Educação das crianças
A educação cristã dos filhos é responsabilidade sagrada dos pais. A Bíblia ensina a instruir, disciplinar e modelar a fé desde a tenra idade, formando gerações que temem ao Senhor.
Instruir nos caminhos de Deus
Instrui a criança no caminho em que deve andar. A educação bíblica molda o caráter e estabelece fundamentos para a vida.
मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे,
आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही.
बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते,
पण शिक्षेची काठी ती त्याच्यापासून दूर करील.
ज्ञानामुळे प्राप्त होणारे फायदे
मुलांनो, वडिलांचे शिक्षण ऐका,
आणि सुज्ञान समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या.
आदेश आणि ताकीद
माझ्या मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण ऐक,
आणि तू तुझ्या आईचा नियम बाजूला टाकू नकोस;
ते तुझ्या शिराला सुशोभित वेष्टन
आणि तुझ्या गळ्यात लटकते पदक आहे.
तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात.
आणि दयेचा नियम तिच्या जिभेवर आहे.
मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा.
आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा. मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा.
त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा.
ज्या दिवशी तुम्ही सर्व होरेब पर्वतापाशी तुमचा देव परमेश्वर याच्यामोर उभे होता, तो दिवस आठवा. परमेश्वर मला म्हणाला होता, मला काही सांगायचे आहे तेव्हा सर्वांना एकत्र बोलाव, म्हणजे आयुष्यभर ते माझ्याबद्दल भय बाळगतील. आपल्या मुलाबाळांनाही तशीच शिकवण देतील.
म्हणून सांगतो या आज्ञा लक्षात ठेवा. त्या हृदयात साठवून ठेवा. त्या लिहून ठेवा. आणि लक्षात राहण्यासाठी हातावर चिन्हादाखल बांधा व कपाळावर लावा. आपल्या मुलाबाळांना हे नियम शिकवा. घरीदारी, झोपताना, झोपून उठताना त्याविषयी बोलत राहा. घराच्या फाटकांवर, आणि दारांच्या खांबांवर ही वचने लिहा. म्हणजे जो देश परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला त्या देशात तुम्ही आणि तुमची मुलेबाळे पृथ्वीवर आकाशाचे छप्पर असेपर्यंत रहाल.
Disciplina e amor
A vara e a repreensão dão sabedoria. A disciplina é expressão de amor que protege e forma o caráter dos filhos.
छडी आणि सुबोध ज्ञान देतात,
पण मोकळे सोडलेले मूल आपल्या आईला लाज आणते.
आपल्या मुलाला शिस्त लाव आणि तो तुला विसावा देईल
आणि तो तुझा जीव आनंदित करील.
जर कोणी आपल्या मुलांना शिक्षा करत नाही तो त्यांचा द्वेष करतो,
पण जो कोणी आपल्या मुलांवर प्रेम करतो तो काळजीपूर्वक त्यांना शिस्त लावतो.
मुलाला शिक्षा करण्यास अवमान करू नको;
कारण जर तू त्यास छडीने मारले तर तो मरणार नाही.
जर तुम्ही त्यास छडीने मारले,
तर तुम्ही त्याचा जीव अधोलाकापासून वाचवाल.
काही आशा असेल तर आपल्या मुलाला शिक्षा कर,
आणि त्याच्या मरणाची तुझ्या जिवाला काळजी वाटू देऊ नको.
हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन करा. ते असे दर्शवते की, देव तुम्हास मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत?
मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे प्रभूला संतोष देणारे आहे.
वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; नाही तर, कदाचित ती निरुत्साही होतील.
आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.
Ensinar pelas Escrituras
Desde a infância conheces as sagradas letras. As Escrituras formam, equipam e capacitam para toda boa obra.
तुला माहीत आहे की, तू आपल्या बाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्याद्वारे तुला शहाणे बनवण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे.
पण तुझ्याबाबतीत, ज्या गोष्टी तू शिकलास व ज्यावर तुझा विश्वास आहे त्या तू तशाच धरून राहा. तुला माहीत आहे की, तू आपल्या बाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्याद्वारे तुला शहाणे बनवण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे.
एकनिष्ठपणे न वागणाऱ्यावरही देवाची कृपा
अहो माझ्या लोकांनो, माझी शिकवण ऐका,
माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या.
मी शहाणपणाचे गीत गाईन;
मी पूर्वकाळच्या गुप्त गोष्टीबद्दल सांगेन.
ज्या आम्ही ऐकल्या आणि ज्या आम्हास समजल्या,
त्या आमच्या वाडवडिलांनी आम्हास सांगितल्या.
त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही.
त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये,
त्याचे सामर्थ्य आणि त्याने केलेले आश्चर्ये कृत्ये सांगू.
ज्या आम्ही ऐकल्या आणि ज्या आम्हास समजल्या,
त्या आमच्या वाडवडिलांनी आम्हास सांगितल्या.
त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही.
त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये,
त्याचे सामर्थ्य आणि त्याने केलेले आश्चर्ये कृत्ये सांगू.
त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही.
त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये,
त्याचे सामर्थ्य आणि त्याने केलेले आश्चर्ये कृत्ये सांगू.
कारण त्याने याकोबात निर्बंध स्थापले
आणि इस्राएलासाठी नियमशास्त्र नेमले.
त्याने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या की,
त्यांनी त्या आपल्या मुलांना शिकवाव्या.
त्याने ही आज्ञा यासाठी दिली की, पुढच्या पिढीने म्हणजे जी मुले जन्माला येतील, त्यांनी त्या आज्ञा जाणाव्या,
त्या आपल्या स्वतःच्या मुलांना सांगाव्या.
मग ते आपली आशा देवावर ठेवतील
आणि त्याची कृत्ये विसरणार नाहीत
परंतु त्याच्या आज्ञा पाळतील.
परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा.
धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो.
जे तुम्ही त्याचे निवडलेले आहा, ते तुम्ही परमेश्वराचे भय धरा.
त्याचे भय धरणाऱ्यांस कशाचीच कमतरता भासत नाही.
तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात,
परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही.
मुलांनो माझे ऐका
आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन.
मुलांनो माझे ऐका
आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन.
पाहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे,
आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे.
Bênção e promessa
Os filhos são herança do Senhor. A educação cristã é investimento eterno que produz frutos em todas as gerações.
परंतु येशू म्हणाला, "लहान मुलांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे."
आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तू चिरकाळ राहशील.
कारण मी तहानलेल्या जमिनीवर पाणी ओतीन आणि मी कोरड्या जमिनीवर प्रवाह वाहतील.
मी तुझ्या संततीवर आपला आत्मा आणि तुझ्या मुलांवर आपला आशीर्वाद ओतीन.
जिवंत मनुष्य, जिवंत मनुष्य, तोच एक तुझे आभार मानेल, जसा मी आज करीत आहे;
पित्याने मुलांना तुझ्या सत्याची जाणीव करून द्यावी.
आणि तुझ्या सर्व मुलांना परमेश्वर शिकवील; आणि तुमच्या मुलांची शांती महान असेल.