Doença
A doença é realidade humana que a Bíblia confronta com compaixão e poder. Jesus curou toda enfermidade e prometeu ouvir a oração da fé pelos enfermos.
Jesus, o curador
Jesus percorreu toda a Galileia curando toda enfermidade e doença entre o povo. Pelo seu nome, curas continuam acontecendo.
येशू त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देत व राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्वप्रकारचे रोग व सर्वप्रकारचे आजार बरे करत, प्रत्येक नगरातून व प्रत्येक गावातून फिरला.
रोग्यांना बरे करा, मरण पावलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा आणि भूते काढा. तुम्हास फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या.
रोग्यांना बरे करा, मरण पावलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा आणि भूते काढा. तुम्हास फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या.
मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी असंख्य दुष्ट आत्म्याने ग्रासलेल्यांना त्याच्याकडे आणले; तेव्हा त्याने भूते केवळ शब्दाने घालवली व सर्व आजाऱ्यांना बरे केले.
"त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले," असे जे यशया संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिले. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली. मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, प्रभू आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिले आणि तुला खायला आणि प्यायला दिले? आम्ही तुला परका म्हणून कधी पाहिले आणि तुला आत घेतले किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले? आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरूंगात असताना कधी तुझ्याकडे आलो? मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.
हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, "निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमान लोकांस नाही, तर पाप्यांना बोलावण्यास आलो आहे."
आणि त्यामध्ये जे दुखणाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की, देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.
मग त्याने त्या बारा शिष्यांस एकत्र बोलावून त्यांना सर्व भूतांवर आणि रोग बरे करायला, सामर्थ्य व अधिकार दिला, आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याविषयीचा संदेश जाहीर करायला व रोग्यांना बरे करायला पाठवले.
Promessas de cura
Eu sou o Senhor que te sara. As Escrituras prometem cura para o corpo e para a alma aos que confiam em Deus.
तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनःपूर्वक ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे योग्य ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिसरी लोकांवर ज्या व्याधी मी पाठवल्या त्यापैकी एकही तुजवर पाठविणार नाही. कारण मी तुला व्याधी मुक्त करणारा परमेश्वर आहे.
तू आपला देव परमेश्वर याचीच उपासना करावीस; म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल. मी तुमच्यामधून रोगराई दूर करीन.
तू आपला देव परमेश्वर याचीच उपासना करावीस; म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल. मी तुमच्यामधून रोगराई दूर करीन.
परमेश्वरा, तू मला बरे कर, आणि मी पूर्ण, बरा होईन. तू मला तार, म्हणजे मी तरेन. कारण तुच माझे स्तुतीचे गीत आहेस.
तो तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो;
तो तुझे सर्व आजार बरे करतो.
तो भग्नहृदयी जनांना बरे करतो,
आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो.
परमेश्वर आंधळ्यांचे डोळे उघडतो;
परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो.
परमेश्वर नितीमान लोकांवर प्रेम करतो.
जो मनुष्य गरीबांची चिंता करतो तो आशीर्वादित आहे.
त्याच्या संकटाच्या दिवशी परमेश्वर त्यास वाचवेल.
परमेश्वर त्यास राखेल आणि त्यास जिवंत ठेवेल.
आणि पृथ्वीवर तो आशीर्वादित होईल.
परमेश्वर त्यास त्याच्या शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाही.
तो अंथरुणावर दुखणाईत असता परमेश्वर त्यास आधार देईल.
तू त्याचे आजाराचे अंथरुण आरोग्यामध्ये पालटशील.
प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करतो.
Oração pelos doentes
A oração da fé salvará o enfermo. Confessai as ofensas uns aos outros e orai uns pelos outros para serdes curados.
तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडीलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्यास बरे करील व प्रभू त्यास उठवील. जर त्याने पापे केली असतील तर प्रभू त्याची क्षमा करील.
तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडीलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्यास बरे करील व प्रभू त्यास उठवील. जर त्याने पापे केली असतील तर प्रभू त्याची क्षमा करील.
म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते.
आणि प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये म्हणून माझ्या देहात एक काटा दिलेला आहे, तो मला ठोसे मारणार्या सैतानाचा दूत आहे; म्हणजे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये. म्हणून तो ठेवण्यात आला आहे.
माझ्यामधून तो निघावा म्हणून मी प्रभूला ह्याविषयी तीनदा विनंती केली. आणि त्याने मला म्हणले की, ‘माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणात माझे सामर्थ्य पूर्ण होते.’ म्हणून, फार आनंदाने, मी माझ्या अशक्तपणात अभिमान मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर रहावे; आणि म्हणून ख्रिस्तासाठी आजारात, अपमानात, आपत्तीत, पाठलागात आणि दुःखात मी संतुष्ट असतो कारण मी जेव्हा अशक्त असतो तेव्हाच सशक्त आहे.
Esperança na aflição
Ele tomou sobre si as nossas enfermidades. Mesmo na doença, o coração alegre serve de bom remédio e Deus dá esperança.
पण खरोखर त्याने आमचे विकार आणि आमचे दुःख आपल्यावर घेऊन वाहिले;
तरी आम्ही देवाने त्यास शिक्षा केलेली, देवाने त्यास हाणलेला आणि पीडलेला असा आम्ही विचार केला.
पण खरोखर त्याने आमचे विकार आणि आमचे दुःख आपल्यावर घेऊन वाहिले;
तरी आम्ही देवाने त्यास शिक्षा केलेली, देवाने त्यास हाणलेला आणि पीडलेला असा आम्ही विचार केला.
लोकांनी तुच्छ मानलेला आणि नाकारलेला; दुःखी आणि यातनेशी परिचित तो मनुष्य होता.
ज्याच्यापासून लोक आपले तोंड लपवत, असा तो तुच्छ होता; आणि आम्ही त्यास किरकोळ मानले.
आनंदी हृदय हे चांगले औषध आहे.
पण तुटलेला आत्मा हाडे शुष्क करतो.
आजारपणात मनुष्याचा आत्मा जिवंत राहतो,
पण तुटलेला आत्मा कोणाच्याने सोसवेल?
जेव्हा आशा लांबणीवर पडते तेव्हा अंतःकरण तुटते,
परंतु इच्छा पूर्ण होते तेव्हा ते जीवनाचे झाड आहे.
मी गप्प राहिलो, तेव्हा पूर्ण दिवस माझ्या,
ओरडण्याने माझी हाडे जर्जर झाली.
प्रथम तुम्हास शुभवर्तमान सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरीक व्याधीमुळे मिळाला हे तुम्हास माहित आहे. आणि माझ्या देहाच्या अशक्तपणात तुमची परीक्षा होत असता, तुम्ही तिरस्कार केला नाही पण माझा देवाच्या दूतासारखा, ख्रिस्त येशूसारखा स्वीकार केला.
ह्यापुढे पाणीच पीत राहू नको, तर आपल्या पोटासाठी, म्हणजे आपल्या वारंवार होणाऱ्या आजारामुळे, थोडासा द्राक्षरस घेत जा.
तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल; आणि ह्यापुढे मरण राहणार नाही; दुःख, आक्रोश, किंवा क्लेशही होणार नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत."