Dinheiro
O dinheiro é ferramenta que pode ser usada para o bem ou para o mal. A Bíblia nos ensina a administrar recursos com sabedoria, generosidade e temor ao Senhor.
Perspectiva bíblica
Guardai-vos da avareza. A vida não consiste na abundância de bens. O dinheiro é servo, nunca senhor.
मग येशू त्यांना म्हणाला, "सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा कारण जेव्हा एखाद्या मनुष्याजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती त्याचे जीवन होत असे नाही."
जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.
त्याचा मालक म्हणाला, शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य चाकर आहेस, तू थोड्या नाण्यांविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!
जेव्हा तू जो जाणारा पैसा आहे त्यावर आपली नजर लावशील,
आणि अचानक ते पंख धारण करतील,
आणि ते गरुडासारखे आकाशाकडे उडून जातील.
श्रीमंत होण्यासाठी खूप कष्ट करू नको;
तुम्ही आपल्या ज्ञानाने कोठे थांबावे समजून घे.
जो रुप्यावर प्रेम करतो तो रुप्याने समाधानी होत नाही.
आणि जो संपत्तीवर प्रेम करतो त्यास नेहमीच अधिक हाव असते.
हे सुद्धा व्यर्थ आहे.
Administrar com sabedoria
Honra ao Senhor com as tuas primícias. O sábio administra seus recursos com prudência e visão de eternidade.
तुझ्या संपत्तीने आणि
आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वरास मान दे,
परमेश्वराचे आशीर्वाद चांगली संपत्ती आणते,
आणि त्यामध्ये तो अधिक दुःख देत नाही.
दुष्टाईने गोळा केलेली संपत्ती ही कवडी मोलाची असते.
पण धार्मिकता मरणापासून दूर ठेवते.
वाईट मार्गाने मिळवलेले धन कमी होत जाते,
पण जो आपल्या हाताने काम करून पैसा कमावतो, त्याचा पैसा वाढत जातो.
सोन्यापेक्षा ज्ञान प्राप्त करून घेणे किती तरी उत्तम आहे.
रुप्यापेक्षा समजुतदारपणा निवडून घ्यावा.
चांगले नाव विपुल धनापेक्षा
आणि सोने व चांदीपेक्षा प्रीतीयुक्त कृपा निवडणे उत्तम आहे.
पुष्कळ धन असून त्याबरोबर गोंधळ असण्यापेक्षा
ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे चांगले आहे.
प्रामाणिकपणा ही मनुष्याची इच्छा असते;
आणि खोटे बोलणाऱ्यापेक्षा गरीब चांगला.
पोकळ गर्व आणि लबाड्या माझ्यापासून दूर कर;
मला खूप श्रीमंत किंवा खूप गरीब करू नकोस.
मला आवश्यक तेवढेच अन्न दे.
Perigos e armadilhas
Quem quer enriquecer cai em tentação. Fuja do amor ao dinheiro e busque contentamento no Senhor.
पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते परीक्षेत आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक अभिलाषांच्या आहारी जाऊन नाश पावतात.
या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवतो त्यावर आशा ठेवावी.
आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यामध्येच समाधान माना कारण देवाने असे म्हणले आहे, "मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही"
क्रोधाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी आहे,
परंतु नीतिमत्ता तुम्हास मरणापासून वाचवते.
श्रीमंताची संपत्ती त्याचे बळकट नगर आहे;
आणि त्याच्या कल्पनेने तो उंच भींतीसारखा आहे.
Tudo vem de Deus
De ti vem tudo, e das tuas mãos to damos. Os tributos são devidos — dai a César o que é de César e a Deus o que é de Deus.
या सगळ्या गोष्टी स्वखुशीने अर्पण करण्याची शक्ती असणारा मी कोण? किंवा हे लोक तरी कोण? तुझ्यामुळेच त्या आमच्याकडे आल्या. तुझ्याकडून मिळाले तेच आम्ही तुला परत करत आहोत.
म्हणून सर्वांना त्यांचे देणे द्या; ज्याला कर त्यास कर, ज्याला जकात त्यास जकात, ज्याला आदर त्यास आदर, ज्याला मान त्यास मान.
या कारणास्तव तुम्ही करही देता कारण याच गोष्टींत ठाम राहणारे ते देवाचे सेवक आहेत.
अनेक दुष्ट लोकांच्या विपुलतेपेक्षा,
नितीमानाकडे जे थोडे ते उत्तम आहे.
कारण दुष्ट लोकांचे बाहू मोडले जातील
परंतु परमेश्वर नितीमानांना आधार देईल.
तुझ्या आज्ञेच्या कराराचा मार्ग हीच माझी सर्व धनसंपत्ती
असे मानून मी त्यामध्ये अत्यानंद करतो.