतात, ते त्यांना काळजीपूर्वक शिस्त लावतात.
नीतिमान मनुष्य निष्कलंकीतपणे चालतो;
त्याच्यामागे त्याच्या मुलाबाळांना आशीर्वाद प्राप्त होतात.
नीतिमान मुलाच्या वडिलांना फार आनंद होतो;
जो मनुष्य सुज्ञ पुत्राचा पिता आहे त्यामध्ये तो उल्लसित असतो.
याहवेहचा आदर मनुष्याचा दृढ गड आहे,
आणि त्याच्या मुलाबाळांना सुरक्षित आश्रयस्थान लाभते.
Honra e alegria
Honra a teu pai e tua mãe. Os filhos são herança do Senhor, e a família que serve a Deus junta é inabalável.
आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल.
मुले, ही याहवेहकडून मिळालेला वारसा आहे,
प्रसवशील कूस, हे याहवेहकडून लाभणारे प्रतिफळ आहे.
तरुणपणी झालेली मुले,
शूरवीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत.
ज्या पुरुषाचा भाता
अशा बाणांनी भरलेला आहे, तो धन्य!
असे पुरुष वेशीत आपल्या शत्रूशी न्यायालयात वाटाघाटी करतील,
तेव्हा ते लज्जित होणार नाहीत.
परंतु याहवेहची सेवा करणे तुम्हाला अप्रिय वाटत असेल, तर तुम्ही कोणाची सेवा करणार ते आजच ठरवा, फरात नदीच्या पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या दैवतांची सेवा केली ती की ज्या अमोरी लोकांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या दैवतांची? परंतु मी आणि माझे घराणे, आम्ही याहवेहची सेवा करणार."
जागृत राहा; विश्वासात स्थिर राहा; धैर्याने वागा व खंबीर असा.
तेव्हा तो उठला आपल्या पित्याकडे निघाला.
"तो अजून दूर अंतरावर असतानाच वडिलांनी त्याला पाहिले आणि वडिलांचे हृदय कळवळले. ते धावत त्याच्याकडे गेले, त्याला मिठी मारून त्याचे चुंबन घेतले.
"मुलगा म्हणाला, ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास लायक राहिलो नाही. मला तुमच्या नोकरासारखे ठेवा.’
"परंतु त्याच्या वडिलांनी मात्र आपल्या चाकरांना आज्ञा केली, ‘त्वरा करा, सर्वात उत्तम झगा आणून त्याला घाला. त्याचप्रमाणे त्याच्या बोटात अंगठी घाला आणि पायात पायतण घाला. खास पोसलेले एक वासरू कापा. हा आनंदाचा प्रसंग आपण मेजवानीने साजरा करू.