Dificuldades
As dificuldades são parte da vida, mas Deus é refúgio certo em todo tempo de angústia. A Bíblia promete que nenhuma adversidade pode separar os filhos de Deus do seu amor.
Deus é refúgio
Deus é nosso refúgio e fortaleza, socorro bem presente nas angústias. Nada poderá nos separar do amor de Cristo.
देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे,
जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो.
म्हणून जरी पृथ्वी बदलली,
जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिणार नाही.
जरी त्यांच्या लाटा गर्जल्या आणि खळबळल्या,
आणि त्यांच्या उचंबळण्याने पर्वत थरथरले तरी आम्ही भिणार नाही.
मी परमेश्वराविषयी म्हणेन की, "तो माझा आश्रय आणि माझा किल्ला आहे,
माझा देव, ज्यावर मी विश्वास ठेवतो."
अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भरवसा ठेवा;
त्याच्यापुढे आपले अंतःकरण मोकळे करा;
देव आमच्यासाठी आश्रय आहे.
परमेश्वर पीडितांना आश्रयदुर्ग आहे,
संकटकाळी तो बळकट दुर्ग असा आहे.
जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात.
कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही.
समुद्राच्या खवळण्यावर तू अधिकार चालवतोस;
जेव्हा त्याच्या लाटा उसळतात, तेव्हा तू त्यांना शांत करतोस.
खूप जलांच्या, महासागराच्या प्रचंड
लाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेला
परमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे.
तो वादळ शांत करतो,
आणि लाटांना स्तब्ध करतो.
ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तलवार करील काय? कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘तुझ्याकरता आम्ही दिवसभर मारले जात आहोत,
आम्ही वधाच्या मेंढराप्रमाणे गणलेले आहोत.’
पण ज्याने आपल्यावर प्रीती केली, त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो. कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत किंवा सत्ता, आताच्या गोष्टी किंवा येणार्या गोष्टी किंवा बले, किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणतीही निर्मिती आपला प्रभू ख्रिस्त येशू ह्याच्याठायी असलेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळे करू शकणार नाही.
Provisão nas dificuldades
O Senhor provê mesmo nos tempos mais difíceis. Ele sustentou Elias, protegeu Israel e cuida dos seus com fidelidade eterna.
पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलीयाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले.
त्याने आच्छादनासाठी ढग पसरला,
आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्नी दिला.
इस्राएलांनी अन्नाची मागणी केली आणि त्याने लावे पक्षी आणले,
आणि त्यांना स्वर्गातून भाकर देऊन तृप्त केले.
त्याने खडक दुभागला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले;
ते नदीप्रमाणे वाळवटांत वाहू लागले.
मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे;
तरी नितीमान टाकलेला किंवा त्याच्या मुलांस भाकरी मागताना मी पाहिले नाही.
परमेश्वर निर्दोषास दिवसेन दिवस बघतो,
आणि त्यांचे वतन सदैव राहील.
वाईट समयी ते लज्जीत होणार नाहीत.
जेव्हा दुष्काळ येईल तेव्हा त्यांच्याकडे खाण्यास पुरेसे असेल.
कारण मी तहानलेल्या जमिनीवर पाणी ओतीन आणि मी कोरड्या जमिनीवर प्रवाह वाहतील.
मी तुझ्या संततीवर आपला आत्मा आणि तुझ्या मुलांवर आपला आशीर्वाद ओतीन.
कारण तू गोरगरीबांचा रक्षणकर्ता आहेस, गरजूंना त्यांच्या दुःखाच्या समयी तू संरक्षक असा आहेस.
जेव्हा निर्दयींचा फटका भींतीला लागणाऱ्या वादळासारखा असतो,
तेव्हा तू उन्हाच्या तापात त्यांची सावली व सकंटाच्या वादळात त्यांचा निवारा असा आहेस.
दिवसा उष्णतेपासून आश्रयासाठी सावली व आसरा, आणि वादळ व पाऊस यापासून आच्छादन असे ते होईल.
जेव्हा तू पाण्यातून जाशील, मी तुझ्या बरोबर असेल; आणि नद्यातून जाशील त्या तुला पूर्ण झाकणार नाहीत.
जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, तू जळणार नाहीस किंवा ज्वाला तुला इजा करणार नाही.
Força nas provas
Em tudo somos atribulados, mas não esmagados. O Senhor é bom e é fortaleza no dia da angústia — Ele conhce os seus.
आम्हावर चारी दिशांनी संकटे येतात पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही, आम्ही गोधळलेलो आहोत पण निराश झालो नाही. आमचा पाठलाग केला गेला, पण त्याग केला गेला नाही, आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही.
परमेश्वर चांगला आहे, संकटसमयी तो शरणदुर्ग आहे आणि जे त्याच्या ठायी आश्रय घेतात त्यांना तो जाणतो.
तिच्या गडद मेघात तो पाणी बांधून ठेवतो,
तरी त्याच्या ओझ्याने मेघ फाटत नाही.
तो चंद्राचा चेहरा झाकतो
आणि त्यावर आपले मेघ पसरवितो.
त्याने पाण्याच्या पृष्ठभागावर एक वर्तुळाकार सीमा कोरली
आणि प्रकाश व अंधकार यांच्यामध्ये क्षितीजरेखा आखली.
जिभेच्या दुःखदायी वाऱ्यापासून तू झाकला जाशील,
आणि विनाश तूझ्यावर येईल तेव्हा तू त्यास भिणार नाहीस.
तो त्यांना म्हणाला, "अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला?" मग तो उठला आणि त्याने वारा व सरोवर यास धमकावले. मग सर्व अगदी शांत झाले. तेव्हा त्या मनुष्यांना फार आश्चर्य वाटले व ते म्हणाले, "हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे की वारे व लाटा ही याचे ऐकतात."
तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, जी रानफुले आज अस्तित्वात आहेत आणि उद्या भट्टीत टाकली जातात त्यांना जर देव त्यांना असा पोशाख घालतो तर त्याहीपेक्षा विशेष असा पोशाख तो तुम्हास घालणार नाही काय? ‘आम्ही काय खावे’ किंवा ‘काय प्यावे’, अथवा ‘आम्ही काय पांघरावे’ असे म्हणून काळजीत करु नका.
आणि ती स्त्री रानात पळाली; तेथे तिची एक हजार दोनशे साठ दिवस काळजी घेण्यात यावी म्हणून तिच्यासाठी देवाने तयार केलेले ठिकाण आहे.
पाहा, मी तुम्हास साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे आणि कशानेच तुम्हास अपाय होणार नाही.